' सहजीवनाचा निर्भेळ आनंद; लग्नाआधी प्रत्येक पुरुषाने समजून घेण्याच्या १३ गोष्टी – InMarathi

सहजीवनाचा निर्भेळ आनंद; लग्नाआधी प्रत्येक पुरुषाने समजून घेण्याच्या १३ गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या संस्कृतीने काही गोष्टींच्या बाबतीत आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. एक उन्नत जीवन जगण्याची नेमकी पद्धती आपण विसरत आहोत. आदर्श आयुष्य कुणीच जगू शकत नाही. पण, किमान त्या दिशेने वाटचाल करण्याचा तरी प्रयत्न नक्कीच करू शकतो.

लग्न ही आपल्या आयुष्यातील अशीच एक गोष्ट आहे, जी आयुष्याला अत्यंत सुंदर आणि सुखद प्रवास बनवू शकतो. पण, बऱ्याचदा एका स्त्रीकडे, विशेषतः ही आपली सहचारिणी होणार आहे, तिच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहावे, सेक्स, नातेसंबंध, लग्न आणि या सर्वांशी निगडीत आपली भूमिका काय असली पाहिजे हे बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते.

नात्यातील उत्तरध्रुव समजून घेण्यातच आपण कमी पडतो. ही एक अशी अवस्था आहे, जिथे आपण निस्वार्थ प्रेम, सदृढ कुटुंब आणि आपल्या मुलांचे सुखी भविष्याची हमी मिळवू शकतो. परंतु, या सर्वाच्या सुरुवातीला आपण लग्न म्हणजे काय आणि सुखी लग्न म्हणजे काय याची व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे.

लग्नाआधी प्रत्येक पुरुषाने या गोष्टी ध्यानात घेतल्यास आयुष्याचा सहजीवनाचा निर्भेळ आनंद त्यांना अनुभवता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

  1.  

१. लग्न म्हणजे एक मुलभूत घटक आहे

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं मीलन आहे. अवघ्या कुटुंबाला दिशा देणारा घटक आहे. निर्व्याज प्रेमाची अनुभूती म्हणजे लग्न होय.

marriage inmarathi

२. फक्त घेणारे नको, देणारे व्हा

नात्यात फक्त घेणारे होऊ नका. नात्याचा आनंद  द्विगुणीत करायचा असेल तर, नात्याला वेळ, त्याग आणि समर्पण द्या. पत्नीचा आदर करा. पत्नीला मैत्रिणीच्या नजरेतून समजून घ्या. नाते दृढ होण्यासाठी त्याला वेळ द्या.  जितका आदर सन्मान प्रेम काळजी यांची अपेक्षा तुम्ही तिच्याकडून करता तितकीच तुम्हीही द्यायला हवी.

is She in Love Inmarathi

३. प्रेमाचा खरा अर्थ समजून घ्या

जितका प्रेम तुम्ही दुसऱ्याला त्याल तितकेच तुम्हालाही मिळेल. पत्नीला प्राधान्य द्या. तुम्ही स्वतःहून दिला जितके प्रेम, द्याल तितके तिच्यातील गुण उजळतील. ती देखील एक उत्तम सहचारिणी होण्याचा प्रयत्न करेल.

plantonic love article

४. एका चांगल्या प्रियकराची भूमिका

पत्नीच्या भल्यासाठी तिच्या आनंदासाठी जितके चांगले करता येईल तितके करण्याचा प्रयत्न करा. तिच्यासाठी जे काही कराल ते उत्साहाने आणि आनंदाने करा. तिच्या आनंदात तुमचा आनंद सामावलेला आहे, हे ध्यानात घ्या.

loveyatri inmarathi

५. समाधानी वैवाहिक आयुष्य

कामजीवनाचा आनंद ही एक सर्जनशील कृती आहे. नात्यात प्रेम, आदर सन्मान असेल तर, ही क्रिया एक भौतिक किंवा कृत्रिम आनंद वाटत नाही. पण, फक्त वैयक्तिक आनंद, स्वहित, शरीर तृप्ती एवढ्याच नजरेने याकडे पाहणार असाल तर, यामुळे उध्वस्त झालेली अनेक कुटुंबे आजूबाजूला पाहायला मिळतील.

hindustantimes.com

६. एकनिष्ठता

अनेकदा आपल्या समोर असे चित्र उभे केले जाते की, आपण अनेक साधनाद्वारे आपली लैंगिक गरज शमवू शकतो. पण, जसे की एखादे व्यसन तुम्हाला आनंद देऊ शकत असले तरी ते तुम्हाला तृप्त करू शकत नाही. तसेच काहीसे सेक्स बाबतीत सुद्धा आहे.

