Site icon InMarathi

भगवान परशुरामांच्या जीवनाशी निगडीत दहा आश्चर्यकारक गोष्टी जाणून घ्या…

Parshuram-InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष्याच्या तृतीय तिथीला परशुराम देवांची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांनुसार ह्याच दिवशी विष्णू देवांचे रुद्रावतार परशुरामाचा जन्म झाला होता.

आज आपण जाणून घेऊ त्यांच्या जीवना विषयी काही अनोख्या गोष्टी, ज्या आजही लोकंसाठी अज्ञात आहेत.

 

 

१. आपल्या शिष्य भीष्माला ते कधीही पराजित करु शकले नाहीत.

महाभारतानुसार महाराज शंतनूचे पुत्र भीष्माला भगवान परशुराम यांनीच शस्त्र चालवण्याचे शिक्षण दिले होती. एकदा भीष्म काशी मध्ये होणाऱ्या स्वयंवरातून काशीराजच्या मुली अंबा, अंबिका आणि बालिकाला आपले छोटे बंधू विचित्रवीरसाठी उचलून घेऊन आले.

तेव्हा अंबाने सांगितले की ती मनातून दुसऱ्या कोणा व्यक्तीला आपला नवरा मानते. तेव्हा भीष्माने सन्मानपूर्वक तिला परत सोडले. परंतु भीष्माने तिचे हरण केले असल्याने त्या व्यक्तीने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला.

 

 

तेव्हा अंबाने भीष्माचे गुरु परशुरामांकडे धाव घेतली आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. अंबाचे म्हणणे ऐकून परशुरामाने भीष्माला तिच्याशी विवाह करण्यास सांगितले, परंतु ब्रम्हचारी असल्याने भीष्माने असे करण्यास नकार दिला. तेव्हा परशुराम आणि भीष्मामध्ये प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी पित्याचे ऐकून परशुरामाने आपले शस्त्र ठेवून दिले.

ह्याप्रकारे या युद्धात ना भगवान परशुरामांचा विजय झाला न भीष्माचा विजय झाला.

 

२. असा झाला परशुराम देवांचा जन्म

महर्षी भृगुचा मुलगा ऋचिकचा विवाह राजा गाधीची मुलगी सत्यवती हिच्याशी झाला होता. विवाहानंतर सत्यवतीने आपले सासरे महर्षी भृगु कडे स्वतःसाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी मुलाची याचना केली.

तेव्हा महर्षी भृगु यांनी सत्यावतीला दोन फळे दिली आणि सांगितले की ऋतू स्नानानंतर तू उंबराच्या झाडाला आलिंग दे आणि तुझ्या आईला पिंपळाच्या झाडाला आलिंगन द्यायला सांग आणि त्यानंतर दोघींनी या फळाचे सेवन करा.

 

 

परंतु महर्षी भृगु  यांनी सांगितलेली ही गोष्ट सत्यवती आणि तिच्या आईच्या लक्षात राहिली नाही आणि दोघींनी उलट झाडांना आलिंगन देऊन या कार्यात चूक केली. ही घोर चूक महर्षी भृगु यांना समजली. तेव्हा त्यांनी सांगितले की,

तू चुकीच्या झाडाला आलिंगन दिले आहेस त्यामुळे तुझा पुत्र ब्राम्हण असून सुद्धा क्षत्रिय कलागुणांचा असेल आणि तुझ्या आईचा पुत्र क्षत्रिय असून सुद्धा ब्राम्हण कलागुणांचा असेल.

तेव्हा सत्यवतीने महर्षी भृगुकडे प्रार्थना केली की,

माझा पुत्र क्षत्रिय कलागुणांचा होऊ नये भलेही माझा नातू (मुलाचा मुलगा) असा झाला तरी चालेल.

तेव्हा महर्षी भृगुने तिचे म्हणणे मान्य केले. त्यानंतर काही काळाने जमदग्नी मुनींनी सत्यवतीच्या गर्भातून जन्म घेतला. त्यांचे आचरण ऋषींसारखेच होते. त्यांचा विवाह रेणुकाशी झाला. त्यांना चार मुले झाली. त्यातील चौथे पुत्र परशुराम होते. ह्याप्रकारे एका चुकीमुळे परशुरामांचा स्वभाव क्षत्रियांसारखा होता.

 

 

३. त्यांनी केले होते श्रीकृष्णाच्या प्रस्तावाचे समर्थन

महाभारताच्या युद्धाच्या अगोदर जेव्हा भगवान श्रीकृष्ण संधीचा निरोप घेऊन धुतराष्ट्राच्या जवळ गेले होते, तेव्हा श्रीकृष्णचे बोलणे ऐकण्यासाठी परशुराम देव त्या सभेत उपस्थित होते. परशुरामने ही श्रीकृष्णाचे ते बोलणे मान्य करण्यास धुतराष्ट्राला सांगितले होते.

 

४. का केला होता त्यांनी आईचा वध?

