आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हल्ली रोज साड्या नेसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तरुण मुलींना रोज वापरण्यासाठी साडीपेक्षा पंजाबी ड्रेस, कुर्ता लेगिंग्ज, जीन्स टीशर्ट वापरणे जास्त सुटसुटीत वाटते. जशा पूर्वी बायका नववारीकडून पाचवारी साडीकडे वळल्या, तशाच बऱ्याच मध्यमवयीन स्त्रिया, अगदी वयोवृद्ध स्त्रिया सुद्धा सुटसुटीत म्हणून पंजाबी ड्रेस वापरू लागल्या आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
साड्या ह्या लग्नकार्य, सणवार ह्याप्रसंगीच वापरल्या जातात, पण लागतील लागतील म्हणून कपाटात साड्यांचा ढीग असतो आणि त्या वापरण्याचे प्रयोजन मात्र जास्त नसते.
अशावेळेला ठेवून ठेवून त्या साड्या खराब होऊ लागतात. आजी, आईचे प्रेम असलेली त्यांची ही अनमोल आठवण कुणाला देऊन तरी कशी टाकणार म्हणून वर्षानुवर्षे अनेक साड्या कपाटात पडून असतात. अशा वेळेला त्यांचा जर काही उपयोग करता आला तर किती बरं होईल असा विचार महिलांच्या मनात डोकावतोच.
आज तुम्हाला सांगणार आहोत काही अश्या टिप्स, ज्यामुळे तुमच्या जुन्या अनमोल साड्यांचा उपयोग तर होईलच शिवाय नवी फॅशन केल्याचा आनंद देखील तुम्हाला मिळेल.
१. साडीचा ड्रेस शिवून घ्या
सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. तुमच्याकडे असलेली किंवा तुमच्या आईची/आजीची जुनी गर्भरेशमी जरीकाठी साडी तुम्हाला नेसायची नसेल तरी तुम्ही त्या साडीचा एक सुंदर डिझायनर ड्रेस शिवून घेऊ शकता.
वन पीस गाऊन किंवा पंजाबी ड्रेस, अनारकली ड्रेस असे कितीतरी पर्याय तुम्हाला सापडतील. अश्या ड्रेसेसची सध्या फॅशन आहे. त्यामुळे वाहत्या गंगेत पटकन हात धुवून घ्या.
२. मस्त पॅलाझो पँट शिवून घ्या
तुमच्याकडे मस्त प्रिंटेड कॉटन साडी असेल आणि ती नेसून नेसून तुम्ही कंटाळला असाल तर ती टाकून देण्यापेक्षा किंवा कुणाला देऊन टाकण्यापेक्षा त्या साडीची एक सुंदर पलाझो पँट शिवून घ्या.
पलाझो पँट्स तर सध्या फॅशनमध्ये आहेत आणि त्या वापरायला अतिशय आरामदायक आहेत. संध्याकाळचा एखादा कॅज्युअल कार्यक्रम असेल तर ही पलाझो पॅन्ट आणि त्यावर मस्त ट्रेंडी टॉप घालून तुम्ही पटकन तयार होऊ शकता.
३. ट्रेंडी धोती पॅन्ट शिवा
धोती पँट्स देखील सध्या फॅशनमध्ये आहेत आणि तुम्हाला काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल तर धोती पँट तुमच्या कलेक्शन मध्ये असायलाच हवी, पण ती घ्यायला बाहेर कशाला जायचे? आपल्याच कपाटात पडून असलेल्या आईच्या किंवा स्वतःच्या साडीचा उपयोग तुम्ही धोती पॅन्ट शिवायला करू शकता.
४. देसी किमोनो जॅकेट शिवून घ्या
किमोनो जॅकेट घातले की एक वेगळाच लूक येतो. तुम्ही ते जवळजवळ कोणत्याही आऊटफिट बरोबर घालू शकता. त्यामुळे तुमच्याकडील जुन्या पण चांगल्या साडीचे किमोनो जॅकेट शिवून घ्या.
सध्या हिवाळा असल्याने थंडीपासून बचावासाठी तर हा एक उत्तम आणि ट्रेंडी पर्याय आहे. शिवाय आईची साडी वापरल्याचे समाधान आणि तिच्या मायेची उब तुम्हाला या जॅकेटमधून मिळेल.
५. पँट-सूट कॉम्बोला देसी टच द्या
साडीचे पँट-ब्लेझर असे कॉम्बिनेशन शिवून घ्या आणि तुमच्या कलेक्शनमध्ये एका मस्त ड्रेसची भर टाका. साडीपासून शिवलेला तुमचा पॅन्ट सूट कॉम्बो बघून लोक तुम्हाला डिझायनर समजून तुमच्याकडून फॅशनच्या टिप्स घेऊ लागतील.
६. सुंदर ब्रोकेड स्कर्ट शिवून घ्या
स्कर्टबरोबर तुम्ही साधा कॅमी टॉप ते फॉर्मल शर्ट असे वेगवेगळे कॉम्बिनेशन करू शकता आणि जर तुमच्या कपाटात काही सुंदर ब्रोकेड साड्या नुसत्या पडून असतील तर त्या वापरून एखादा सुंदर स्कर्ट शिवून घेण्यात काहीही चुकीचे नाही.