सेक्स इमेजेस, व्हिडीओ, किंवा अनैतिक मार्गाने मिळवलेला लैंगिक आनंद यामुळे तुम्ही कधीही स्वतःला समाधानी पाहू शकणार नाही. उलट, स्वतःच्या पत्नीशी एकनिष्ठ राहणारा, तिचा प्रेमळ, काळजी घेणारा प्रियकर झाल्यास त्यातील अत्युच्च आनंदाची अनुभूती तुम्हाला नक्की मिळेल.

 

what women wants after sex-inmarathi08
pinterest.co.kr

७. सुरुवातीची काही वर्षे अस्सल स्वर्गीय सुखाची असतात

लग्नाची सुरुवातीची काही वर्षे ही अगदी स्वर्गीय सुखासमान भासतात. या काळात आपण आणि आपला जोडीदार देखील प्रेमाच्या स्वप्नील कल्पनेत रममाण झालेलो असतो. पण, हळूहळू दिवस सरतील तसे, या स्वर्गीय अनुभूतीतून बाहेर यावे लागते आणि आपण एक सर्वसामान्य जीवन जगू लागतो. याचा अर्थ आपल्यातील प्रेम संपले असा मात्र होत नाही.

 

८. लग्नाआधी शरीरसंबंध ठेवल्याने स्वर्गीय सुखाचा काही काळ आपण लग्नाआधीच जगून घेतो, हे ध्यानात घ्या

तुम्ही आणि तुमचा जोडीदार जर लग्नाआधी पासूनच शरीर संबंध ठेवत असाल तर, लग्नानंतर तुम्हाला त्यातील गंमत अनुभवता येणार नाही. बऱ्याचदा लग्नाआधीच शरीरसंबंध ठेवणाऱ्या जोडप्यामध्ये एकमेकांविषयी अविश्वास असल्याचे जाणवते.

 

couple-fight_inmarathi
antekante.com

९. वचनबद्धता हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे

वचनबद्धता हा वैवाहिक जीवनातील सुखाचा मूलमंत्र आहे. काही झाले तरी, मी या नात्यातून बाहेर पडणार नाही असा जर तुमचा ठाम निश्चय असेल तर, येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळते. यामुळे तुमच्या पत्नीचा देखील नात्यावरील विश्वास दुणावतो. तिचा तुमच्यावरील भावनिक विश्वास वाढतो.

coupleboygirl-inmarathi
rekhadhyani.com

१०. लग्न निभावून नेणे ही सोपी गोष्ट अजिबात नाही

लग्न ही काही आपसूक यशस्वी होणारी गोष्ट नाही, अनेकदा बऱ्याच अडचणी येतात. सुरुवातीच्या काळातील रोमांटिक दिवस सरतात आणि नंतर एका सर्वसामान्य आयुष्याला सुरुवात होते. याक्षणी आपल्या आयुष्यातील प्रेम संपले असे वाटू शकते.

पण, तसे न होता इथे नात्यातील उथळपणा संपतो आणि गृहस्थ जीवनाचा नवा आरंभ होतो हे लक्षात घ्या. लग्न टिकवण्यासाठी आपणहून सहज आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात.

Husband Wife InMarathi

११. स्वतःची जबाबदारी ओळखा

आपल्या संसाराचा सुकाणू आपल्याच हातात आहे हे लक्षात घ्या. संसारातील उणीवा, जोडीदाराचे सुखदुख जाणून त्यावर मात करण्यास तिला मदत करणे, तिचा सहाय्यक होणे ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात घ्या.

तुम्ही स्वतःहून जेंव्हा जबाबदारी वाटून घ्याल तेंव्हा नक्कीच तुमच्या सहचारिणीचाही प्रतिसाद तुम्हाला मिळेल. पत्नीच्या चुकांकडे सतत बोट दाखवण्यापेक्षा, स्वतःमध्ये काही बदल करता येतो का पहा. तुमच्या सद्वर्तनाने नक्कीच पत्नीच्याही प्रतिसादात फरक जाणवेल आणि तुमचे नाते आणखी सदृढ होईल.

 

husband housework-inmarathi04
bollywoodshaadis.com

१२. माफ करायला शिका

सहचारिणी कडून काही चुका झाल्यास सतत टोमणे न मारता किंवा अपराधी न ठरवता, तिला समजून घ्या आणि माफ करायला शिका. तुमच्याकडून मिळणाऱ्या या प्रेमामुळे तिच्या वर्तनात नक्कीच सुधारणा होईल.

sorry inmarathi

 

१३. स्वतः पुढाकार घ्या

कुटुंबातील काही निर्णय घेताना स्वतः पुढाकार घ्या पण पत्नीचा सल्ला आवर्जून ध्यानात घ्या. घरातील एखादे काम करताना तुम्ही स्वतः पुढाकार घेतल्यास तुम्हाला साथ देण्यात तुमच्या पत्नीला आनंद मिळेल.

Lovely couple Inmarathi

लग्न ही काही फक्त “मुलाची” किंवा “मुलीची” जबाबदारी नाही. हे पवित्र नाटक टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?