घटस्फोटाची पोटगी ५५ अब्ज रुपये, या राणीची शानशौकी बघाल तर अवाक व्हाल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल – मकतूम यांना त्यांच्या माजी पत्नी हया बिंत अल हुसेन यांना सुमारे ५५० दशलक्ष पौंड देण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. ब्रिटिश कायद्याच्या इतिहासातील सर्वात मोठी पोटगीची रक्कम म्हणून या घटस्फोटाची नोंद झाली आहे. खूप दिवसांपासून चालणारा हा बहुचर्चित घटस्फोट खटला निकाली काढण्यात आला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
या घटस्फोटामुळे अति श्रीमंत मध्य पूर्वेतील राजघराण्यांची भव्य जीवनशैली समोर आली. ४७ वर्षीय प्रिन्सेस हया बिंत अल हुसेन या जॉर्डनचे माजी राजे अल हुसेन यांच्या कन्या आहेत. तर त्या मोहम्मद बिन राशिद अल हुसेन यांच्या सहा बायकांपैकी सर्वात लहान होत्या. शेख मोहम्मद बिन राशिद अल – मकतूम हे दुबईचे राजे आहेत तसेच युएईचे पंतप्रधान सुद्धा आहेत.
प्रिन्सेस हया आणि मोहम्मद बिन राशिद अल हुसेन २००४ मध्ये विवाहबद्ध झाले होते.
कोण आहेत हया बिंत अल हुसेन?
प्रिन्सेस हया यांचा जन्म १९७४ आली साली झाला. जॉर्डनचे माजी राजे हुसैन हे त्यांचे वडील आणि महाराणी अलिया अल् हुसैन या त्यांच्या आई. हया केवळ तीन वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. जॉर्डनचे सध्याचे राजे अब्दुल्ला (दुसरे) हे त्यांचे सावत्र भाऊ आहेत.
प्रिन्सेस हया त्यांच्या बालपणातील बराच काळ युनायटेड किंग्डम मध्ये होत्या. ब्रिस्टॉल मध्ये बॅडमिंटन स्कूल आणि डोर्सेट मधील ब्रेस्टन स्कूल मध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यांनतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी राजशास्त्र, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्रांच शिक्षण घेतलं. प्रिन्सेस हया कुशल घोडेस्वार असून २००० साली सिडनी मध्ये झालेल्या ऑलिम्पिक मध्ये त्यांनी जॉर्डनचं प्रतिनिधित्व केलं होतं.
दुबईमधील अमर्याद पैसा –
प्रिन्सेसच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की दुबईत असताना त्यांच्याकडे आणि मुलांकडे अमर्याद पैसे होते. त्यामुळे त्यांचं राहणीमान हे उच्चप्रतीचं असून पुढेदेखील अशाचप्रकारचे राहणीमान कायम ठेवण्यासाठी त्यांना पैसे देण्यात यावे.
हया कडे डझनभर आलिशान बंगले, ४०० मिलियन पाउंडची नौका आणि खासगी विमानांचा ताफा होता. तिला तिच्या कुटुंबासाठी वार्षिक ८३ दशलक्ष लक्ष पौंड मिळायचे तर ९ दशलक्ष पौंड खर्च करण्यासाठी मिळायचे.
—
- पर्यटकांचं आकर्षण असलेल्या ‘दुबई’बद्दलच्या या १० गोष्टी तुम्हाला अचंबित करतीलच..!
- हिंदू पुरुषांचे विवाहबाह्य संबंध: कायदा काय सांगतो आवर्जून वाचायला हवं
—
बॉडीगार्ड बरोबर अफेयर –
प्रिन्सेस हया यांचे आपल्या बॉडीगार्ड बरोबर प्रेमसंबंध होते. ते जगासमोर येऊ नये अशी तिला भीती होती. आपले प्रेमसंबंध लपविण्यासाठी त्यांनी १२ कोटी रुपये वापरले.
