' ३० ml च्या पेगवरून विद्यार्थ्यांना झापणारा प्रोफेसर ‘४२०’ गिरी साठी गजाआड! – InMarathi

३० ml च्या पेगवरून विद्यार्थ्यांना झापणारा प्रोफेसर ‘४२०’ गिरी साठी गजाआड!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सोशल मीडियावर आज कोणतीही गोष्ट अगदी काही कालावधीत इतकी व्हायरल होते की नंतर आपणच ते सारखं सारखं बघून कंटाळतो. कतरीना कैफने लग्न झाल्यानंतर केलेला शिरा असो किंवा बादशाहचे एखादे गाणे असो, आपल्याकडील सोशल मंडळी लगेचच त्याचा किस काढायला सुरवात करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मध्यंतरी अशाच एका प्रोफेसरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात विद्यार्थ्याने ऑनलाईन क्लास चालू असताना विचारलेल्या प्रश्नावरून हा प्रोफेसर भडकला होता. तो प्रश्न असा होता की प्रोफेसर विद्यार्थ्याने विचारले की एका क्वार्टर म्हणजे किती? एक मुलाने पटकन लिहले ३० ml यावरून तो प्रोफेसर भडकतो, काही सेकंदाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. विद्यार्थ्यांवर डाफरणाऱ्या या शिक्षकाला पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपांखाली अटक केली आहे, काय आहे नेमकी भानगड चला तर मग जाणून घेऊयात…

 

dhawal inmarathi

 

नेमकी काय भानगड?

रायपूर येथील जे. के शाह एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कोचिंग क्लासेसच्या शाखेला १ करोडचा चुना लावल्या प्रकरणी रायपूर पोलिसांनी या प्रोफेसरला मालाड येथून अटक केली आहे.

या प्रोफेसरचे नाव धवल पुरोहित असून क्लासेसच्या नावाखाली CA,CMS करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फी जमा करून ती क्लासच्या मालकाकडे न देता परस्पर त्याने आपल्या खाजगी अकाऊंटमध्ये टाकली. यामध्ये त्याचा साथीदार देखील आहे, त्याच नाव अभिनंदन बाफना असून त्याला  नोव्हेंबरच्या सुरवातीलाच रायपूर येथून अटक करण्यात आली आहे.

 

jk inmarathi

जितेंद्र शाह हे जे. के कोचिंग क्लासचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. CA,CMS सारख्या विषयांमध्ये जे.के क्लासेस अग्रेसर आहेत. आज देशभरात ५२ शाखा या क्लासेसच्या सुरु झाल्या आहेत. जितेंद्र शाह यांच्या क्लासला फी जमा होत नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. ही फसवणूक जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान झाली आहे असे रायपूर पोलिसांचे म्हणणे आहे.

 

jk inmarathi 1

 

रायपूर पोलीस अधिकारी रामचंद्र साहू म्हणाले की, आम्ही मुख्य आरोपी धवल पुरोहित याला अटक केली असून जो यामागचा मुख्य सूत्रधार आहे. दोन्ही आरोपी तितकेच या कटात सहभागी असल्याने आम्ही त्या दोघांना अटक केली असून त्यांच्याजवळील मोबाइल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करत आहोत.

 

keral police inmarathi

 

धवल पुरोहित आहे तरी कोण?

CA आणि CMS यासारख्या परीक्षांसाठी ednovate नावाच्या ऑनलाईन कोचिंग इन्स्टिटयूटचा संस्थापक आहे. त्या व्हायरल व्हिडिओमुळे तो चांगलाच प्रसिद्धीमध्ये आला होता.

dhawal final inmarathi

 

आज स्पर्धा परीक्षांसाठी अनेक पालक आपल्या पाल्याला कोचिंग सेंटरमध्ये घालत असतात. वाढत्या स्पर्धेमुळे कोचिंग सेंटर्स देखील जोमात आहेत मात्र नक्की या संस्था कितपत दर्जाच्या आहेत याची काळजी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे, अन्यथा फसवणुकीसारखे प्रकार वाढत चालेल आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?