' अमेरिकेच्या मातीमध्ये तयार झालेल्या विशाल “श्रीयंत्राचे” रहस्य! – InMarathi

अमेरिकेच्या मातीमध्ये तयार झालेल्या विशाल “श्रीयंत्राचे” रहस्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

जगात सर्वात सभ्य आणि विकसित मानल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये एक असे कोडे आहे ज्याचे उत्तर आजवर कोणालाही सापडलेले नाही.

अमेरिकेचे सर्व शास्त्रज्ञ, निसर्गाचे जाणकार आणि यू.एफ.ओ ची माहिती असणारे तज्ञ सर्वाना एकच प्रश्न पडलेला आहे की हिंदूंचे प्रचंड मोठे श्रीयंत्र अमेरिकेमध्ये कसे काय निर्माण झाले???

इडाहो एअर नॅशनल गार्डचा पायलट बिल मिलर १० ऑगस्ट १९९० रोजी आपल्या नियमित प्रशिक्षण उड्डाणासाठी गेला होता. अचानक त्याने ओरेगॉन प्रांताच्या एका सुकलेल्या तलावाच्या रेतीवर कोणतीतरी विचित्र आकृती बघितली.

 

shree yantra inmarathi

ही आकृती अंदाजे अर्धा मैल लांब-रुंद आणि पृष्ठभागात जवळपास तीन इंच आत दबलेली होती. बिल मिलर दचकला, कारण जवळपास ३० मिनिटे आधीच त्याने या मार्गावरून उड्डाण केले होते आणि तेव्हा तिथे अशी कोणतीच आकृती दिसत नव्हती.

त्याच्या व्यतिरिक्त इतरही पायलट याच मार्गावरून सारखे उड्डाण करत होते. त्यांनी सुद्धा ही विशाल आकृती निर्माण होत असताना किंवाती आकृती कोणी बनवत असल्याचे कधीच बघितले नव्हते.

आकृतीचा आकार एवढा मोठा होता की, कोणत्याही पायलटच्या नजरेतून ती निसटून शकत नव्हती.

 

desert sri sri-yantra-marathipizza01

 

सेनेच्या लेफ्टनंट पदावर कार्यरत असणाऱ्या बिल मिलरने लगेचच त्याचा अहवाल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला की, ओरेगॉन प्रांतातील सिटी ऑफ बर्न्स पासून सत्तर मैल दूर सुकलेल्या तलावाच्या दगडांवर कोणतीतरी रहस्यमय आकृती दिसत आहे.

मिलर ने आपल्या अहवालात लिहिले की, ही आकृती तिच्या आकार आणि रेषांच्या ठराविक रचनेवरून कोणत्यातरी मशिनची असल्यासारखी वाटते.या बातमीला जवळपास ३० दिवसांपर्यंत लोकांपासून लपवून ठेवले होते, कारण तिथे लगेचच बघ्यांची गर्दी झाली असती.

परंतु नंतर १२ सप्टेंबर १९९० ला पत्रकारांना या बद्दल समजलेच.

सर्वात पहिल्यांदा बोईस टीव्ही स्टेशनने या बाबतची बातमी दर्शकांपर्यंत पोहचवली.

जेव्हा त्या आकृतीला काही लोकांनी बघितले तेव्हा लगेच त्यांच्या लक्षात आले की, हे हिंदू धर्माचे पवित्र चिन्ह ‘श्रीयंत्र’ आहे, परंतु कोणालाही हे समजत नव्हते की, हिंदू आध्यात्मिक यंत्राची विशाल आकृती ओरेगॉनच्या दुर्गम जागेवर कशी आणि का निर्माण झाली?

 

desert sri sri-yantra-marathipizza02

 

१४ सप्टेंबरला अमेरिका असोसिएटेड प्रेस आणि ओरेगॉनची बँड बुलेटीनने सुद्धा ही बातमी प्रामुख्याने दाखवली आणि त्यावर चर्चा चालू झाल्या.

बातमीपत्रांनी शहरातील प्रसिद्ध वास्तूतज्ञ व अभियंत्यांना संपर्क केला, त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त करताना सांगितले की, एवढी मोठी आकृती बनवण्यासाठी फक्त जमिनीवर सर्वे जरी करण्याचे ठरवले तरी कमीत कमी १ लाख डॉलरचा खर्च येईल.

श्रीयंत्राची खूपच कठीण असणारी संरचना बघून ते नुसते कागदावर काढणे सुद्धा कठीण होते, तर सुकलेल्या तलावात अर्ध्या मैलाच्या लांबी आणि रुंदीचे श्रीयंत्र स्वत:हून बनवणे खूपच कठीण काम आहे.

ही आकृती कितीही प्रयत्न करून एका रात्रीतही पूर्ण होऊ शकत नाही. अनेकांनी असेही मत मांडले की ही नक्कीच मनुष्याची कृती नाही आहे. नंतर इतर शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनाही हे मान्य करावे लागले की या आकृतीमागे काहीतरी मोठे रहस्य आहे.

desert sri sri-yantra-marathipizza03

 

युएफओ वर रिसर्च करणारे दोन शास्त्रज्ञ डोन न्यूमन आणि एलेन डेकर यांनी १५ सप्टेंबर रोजी आकृती असलेल्या ठिकाणी जाऊन एक अहवाल तयार केला!

त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही मशीन अथवा चाकांचे कोणतेच निशाण दिसले नाही,परंतु त्यांच्या स्टेशनच्या गाडीचे निशाण लगेच त्या दगडांवर दिसून आले.

ओरेगॉन विश्वविद्यालयाच्या डॉक्टर जेम्स देदरोफ यांनी युएफओ आणि अलौकिक शक्तींच्या संबंधित रिसर्च करून पेपर लिहिला होता जो “ए सिम्बल ऑन द ओरेगॉन डेजर्ट”च्या नावाने १९९१ ला प्रकाशित झाला.

 

desert sri sri-yantra-marathipizza04

 

अनेकांना अनेक वर्षे प्रयत्न करून देखील अजूनही हे कोडे उलगडलेलं नाही की, अमेरिकेत कधी, कसे आणि का निर्माण झाले हे विशालकाय श्रीयंत्र??? 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?