Site icon InMarathi

प्रेमभंग झाल्यावर सलमानने चक्क ऐश्वर्याच्या डुप्लिकेटलाच सिनेमात घेऊन तिचं करिअर घडवलं

ash final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सलमान खान हे हिंदी चित्रपट सृष्टीतले मोठे प्रस्थ आहे. त्याने अनेक नवनवीन चेहर्‍यांना आपल्या चित्रपटांतून संधी दिली आहे. तसेच अनेक अभिनेत्रींबरोबरच्या त्याच्या कथित प्रेमकहाण्या देखील चविने चर्चिल्या जातात. सलमानने संधी दिलेल्या चेहऱ्यांमध्ये एक चेहरा असाही होता जो मिस वर्ल्ड असलेल्या ऐश्वर्या राय हिच्याशी मिळताजुळता होता? कोणाचा होता हा चेहरा? कोण आहे ही अभिनेत्री?

तुम्हाला तो सलमानचा २००५ मध्ये आलेला ‘लकी : नो टाइम फॉर लव’ हा चित्रपट आणि त्यातील निळ्या डोळ्यांची, बाहुली सारखी आणि खरेतर ऐश्वर्या सारखी दिसणारी ती मुलगी नक्कीच आठवत असेल ती आहे स्नेहा उल्लाल.

 

 

स्नेहा उल्लालने तिचे शालेय शिक्षण ओमानमधील मस्कत येथील ‘इंडियन स्कूलमधून’ पूर्ण केले . त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती मुंबईत आली आणि ‘ड्युरेलो कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये’ शिकली. ग्रॅज्युएशनसाठी, तिने वर्तक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि इथेच तिची सलमान खानची सावत्र बहीण अर्पिता खानशी भेट झाली, त्या खूप जवळच्या मैत्रिणी झाल्या आणि तिने तिचा स्टार भाऊ सलमान खानची स्नेहाशी ओळख करून दिली.

त्याच दरम्यान सलमान आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमकहाणीत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येवून त्यांच्यात दुरावा आला होता. स्नेहाला पाहिल्यावर सलमान इतका प्रभावित झाला की त्याला स्नेहाचा लुक ऐश्वर्या सारखा वाटला आणि त्याने आपल्या पुढच्या चित्रपटात स्नेहाला प्रमुख भूमिका देवू केली. तो चित्रपट होता लकी: नो टाइम फॉर लव.

 

या चित्रपटाद्वारे तिने अभिनयाला सुरुवात केली तेव्हा ती अवघ्या १८ वर्षांची होती. स्नेहाने सांगितले, जेव्हा ‘लकी’ सिनेमा आला तेव्हा मी फक्त १८ वर्षांची होती. याच काळात सिनेमामुळे माझे शिक्षणही अपूर्ण राहिले होते.पण शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी शिक्षण पूर्ण केले.

विशेष म्हणजे हिंदी सिनेमात काम करण्याआधी स्नेहा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत काम करत होती. बॉलिवूडमध्ये २०१५ साली ‘बेजुबान इश्क’ सिनेमात शेवटची झळकली होती. त्यानंतर ती सिनेसृष्टी पासून लांब गेली.

त्याचदरम्यान अनेक वर्तमानपत्रात हे ही प्रसिद्ध झाले की ऐश्वर्याला टक्कर देण्यासाठी तिला सलमान ने संधी देवू केली होती. यात फारसे तथ्य नसले तरी ऐश्वर्या सारखी दिसत असल्याने स्नेहाला प्रेक्षकांचे कौतुक मिळाले. जरी बॉलीवूड मध्ये यश मिळाले नाही तरी स्नेहा दक्षिणेकडे मात्र यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

 

 

तिने २००७ मध्ये ‘उल्लासमगा उत्सवमागा’ या चित्रपटाद्वारे तेलगू चित्रपटात पदार्पण केले . हा चित्रपट खूप हिट झाला आणि तिला मोठी ओळख मिळाली. त्यानंतर ती नियमितपणे तेलुगू चित्रपटांमध्ये दिसली. ‘ऑक्टोइम्यून डिसऑर्डर’ या रक्ताशी संबंधित आजारमुळे ती चार वर्षे अभिनयापासूनदूर राहिली.

 

 

आज ३४ वर्षांची असलेली स्नेहा आता पुर्णपणे बारी झाली असून ती सध्या आपले आई,वडील व बहिणीसोबत रहात आहे. नुकताच ‘एक्सपायरी डेट’ या वेबसिरीज मध्ये तिने अभिनय देखील केला आहे. तर ही होती ऐश्वर्याच्या डुप्लीकेटची फिल्मी कहाणी! तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version