आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या तोंडून एक गोष्ट सतत ऐकतो, ती म्हणजे चिंता नको करू.. सगळं काही ठीक होईल, जस्ट चिल, सगळं सुरळीत होईल, असे डायलॉग्स आपण दिवसातून किमान १० वेळा तरी ऐकतोच! कधी आपल्या जवळच्या नातेवाईंकांच्या तोंडून तर कधी रस्त्यावर चालणाऱ्या २ अनोळखी मित्रांच्या तोंडून.
पण ही चिंता, काळजी टेन्शन हा नक्की काय प्रकार आहे? आणि तो सगळ्यांच्याच पाचवीला का पुजला आहे!
मानसशास्त्रानुसार Anxiety disorder असणारे लोक खूप खास असतात. ह्या डिसऑर्डरमध्ये व्यक्ती खूप चिंतीत असते आणि ती खूप विचार करते.
असे लोक जीवनात कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद ठेवतात. जर तुम्हालाही Anxiety disorder असेल तर त्याची केवळ वाईट बाजू बघू नका तर त्याची चांगली बाजू देखील अनुभवा.
–
- फळं खायचीयेत, पण कॅलरीजची चिंता भेडसावतेय? तुमच्या “डाएटिंग”साठी ही फळं आहेत लाभदायी
- आपल्याला स्वप्नं का पडतात, भविष्याचे पूर्वसंकेत, भेडसावणाऱ्या चिंता की आणखी काही? वाचा…
–
१. आईक्यू वाढणे
बुद्धयांक किंवा ज्याला इंग्लिश मध्ये IQ (Intelligence quotient) असंही म्हंटल जातं याबाबतीत तर तुम्हाला ठाऊक असेलच की बुद्धयांक म्हणजे काय तो कसा मोजला जातो शिवाय त्याच्या आधारावर एखाद्याची बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक कल कोणत्या बाजूला आहे हे ओळखले जाते!
आपण १० वी किंवा १२ वी नंतर बऱ्याच aptitude test देतो, ती सुद्धा एक प्रकारची बुद्धयांक चाचणीच असते!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
न्यूयॉर्क च्या सुनी डाउनस्टेट मेडिकल सेंटरच्या रिसर्चनुसार, Anxiety मुळे लोक जास्त स्मार्ट होऊन जातात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण या अवस्थेत लोक खूप बारकाईने विश्लेषण करतात.
ते प्रत्येक संभाव्य परिणामाबाबत जागरुक असतात. आणि ते त्यासाठी तयार देखील असतात.
२. जास्त सहानुभूती व्यक्त करणे
सहानुभूती किंवा संवेदनशीलता हा माणसाच्या स्वभावाचा एक पैलू आहे, आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या बाबतीत संवेदनशील किंवा हळवे होतोच, पण त्यामागची कारण वेगवेगळी असतात!
पण हेच Anxiety असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत लागू होत नाही!
सामान्य लोकांच्या तुलनेत Anxiety disorder असलेला व्यक्ती जास्त संवेदनशील असते, ती इतरांप्रती अधिक सहानुभूती दर्शविते.
कधी कधी ते एवढे संवेदनशील होऊन जातात की लोक त्यांना समजूच नाही शकत. असे लोक इतरांच्या भावनांना अधिक प्रभावीपणे समजू शकतात. हे खूप इमोशनल असतात.
३. खोटं जाणायची क्षमता
खोटं बोलणं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, अशी कोणीही व्यक्ती नाही जी आजवर कधीच खोटं बोललेली नाही! त्यामुळे कमी जास्त प्रमाणात का होईना सगळेच लोकं खोटं बोलतातच!
पण Anxiety disorder ज्यांना आहे त्यांना तर या खोटेपणाचा तिटकारा असतो!
Anxiety disorder असलेली व्यक्ती खूप सतर्क असतात. जर त्यांच्या समोर कोणी खोटे बोलले तर ते त्यांना लगेचच कळून जाते. अशी लोकं खूप साहसी असतात.
जर समोरची व्यक्ती काही चुकीचे करत असेल तर असे व्यक्ती त्याला विरोध करायलाही घाबरत नाहीत. त्या नेहेमी खरं बोलतात आणि जे सत्य असेल ते समोर आणण्याचा प्रयत्न करतात.
४. सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेला ओळखण्याची शक्ती
आपल्या आसपास विविध प्रकारची माणसं वावरत असतात आणि त्यांचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रभाव पडतच असतो! मग ती लोकं कुटुंबातली असोत, मित्रमंडळींपैकी असतो किंवा तुमच्या ऑफिस मधले कलीग असोत!
पण यापैकी प्रत्येक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन येते असं नाही, काही लोकं ही खूप निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचारांचे असतात, त्यामुळे अशा लोकांपासून शक्यतो अंतर ठेवूनच राहिले पाहिजे!
कारण त्यांच्या या विचारांचा आपल्या मनावर परीणाम होण्याची दाट शक्यता असते!
जर आपल्या सोबत एखादी अशी व्यक्ती आहे जी केवळ नकारात्मक बोलते आहे, तर अश्या व्यक्तीला आपण असे म्हणू शकत नाही की तुमच्याकडून खूप नेगेटिव्ह फिलिंग येत आहे.
पण Anxiety disorder असलेल्या व्यक्ती असे बोलायला घाबरत नाही. ते सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेला ओळखतात आणि जर त्यांना कोणी नकारात्मक वाटत असेल तर त्यांना तोंडावर ते हे सांगतात.
–
- सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पदार्थ टाळलेत तर आरोग्याची चिंता करावी लागणार नाही
- ‘हे’ वाचलंत तर आरोग्याची चिंता न करता तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊन फिटही राहू शकता
–
५. जीवन वाचविण्याची क्षमता
Anxiety disorder असलेली व्यक्ती त्या गोष्टींची देखील कल्पना करून घेते जे आपल्यासारखे सामान्य लोक नाही करू शकत.
आणि ही शक्ती सर्व्हायव्हल मॅकॅनिजमच्या स्वरुपात वापरली जाते. म्हणजे जर काही वाईट होणार असेल तर ह्या लोकांना त्याचा आभास आधीच झालेला असतो. अश्यात ते आपल्या आजूबाजूच्या लोकांना सतर्क करतात.
तर Anxiety disorder ह्या मानसिक आजाराचे केवळ वाईट परिणामाच नाही तर ह्याचे काही चांगले परिणाम देखील आहेत.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.