आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या गरजेसाठी का होईना, इंग्रजांनी भारतात जशा अनेक सुविधा आणल्या आणि सोयी केल्या त्यात रेल्वेमार्ग, रस्ते यांचा समावेश आहे. तसाच समावेश आहे थंड हवेच्या ठिकाणांचा!
भारतीय उष्ण कटिबंधातील हवामान या गोर्या लोकांना मानवत नसे म्हणून त्यांनी भारतातील अनेक थंड हवेची ठिकाणे शोधली आणि विकसित केली. त्यापैकी काही मुंबई जवळ आहेत. ती म्हणजे लोणावळा, खंडाळा आणि माथेरान. यापैकी माथेरान च्या शोधाची कथा देखील खूप रंजक आहे.
शहरी गोंगाटापासून आणि गर्दीपासून फक्त ५० किलोमीटरवर असलेले माथेरान शांत आणि निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे.
तमाम मुंबईकर आणि पुणेकर यांचे आवडते ठिकाण म्हणजे माथेरान. पण तुम्हाला माहिती आहे का या माथेरानची जन्मकथा? नाही ना? चला तर मग जाणून घेवूया.
१८५० मधली घटना, ठाण्याचे कलेक्टर असलेले हयू. पी. मॅलेट हे एकदा पुण्याहून ठाण्याला परत येत होते. त्यावेळी माथेरान डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावातील एका बंगल्यात त्यांनी मुक्काम केला. त्यावेळी तेथून जवळ असलेल्या माथेरानच्या डोंगरावर फिरायला जाण्याचे त्यांनी ठरवले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
जसजसे ते टेकडीच्या माथ्यावर जाऊ लागले तसतसे तिथे असलेल्या आल्हाददायी वातावरणाने आणि निसर्गसौंदर्याने ते प्रभावित झाले. डोंगरावरील शुद्ध हवा आणि थंडावा यांनी ते खुश झाले आणि त्यांनी त्या जागेचा आणखी शोध घेण्याचे ठरवले. त्यानुसार तेथील माती आणि दगड यांचे परीक्षण केले असता ही जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होवू शकते हे त्या अधिकार्याच्या लक्षात आले.
ब्रिटिश अधिकार्यांच्या विश्रांतीसाठी त्याजागी एक छोटे शहर विकसित केले जाऊ शकते हे लक्षात आल्यावर त्यांनी तेथील जागेची साफसफाई सुरू केली त्याचबरोबर जंगलांमध्ये लपलेल्या वाटा शोधून काढल्या. इतकेच नाही तर सृष्टीसौंदर्य टिपण्यासाठी अनेक ठिकाणे देखील शोधून काढली.
मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांना माथेरान इतके आवडले की त्यांनी त्या जागेला आपले दुसरे घर मानले. रेसकोर्सपासून टेनिस कोर्ट, हॉस्पिटल, चर्च अशा अनेक जागा त्यांनी तेथे विकसित केल्या.
त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली आणि ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पॉइंट पाहण्यासारखे आहेत.
शार्लोट लेक : मार्केटपासून १ कि.मी. अंतरावर हे तळे आहे. येथील पाण्याचा मुख्य स्रोत हे तळेच आहे
पॅनोरमा पॉईंट : उत्तर टोकावरील या पॉईंटच्या पूर्व व पश्चिम बाजूला दरी आहे. इथून पूर्वेच्या बाजूला नेरळ, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा मुलुख दिसू शकतो. हा मार्केटपासून लांब म्हणजे साडेपाच कि.मी. अंतरावर आहे.
–
- मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या या महामार्गाचा ज्वलंत इतिहास फारसा कुणाला ठाऊक नाही!
- ही आहेत मुंबईतील झकास ठिकाणं : ११ आणि १८ व्या ठिकाणांना तुम्ही भेट दिलीच नसेल
–
सन सेट पॉईंट : ह्या पॉईंटच्या समोरच प्रबळगड दिसतो. मार्केटपासून अंतर साधारण साडेतीन कि.मी. आहे. सन सेट पॉईंटखालून वाघाच्या वाडीतून ट्रेकिंग करत वर येता येते.
चौक पॉईंट : हा पॉईंट माथेरानच्या दक्षिणेकडे आहे. येथून खाली चौक गाव दिसते, म्हणून या नावाने तो ओळखला जातो. इथे जवळच वन ट्री हिल पॉईंट आहे, त्या पॉईंटच्या समोरच मति गुंग करणारी भीषण दरी आहे. इथून जाणारी पायवाट एका सुळक्याला जाऊन मिळते. त्या सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते, तो सुळका म्हणजे वन ट्री हिल पाईंट.
गार्बट पॉईंट सर्वात दुर्लक्षिलेला पॉईंट आहे. एका बाजूला दरी व दुसऱ्या बाजूला जंगल अशा रस्त्यावरून चालत आपण या पॉईंटला येतो. इथे येण्यात खरी मजा पावसाळयात आहे. धुक्यांनी वेढलेल्या जंगलातून पावसाळयात भटकण्याची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी पावसाळा ही इथे भेट देण्यासाठीचा उत्तम मोसम आहे.
पावसाच्या माऱ्यामुळे कुठल्याही पॉईंटला जाणे शक्य होत नाही. पण धुक्याचे लोट अंगावर घेण्याची ज्यांना आवड आहे, त्यांनी पावसाळ्यातही जरूर यावे.
इथल्या लोकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे. मार्केटमध्ये बऱ्याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स आहे. सांबराच्या कातड्याच्या वहाणा व बूट, तसेच वेताची काठी, छोटया छोटया चपलांचे सेट अशा बऱ्याच वस्तू इथे स्थानिक विक्रेते विकताना दिसतात.
इथे माकडांचे प्रमाण जास्त आहे. आपण खात असताना हातातील खाद्यपदार्थांचा पुडा पळवून नेऊ शकतात, इतकी ती माणसाळलेली आहेत.
इंग्रजांच्या ताब्यातून माथेरानची सुटका करण्यासाठी तिथेही सशस्त्र क्रांतीचा लढा झाला होता, ज्याचे नेतृत्व माथेरानचे भूमिपुत्र ‘वीर भाई कोतवाल’ यांनी केले. आजही माथेरानच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्याला पहावयास मिळतो.
माथेरानचे आणखी एक खास वैशिष्टय म्हणजे तेथे असणारी छोटी रेल्वे. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते.
त्याकाळात आदमजी पिरभोय या मुंबईतील व्यापर्याने ही रेल्वे सुरू केली. तेव्हा हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी तेव्हा तब्बल १६००००० रुपये खर्च आला होता. आता ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे.
याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरान घोड्यावरून फिरावे लागते.
भारत स्वतंत्र झाल्यावरदेखील माथेरान हे विशेषत: मुंबई आणि पुण्यातील लोकांसाठी लोकप्रिय डेस्टीनेशन बनले आहे. पण माणसांचा वाढता वावर आणि त्यामुळे वाढलेले प्रदूषण ही माथेरानची ताजी समस्या आहे.
माथेरान बचाव समितीच्या प्रयत्नाने आता माथेरान संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. माथेरानची कहाणी सांगणारा हा लेख तुम्हाला कसं वाटला ते आम्हाला अवश्य कळवा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.