एकदा परशुरामची आई रेणुका स्नान करून आश्रमाकडे यायला निघाली होती. तेव्हाच राजा चित्ररथ पण तिथेच स्नान करत होते. राजाला बघून रेणुकाच्या मनात वाईट विचार निर्माण झाले, त्याच अवस्थेत ती आश्रमात पोहोचली.

जमदग्नी यांनी तिला पाहून तिच्या मनातील विचार जाणले आणि आपल्या मुलांना आपल्या आईचा वध करण्यास सांगितले.

 

हे ही वाचा – दिवसातून दोनवेळा अदृश्य होतं हे महादेवांचं मंदिर… वाचा यामागची रहस्यकथा…

परंतु कोणीही त्यांच्या आज्ञेचे पालन नाही केले. तेव्हा परशुरामाने काहीही विचार न करता आपल्या फरशाने आपल्याच आईचे म्हणजे रेणुकाचे शीर उडवले. हे बघून मुनी जमदग्नी प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वरदान मागायला सांगितले. तेव्हा परशुरामाने आपल्या आईस परत जिवंत करण्याचा आणि त्यांना या गोष्टीची आठवण न राहण्याचे वरदान मागितले.

 

५. का केला होता कार्तवीर्य अर्जुनचा वध?

एकदा महिष्मती देशाचा राजा कार्तवीर्य अर्जुन जेव्हा युद्ध जिंकून जमदग्नी यांच्या आश्रमाजवळून जात होता तेव्हा तो काही वेळ आराम करण्यासाठी आश्रमात थांबला. त्याने बघितले की इच्छापूर्ती कामधेनु गायीने अगदी सहजपणे सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली.

तेव्हा कार्तवीर्य अर्जुनाने बलाचा वापर करून कामधेनुच्या बछड्याला आपल्यासोबत नेले .जेव्हा ही गोष्ट परशुरामाला समजली तेव्हा त्याने कार्तवीर्य अर्जुनच्या हजार भुजा कापून त्याचा वध केला.

 

६. यामुळे केला क्षत्रियांचा संहार

कार्तवीर्य अर्जुनच्या वधाचा बदला त्याच्या मुलांनी जमदग्नी मुनींचा वध करून घेतला. क्षत्रियांचे हे नीच कृत्य बघून परशुराम खूप संतापले आणि त्यांनी कार्तवीर्य अर्जुनच्या सर्व मुलांचा वध केला. ज्या-ज्या राजांनी त्यांना साथ दिली होती, त्यांचाही परशुरामाने वध केला. ह्याप्रकारे परशुराम देवांनी २१ वेळा पृथ्वीला क्षत्रियहीन केले.

 

 

७. ब्राम्हणांना दान केली पूर्ण पृथ्वी

महाभारतानुसार परशुरामांचा हा संताप बघून साक्षात महर्षी ऋचिक यांनी प्रकट होऊन त्यांना हे नरसंहारी कृत्य करण्यापासून थांबवले. तेव्हा परशुरामाने क्षत्रियांना मारण्याचे बंद केले आणि संपूर्ण पृथ्वी ब्राम्हणांना दान केली आणि ते स्वतः महेंद्र पर्वतावर निवास करण्यासठी गेले.

 

८. फरशाने कापला होता गणपतीचा दंत

एकदा परशुराम शंकर देवांना भेटण्यासाठी कैलासात गेले होते ,तेव्हा शंकर ध्यानास्थ होते. तेव्हा श्री गणेशाने त्यांना शंकर देवांना भेटण्यापासून थांबवले. त्यामुळे संतापात परशुरामाने फरशाने त्यांचावर वार केला. हा फरशा शंकरानेच परशुरामाला दिला होता म्हणून त्यांचे वार फुकट जाऊ नये म्हणून गणपतीने तो वार आपल्या दातावर झेलला. त्यामुळे त्यांचा एक दात तुटला,तेव्हापासून त्यांना एकदंत संबोधले जाऊ लागले.

 

९. ही होती परशुरामांच्या भावांची नावे

ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांची चार मुले होती. त्यातील सर्वात लहान परशुराम होते. परशुराम देवांचे तीन मोठे बंधू होते. त्यांची नावे क्रमशः रुक्मवान,सुषेणवसु आणि विश्वावसु होते.

 

हे ही वाचा – देवर्षी नारदांचा संताप अनावर झाला अन् विष्णूला लक्ष्मी-विरह सहन करावा लागला…

१०. अमर आहेत परशुराम

हिंदू धर्म ग्रंथांमध्ये काही महापुरुषांचे वर्णन आहे जे अजूनही जिवंत आहेत.यांनी अष्टचिरंजीवी सुद्धा म्हंटले जाते. त्यामध्ये विष्णूदेवांचे अवतार असणाऱ्या परशुरामाचा सुद्धा समावेश आहे.अश्वथामा, राजा बळी, महर्षी वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, ऋषी मार्कंडेय आणि परशुराम यांचा समावेश आहे. असे मानले जाते की परशुराम  आजही कुठेतरी तपस्येमध्ये मग्न आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version