Site icon InMarathi

या मराठमोळ्या ट्रान्सजेंडर डिझायनरमुळे भारताच्या हरनाजने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला

swapnil s inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हरनाज संधूने २०२१ चा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे. भारताला तब्बल २१ वर्षांनंतर हा किताब मिळाला आहे. मिस युनिव्हर्स २०२१ चा निकाल जाहीर होताच सर्व भारतीयांना आनंदाची बातमी मिळाली. अंतिम स्पर्धेच्या वेळेला जजेसने विचारलेल्या प्रश्नांनाही हरनाजने सुंदर उत्तरे दिली. हरनाज बरोबरच तिने जो पोशाख अंतिम स्पर्धेत परिधान केला होता त्या गाऊनची देखील सर्वत्र चर्चा होत आहे.

 

 

हरनाजने बेज आणि चांदीच्या रंगाचा नक्षीदार गाऊन घातला होता. तिने घातलेला हा गाऊन सर्वांनाच आवडला. हरनाज सिंधूचा अंतिम फेरीचा गाऊन तीन भागांमध्ये विभागला गेला होता. हा गाऊन साईशा शिंदे या एका मराठमोळ्या डिझायनरने डिझाइन केला आहे. कोण आहेत या साईशा शिंदे? जाणून घ्या.

साईशाचे नाव भारतातील प्रसिद्ध डिझायनर्सपैकी एक म्हणून घेतले जाते. हरनाजने मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवल्यानंतर साईशाने हरनाजचा एक फोटो शेअर केला. त्यांनी फोटोबरोबर असे कॅप्शन लिहिले – “आम्ही करून दाखवले!” आणि पुढच्या कमेंटमध्ये त्यांनी हरनाजसाठी लिहिले की, “मी तुला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

स्वप्नीलची साईशा झाली…

साईशा ह्या एक ट्रांसवुमन असून त्यांचे पूर्वीचे नाव स्वप्नील शिंदे होते. नंतर त्यांनी ऑपरेशन करून त्यांचे लिंग बदलून घेतले. त्यांनी याबद्दल जानेवारीत सोशल मीडियावरून ही माहिती शेअर केली होती.त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. त्यांनी लिहिले होते की, “शेवटी इतके मला धैर्य मिळाले आहे की मी माझे सत्य स्वीकारू शकेन. मी समलिंगी असल्यामुळे मला पुरुषांबद्दल आकर्षण आहे हे मला काही वर्षांपूर्वीच समजले. पण मी ६ वर्षांपूर्वी माझे हे सत्य स्वीकारले आणि आता मी समलिंगी नाही तर ट्रान्सवुमन आहे.”

साईशाने हरनाजचा संपूर्ण गाऊन पंजाबच्या प्रसिद्ध ‘फुलकारी’ ह्या खास कारागिरीने प्रेरित असलेला डिझाईन केला आहे. हरनाज ही पंजाबची आहे, त्यामुळे तिच्या गाऊनला फुलकारी स्टाईलचा देसी टच देण्यात आला आहे.

 

 

एका मुलाखतीदरम्यान बोलताना साईशा शिंदे म्हणाल्या की, “आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिस इंडियाकडून अनेक अपेक्षा असतात. तिने मोहक, उत्कृष्ट दिसले पाहिजे आणि तिचा गाऊन नाजूक व सुंदर पण पावरफुल आणि स्ट्रॉंग दिसणे आवश्यक आहे. हे सगळी वैशिष्ट्ये माझ्या आयुष्यात घडलेल्या मोठ्या बदलानंतर, मी ट्रांसवुमन झाल्यानंतर आपसूकच माझ्या डिझाईनमध्ये आली आणि आता हाच माझा ब्रँड बनला आहे. हा गाऊन भरतकाम, स्टोन्स आणि सिक्वीन्सने सुशोभित केलेला आहे. हरनाझला टिकाऊ व सस्टेनेबल गोष्टी करणे आवडते. म्हणून आम्ही बाहेरून नव्या वस्तू आणण्यापेक्षा स्टुडिओमध्येच उपलब्ध असलेल्या एम्ब्रॉयडरी साहित्याचा वापर करून हा गाऊन डिझाईन केला.”

