आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मनुष्यस्वभाव असा आहे, की आपल्याला प्रत्येक गोष्ट तर्काच्या पट्टीवर तासून त्याची शहानिशा करायची असते. बुद्धीला एखादी गोष्ट पटत नसेल तर त्यावर आपल्याला सहसा पटकन विश्वास ठेवता येत नाही.
एखादी गोष्ट तर्काला धरून नाही म्हटल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करायची किंवा ती गोष्ट नाकारायचीही शक्यता असते, पण बुद्धीच्या पलीकडे अशाही अनेक गोष्टी जगात आहेत ज्यावर माणसाला विश्वास ठेवावाच लागतो.
जसे अनेक चांगले योग आयुष्यात असतात तितकेच अनेक विचित्र योगही असतात. मानवी बुद्धीला त्यांचे आकलन होत नाही आणि कुठल्यातरी मोठ्या शक्तीसमोर अशावेळी माणसाला शरणच जावे लागते, पण मानव जसा बुद्धिवादी आहे तसा बुद्धीपलीकडले चमत्कार, गूढं समजून घ्यायला उत्सुकदेखील आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
भारतात अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांच्या मागे काहीतरी गूढ इतिहास असतो ज्याची उकल बुद्धी करू शकत नाही. पुराणातले त्यांचे संदर्भ, कथा यांचाच आधार अशा वेळी अभ्यासकांना घ्यावा लागतो. सामान्य मनुष्याला ही रहस्य अचंबित करून टाकतात. अशी मंदिरं पाहायला लोकांच्या रांगाच्या रांगा लागतात.
काही प्राचीन मंदिरं अशीही आहेत जी खुद्द देवांनीच बांधलेली आहेत. देवाचा आशीर्वाद घ्यायला लोक तिथे जातात. झारखंड राज्यातील ‘बैद्यनाथ शिव मंदिर’ हेदेखील असंच. हे मंदिर स्वतः विश्वकर्मा देवाने बांधले आहे.
केरळमध्येही अशाच प्रकारचे एक मंदिर आहे. केतू देवाला समर्पित असलेल्या या मंदिराविषयी अशी एक आख्यायिका आहे, की इथे जर दूध वाहिलं तर दुधाचा रंग बदलून निळा होतो.
केरळमधील कावेरी नदीच्या किनाऱ्याजवळ असलेल्या कीजापेरूमपल्लम या गावात हे मंदिर आहे. हे मंदिर राहू-केतू मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे. लोक याला ‘केतू मंदिर’ असं म्हणतात. कारण, केतूशी संबंधित वेदनांचे निराकरण करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त इथे येतात.
या मंदिराला ‘नागनाथस्वामी’ किंवा ‘केति स्थळ’ म्हणूनही ओळखलं जातं. या केतू मंदिरातले मुख्य देव शंकर आहेत, पण शंकराच्या बरोबरीने इथे राहू आणि केतू या देवांच्या मूर्तींचीही स्थापना केलेली आहे. शंकराला ‘नागनाथ’ असेही म्हटले जाते.
या मंदिरात राहू देवावर दूध वाहीलं जातं. अशी धारणा आहे की, ज्या लोकांना ‘केतू दोष’असतो त्यांनी जर राहू देवाला दूध वाहीलं तर दुधाचा रंग बदलून निळा होतो.
—
- असुरांच्या नाशासाठी भगवान शंकरांनी घेतला अवतार, ‘महाबळेश्वर मंदिरा’ची कथा
- नेहरूंचा विरोध पत्करून या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे जिर्णोद्धार झाला सोमनाथ मंदिराचा!
—
पौराणिक संदर्भांनुसार अमृतमंथनाच्या वेळी राहू नावाचा राक्षस देवाच्या वेशात बसला होता आणि त्याने अमृत तोंडात घेतले तेव्हाच ती मोहिनी बनली. श्रीहरी विष्णूला हे कळले. त्यांनी सुदर्शन चक्राने राहूची मान कापली. तेव्हापासून राहूची मान आणि धड केतू म्हणून पुजली जाते.
भारतीय फलित जोतिष शास्त्रात नऊ ग्रह मानले जातात. त्यापैकी राहू आणि केतू हे ‘छाया ग्रह’ आहेत. यांखेरीज नऊ ग्रहांमध्ये बृहस्पती, शनी, शुक्र, चंद्रमा, बुध, मंगल, सूर्य यांचाही समावेश होतो. या प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा असा वेगवेगळा स्वभाव आहे ज्यांच्या आधारे मनुष्यावर त्यांचा प्रभाव पडतो.
पौराणिक कथेनुसार, राहू हा प्रचंड बलशाली राक्षस आहे. नऊ ग्रहांमध्ये राहू कूटनीती, राजनीती, सट्टा, भ्रम आणि सत्ता पद यांचा ग्रह मानला जातो आणि केतू मोक्षकारक आणि रहस्यमयी गुप्त विद्यांचा ग्रह मानला जातो. हे दोन्ही खूप महत्त्वाचे ग्रह आहेत आणि कलियुगात या दोन्ही ग्रहांचा प्रभाव आहे असं मानलं जातं.
कुंडलीत असलेल्या राहू आणि केतूच्या स्थितीनुसार कालसर्प दोष सुद्धा निर्माण होऊ शकतो. हे सगळे नऊ ग्रह प्रत्येक देवी-देवतेच्या अधीन असलेले ग्रह म्हणूनही मानले जातात. राहूच्या शांतीसाठी शंकराची उपासना करणं महत्त्वाचं असतं तसं केतूसाठी गणपतीची उपासना करणं महत्त्वाचं असतं.
पौराणिक कथेनुसार, ऋषींनी दिलेल्या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी याच केतू मंदिरात केतूने शंकराला प्रसन्न करण्यासाठी शंकराची पूजा केली. अ
सं मानलं जातं की, शिवरात्रीला भगवान शंकर केतूवर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपले दर्शन केतूला घडवून त्याला त्याच्यावरच्या शापातून मुक्त केले. केतूला सापांची देवता असंही समजलं जातं, कारण त्याचं डोकं माणसाचं आणि धड सापाचं आहे.
कैक वर्षांपासून आपल्या संस्कृतीतली, विशेषतः मंदिरांच्या बाबतीतली अशी अनेक गुढे आपल्या समोर येत आलेली आहेत. यापुढेही येत राहणार आहेत. असे चमत्कार केवळ चमत्कार म्हणूनच आपल्याला मान्य करायचे असतात ही जाणीव दडलेली आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.