७. स्ट्रेट कुर्ता शिवून घ्या
आपल्याकडे कितीही कुर्ते असले तरीही ते कमीच वाटतात. वेगवेगळ्या पॅटर्न्सचे, रंगांचे, डिझाईनचे कुर्ते बघितले की ते घेण्याचा मोह होतोच, पण नवीन कुर्ते घेण्यात पैसे खर्च करण्यापेक्षा जर घरात असलेल्या साड्यांचे कुर्ते शिवून घेतले तर तुम्हाला बरीच व्हरायटी सुद्धा मिळेल आणि पैसेही वाचतील.
—
- “बघण्याच्या” कार्यक्रमात मुलीला हे असले प्रश्न विचारणाऱ्यांवर हसावं की चिडावं? तुम्हीच ठरवा!
- जगातली पहिलीवहिली साडी जी चक्क खाता येते! भारतीय महिलेने केला चमत्कार…
—
८. अनारकली ड्रेस शिवा
कितीही फॅशन्स आल्या गेल्या तरी अनारकलीची जादू अजूनही संपलेली नाही. एखाद्या सण समारंभात मस्त हेवी डिझाईन असलेला अनारकली ड्रेस नक्कीच भाव खाऊन जातो. मग हे अनारकली शिवण्यासाठी सुंदर भारीतल्या साड्या वापरल्या तर वेगळं, पण उत्कृष्ट डिझाईन असलेला अनारकली ड्रेस तुम्हाला मिळेल.
९. सुंदर दुपट्टा बनवून घ्या
आपल्याकडे कितीही रंगेबेरंगी ओढण्या/दुपट्टे असले तरीही ते कमीच असतात. पण काळजी नॉट! तुमच्या सुंदर साड्यांपासून तुम्ही सुंदर हेवी डिझाईनचे दुपट्टे बनवून घेऊन शकता. हा दुपट्टा एखाद्या सिम्पल कुर्त्यासोबत घाला किंवा तुमच्या सुंदर मॅक्सी ड्रेसबरोबर घालून तुमच्या लूकला थोडा देसी टच द्या.
१०. डिझायनर लेहेंगा/ घागरा ओढणी शिवून घ्या
सध्या लग्नसराई आहे आणि आपल्या ओळखीत, नात्यांत किमान दोन-तीन तरी कार्ये असतातच. अशावेळेला तुमच्या आईच्या जुन्या साडीपासून एक सुंदर लेहेंगा/परकर पोलके/ घागरा ओढणी शिवून घ्या. यामुळे तुमचे पैसे तर वाचतीलच शिवाय तुम्हाला अगदी रिच लूक मिळेल. अगदी हजारोंचा लेहेंगा घातल्याचे समाधान मिळेल.
११. जॅकेट्स शिवून घ्या
हिवाळा जवळजवळ सुरूच झाला आहे. जानेवारी महिना जवळ आला आहे. हवेत गारवा वाढला आहे. अशा वेळेला स्वेटर्स किंवा जॅकेट्स घालणे अपरिहार्य आहे, पण तुम्हाला ती कंटाळवाणी सॉलिड कलर जॅकेट घालण्याचा कंटाळा आला असेल तर, तुमच्या आईच्या साडीपासून बनवलेली फॅन्सी जॅकेट्स घाला आणि ट्रेंडी लूक मिळवा.
१२. शॉर्ट्स किंवा केप्रीज शिवून घ्या
आई कितीही ओरडत असली तरीही शेवटी तुम्ही तिच्या साडीचा काहीतरी उपयोग करताय म्हटल्यावर ती नक्कीच खुश होईल. तुम्हाला केप्रीज किंवा शॉर्ट्स घालायला आवडत असेल तर जुन्या प्रिंटेड साड्यांपासून तुम्ही घरात घालायला किंवा बाहेर घालायला देखील शॉर्ट्स किंवा थ्री फोर्थ पँट्स शिवून घेऊ शकता.
१३. साडीपासून ऍक्सेसरीज बनवा
हल्ली साड्यांपासून बनवलेल्या पर्स, वॉलेट्स , बँग्स वगैरे वापरण्याची फॅशन आहे. काही लोक तर साडीचे शूज सुद्धा बनवून देतात. साडी अगदीच जुनी झाली असेल तर तुम्ही तिचा अशाप्रकारे नक्कीच उपयोग करू शकता.
१४. घराची सजावट करा
साडी वापरून कंटाळा आला असेल आणि त्यापासून स्वतःला वापरण्याजोगे काहीच नको असेल तर तुम्ही साडीचा उपयोग घराच्या सजावटीसाठी करू शकता. पडदे, उश्यांचे अभ्रे, लॅम्प शेड्स, शो पिसेस, टेबलक्लॉथ अश्या अनेक वस्तू तुम्ही साड्यांपासून तयार करून घेऊ शकता.
१५. स्टेशनरी – नोटपॅड, फोन केस, लॅपटॉप/किंडल स्लीव्हज
जुन्या साड्या वापरून तुम्ही फोन केस, लॅपटॉप कव्हर किंवा किंडल कव्हर शिवून घेऊ शकता.
खरंतर स्वतःची कल्पनाशक्ती आणि pinterest ची मदत घेऊन तुम्ही साडीचा तुम्हाला वाटेल तसा उपयोग करू शकता. आम्ही सहज सुचणाऱ्या कल्पना इथे सांगितल्या, पण तुमच्या मनात काही वेगळ्या कल्पना असतील तर त्या देखील आमच्याशी शेअर करा म्हणजे इतरांनाही त्याचा नक्कीच उपयोग होईल.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.