महाराष्ट्राचे नाव जगात उंचावणाऱ्या साईशा शिंदे यांनी NIFT मधून पदवीचे शिक्षण घेतले आणि नंतर मिलान, इटली येथून फॅशन डिप्लोमा मिळवला.

आज हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज नटनट्यांसाठी , त्यांच्या खास प्रसंगांसाठी सुंदर ड्रेसेस डिझाईन करणाऱ्या साईशा शिंदे ह्यांनी लॅक्मे फॅशन हाऊस नावाच्या रियॅलिटी शो मध्ये भाग घेतला होता. ह्या शो मध्ये त्या टीव्ही शोमध्ये ती फर्स्ट रनर अप होत्या.

त्यानंतर त्यांना हाऊस ऑफ व्हर्साचे येथे सहा महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. मधुर भांडारकर दिग्दर्शित फॅशन या चित्रपटासाठी त्यांनी मुख्य लुक्स डिझाइन केल्यामुळे त्यांचे सगळीकडे कौतुक झाले. ह्या चित्रपटात त्यांनी प्रियंका चोप्राचे पोशाख डिझाइन केले होते.

 

 

साईशा शिंदे यांनी प्रोजेक्ट रनवे ह्या लोकप्रिय अमेरिकन टीव्ही मालिकेच्या सीझन १४ मध्ये देखील भाग घेतला होता. हा शो २०१५ मध्ये प्रसारित झाला होता. ह्या कार्यक्रमात सुपरमॉडेल हेडी क्लम, मेरी क्लेअर क्रिएटिव्ह डायरेक्टर नीना गार्सिया आणि फॅशन डिझायनर झॅक पोसेन हे फॅशन इंडस्ट्रीतील नावाजलेले लोक ह्या शोचे जज होते.

हे सगळे करत असताना मनातून मात्र साईशा अस्वस्थ होत्या. त्यांच्या खाजगी आयुष्यात त्यांच्या मनाचा कोंडमारा होत होता लहानपणापासूनच शाळा, कॉलेजमध्ये त्यांना अनेकांनी त्यांच्या वागण्यावरून खूप त्रास दिला. ह्यामुळे त्यांच्या मनावर आघात झाले. एक पुरुष म्हणून आयुष्य जगताना त्यांना खूप गुदमरल्यासारखे वाटत असे.

अखेर वयाच्या विसाव्या वर्षी NIFT मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी स्वतःचे सत्य हिंमत करून स्वीकारले. हे मोठे धाडस केल्यानंतर त्यांना मुक्त झाल्यासारखे वाटले. स्वप्नील शिंदे म्हणून आयुष्य जगत असताना पुरुषांकडे आकर्षित होत असल्याने त्यांना आपण समलैंगिक आहोत असे वाटत असे.

पण जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी सर्जरीद्वारे त्यांना अपेक्षित असा बदल स्वतःमध्ये करून घेतला आणि सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही माहिती जगापर्यंत पोचवली की आता त्या ‘गे’ नसून एक ट्रांसवुमन आहेत.

 

 

त्यांनी त्यांच्या मनातील दुःख देखील व्यक्त केले की ,”आपण कितीही मोठे झालो तरीही आपल्याला आपले बालपण कायमच आठवत असते. माझ्या बालपणीच्या आठवणी खूप वाईट आहेत.”

त्यांनी या बरोबरच स्वतःच्या नव्या रूपातील फोटो देखील शेअर केले. त्यांच्यातील हा बदल इतरांनी देखील अगदी मोकळेपणाने स्वीकारला. बॉलिवूडकरांनी देखील त्यांना शुभेच्छा देत , त्यांना पाठिंबा देत त्यांच्या ह्या धाडसी निर्णयाचे स्वागतच केले.

साईशाने ह्यापूर्वी करीना कपूर, कतरीना कैफ, कियारा अडवाणी, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, हिना खान, सनी लिओन व इतर अनेक स्टार्ससाठी ड्रेस डिझाइन केले आहेत. हरनाज बरोबरच आता साईशाचे देखील सगळीकडे कौतुक होत आहे. साईशाने महाराष्ट्राचे नाव देश व विदेशातील फॅशन इंडस्ट्रीत उंचावले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version