आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
क्रिकेट हा भारतीयांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय.. क्रिकेटची मॅच आणि त्यातूनही ती वर्ल्ड कपची मॅच असेल, तर मग काही विचारूच नका. त्या दिवशी टीव्हीसमोरून क्षणभरही कोणी हलत नाही. आपण मॅच जिंकावी म्हणून अगदी देवच पाण्यात ठेवणं बाकी असतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आबालवृद्ध, काॅलेजला जाणारी मुलं, मुली, क्रिकेटचे शौकीन.. शौकीन कसले अगदी भक्तच म्हणणं योग्य.. मॅच आहे म्हटलं की शाळा, काॅलेज, ऑफिसला दांडी मारायची नी मॅच बघायची..
पूर्वी मॅच बघायची सोय नव्हती, तेव्हा रेडिओ असायचा, ट्रान्झिस्टर गळ्यात अडकवून हे शौकीन लोक बाॅल टू बाॅल मॅचचा आनंद लुटत. जाता जाता एखादा रेडिओधारक दिसला तर ‘स्कोअर काय झाला?’ विचारत.
निकालावरून पैजा लागत.. भांडणं होत. हे सारं आता जुनं झालं, पण आजही भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला होता तो दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.
सध्या सोशलमीडियावर ‘८३’ या दोन आकड्यांचीच चांगलीच चर्चा आहे, याचं कारण म्हणजे उद्या प्रदर्शित होणारा, ८३ हा चित्रपट. भारतीय संघाने १९८३ साली वर्ल्ड कप जिंकला आणि त्याच अभूतपूर्व विजयाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट.
भारतासाठी १९८३ या वर्षाचा नायक कोण? असं विचारलं तर ‘कपिल देव’ हे नाव अगदी योग्य ठरेल. क्रिकेटचा विश्वचषक जिंकणं ही भावना जगण्याची संधी सर्वप्रथम या व्यक्तीने भारताला दिली. हा मार्ग प्रचंड खडतर होता, पण कपिल देव आणि त्यांच्या टीमने हे साध्य करून दाखवलं.
कपिल देव यांची ही महत्त्वपूर्ण भूमिका रणवीर सिंग साकारत आहे. १९८३ मध्ये ज्या टीमने विश्वचषक जिंकला, त्या टीममधील प्रत्येकजण आपल्याला पडद्यावर दिसेल.
८३ हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खूप खर्च केला आहे. क्रिकेटर्सची परवानगी आणि त्यांची भूमिका पडद्यावर दिसावी यासाठी त्या टीममधील प्रत्येकाला मानधन देण्यात आले आहे. आणि कपिल देव यांना सर्वाधिक मानधन देण्यात आले आहे.
भारतीय खेळाडूंना एकूण १५ कोटी रुपये दिल्याचं एका रिपोर्टनुसार समजतं. यापैकी ५ कोटी रुपये हे टीमचे कॅप्टन कपिल देव यांना देण्यात आले आहेत, अशी खबर आहे.
—
- कपिल देव ‘त्या’ मॅचमध्ये खेळला नसता तर भारताला ८३ चा वर्ल्डकप जिंकणं कठीण होतं!
- १९८३ वर्ल्डकप – फारुख इंजिनियरची “ती” भविष्यवाणी खरी ठरली!
—
रिपोर्टनुसार, ‘खेळाडूंच्या वैयक्तिक गोष्टी, खेळाविषयीचे अधिकार यांची योग्य माहिती करून घेणं गरजेचं आहे. खेळाडूंच्या वैयक्तिक गोष्टी पडद्यावर दाखवण्यापूर्वी त्याचा अधिकार मिळवणं महत्त्वाचं आहे.’ या गोष्टी लक्षात ठेऊन ८३च्या निर्मात्यांनी १५ कोटींची रक्कम भारतीय संघाला देऊ केली.
८३ चित्रपटाचं पूर्ण बजेट १२५ कोटी रुपये असल्याचं समजतं. कबीर खान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.