हे पैसे त्यांनी मुलांच्या बँक अकाउंट मधून वापरल्याने बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. प्रिन्सेस हया आपल्या बॉडीगार्डला अनेक किंमती वस्तू भेट म्हणून देत असत. त्यामध्ये रोलेक्ससारख्या महागड्या घड्याळ्यांचा समावेश आहे.
संपत्ती संग्रह –
पोटगी मध्ये मिळणाऱ्या रकमेतील २५१ कोटी रुपये हे प्रिन्सेसच्या लंडनमधील घरांच्या देखभालीसाठी देण्यात आहे आहेत. २०१६ मध्ये प्रिन्सेसने केन्सिंग्टन पॅलेस जवळ ८७.५ दशलक्ष पौंडना एक वाडा विकत घेतला आणि त्याच्या नूतनीकरणासाठी १४.७ दशलक्ष पौंड खर्च केले असे न्यायालयाला सांगण्यात आले आहे.
नोकरांचा पगार –
“आमचे राहणीमान उच्च दर्जाचे असून ते टिकवण्यासाठी आम्हाला तेवढ्याच मनुष्यबळाची आवश्यकता आहे”. त्यामुळे त्यांच्या पगारासाठी भरघोस रक्कमेची मागणी तिने केली आहे. तसेच बर्कशायर येथील कॅसलवुड हवेलीच्या देखभालीसाठी ७७ लाख एवढे वार्षिक पेमेंट मागितले आहेत.
४०० रेस हॉर्स –
प्रिन्सेस हया म्हणाल्या, की त्यांच्याकडे आणि त्यांच्या मुलांकडे मिळून एकूण ६० रेसचे घोडे आहेत. त्यासाठी त्यांनी ७५ दशलक्ष पाउंडची मागणी केली आहे.
शेख बरोबर लग्न करताना त्यांनी जवळपास ४०० घोडे खरेदी केले होते. “मला जो घोडा हवा होता, तो मी खरेदी केला”, असं त्या कोर्टात म्हणाल्या.
सुट्ट्या आणि विश्रांती –
त्यांच्या लग्नादरम्यान, कुटुंबाने इटलीमध्ये एका उन्हाळ्याच्या सुट्टीत ६३१००० पौंड खर्च केले आणि दुसर्या प्रसंगी ग्रीसमधील हॉटेलचे बिल २७४००० युरो होते, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
राजकुमारी हया यांना ब्रिटनमध्ये दोन आठवड्यांच्या सुट्टीसाठी आणि दरवर्षी नऊ आठवडे परदेशात जाण्यासाठी पैसे मिळतील. न्यायाधीश फिलिप मूर म्हणाले, की सुट्टीसाठी वार्षिक पुरस्कार दरवर्षी ५.१ दशलक्ष पौंड असेल, खाजगी विमान भाडे आणि अन्न खर्चासाठी प्रत्येकी १ दशलक्ष पौंड मिळतील.
न्यायालयाने पाळीव प्राण्यांवर खर्च करण्यासाठी वर्षाला २७७०५० पौंड मंजूर केले, ज्यात २५००० पौंड घोडे खरेदी करण्यासाठी आणि १२००० पौंड खेळणी, ग्रूमिंग आणि प्राण्यांच्या प्रशिक्षणासाठी आहेत.
कपडे आणि दागिने –
प्रिन्सेस हया यांनी त्यांच्या साक्षीत सांगितले, की त्यांच्या माजी पतीने त्यांना लुबाडले आहे. लग्नादरम्यान मिळालेल्या भव्य भेटवस्तू आणि दागिने आणि कपडे गहाळ झाल्यामुळे त्यांना१३.७ दशलक्ष पौंड नुकसान भरपाईदेण्यात आली. हरवलेल्या वस्तूंसाठी त्यांनी सुरुवातीला ५२ दशलक्ष पौंडांची मागणी केली होती.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.