Site icon InMarathi

भारतीय स्थापत्यशास्त्राची कमाल; घनदाट जंगलात लपलेलं महाकाय “श्रीयंत्र मंदिर”!

yantra final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विविध लेणी, ऐतिहासिक वास्तू, मंदिर यांची झालेली उत्कृष्ट बांधणी आणि त्यावर केलेलं आखीव रेखीव कोरीव काम यामुळे भारतातील स्थापत्य शास्त्र किती प्रगत आहे याची आपल्याला नेहमी प्रचिती येते. हे स्थापत्य कलेचे उत्कृष्ट नमुने पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक भेटी देत असतात.

अमर कंटक हे मध्य प्रदेशातील धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे असलेलं श्री यंत्र महामेरू मंदिर हे भारतीय स्थापत्य कलेचा अजून एक नमुना म्हणता येईल.

 

 

श्री यंत्र महामेरू मंदिर हे अमर कंटक मध्ये सुमारे ३५०० फूट उंचीवर मैकल, सातपुडा आणि विंध्य पर्वत रांगांच्या मध्यभागी घनदाट जंगलात तयार केले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मी, सरस्वती, काली आणि भुवणेश्र्वरी यांच्या मुखांसह हे ४ मस्तकी असलेलं एक मोठे शिल्प आहे. त्यांच्या खाली ६४ योगीनींच्या किंवा देवींच्या सहकाऱ्यांच्या बारीक शिल्प कृती आहेत.

प्रत्येक बाजूला १६ म्हणजेच ४ बाजूंना मिळून ६४ अशी त्यांची विभागणी केली आहे. याशिवाय गणेश आणि कार्तिक यांच्या देखील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. इतकं भव्य आणि रेखीव प्रवेशव्दार असल्याने हे मंदिर अधिकच नाविन्यपूर्ण आहे.

श्री यंत्र हे धनाशी संबधित आहे हे आपल्याला माहीतच आहे. लक्ष्मी माता ही संपत्ती ची देवी आहे. या यंत्राची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. ह्या मंदिराचे निर्माण कार्य १९९१ पासून सुरू झालं असून हे मंदिर अजूनही निर्माणाधिन आहे.

 

कारण फक्त गुरू पुष्प योगाच्या शुभ दिवशी त्याची बांधणी होते. त्यासाठी खास शिल्पकारांना दक्षिण भारत आणि पश्चिम बंगाल मधून बोलावलं जातं.
महामेरू मंदिर हे द्विमितीय श्री यंत्र किंवा श्री चक्राचे त्रि- आयामी प्रक्षेपण आहे, जे हिंदू धर्मातील श्री विद्या उपासनेचा गाभा आहे. त्रिपुरा सुंदरा देवी आणि तीन जगाच्या सम्राज्ञी सौंदर्यांची दैवी शक्तीची पूजा करते. थोडक्यात हे मंदिर महाशक्तीच्या संकल्पनेचे भूमितीय प्रतिनिधित्व करते.

 

 

 

अटल आखाड्याचे आचार्य मंडलेश्वर श्री स्वामी शुकदेवानदजी यांच्या कडून 28 वर्षांपासून सुरू असलेला हा मोठा प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे. तेंव्हा भारतीय स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना असणाऱ्या या मंदिराला नक्कीच भेट द्यायला हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version