आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बलात्कार हा विषय जितका गंभीर आहे दुर्दैवाने तितक्या गांभीर्याने आपल्या देशातील लोक घेत नाहीत. देशात कायदे बनवण्यापासून तर त्याची अंमलबजावणी करणाऱ्यांपर्यंत फार कमी लोकांना ह्या गंभीर विषयाशी काही घेणे देणे आहे असेच चित्र दिसून येते.
सर्वसामान्य लोकसुद्धा असा गुन्हा घडल्यावर त्याबद्दल तावातावाने फार तर एक दोन दिवस चर्चा करतात, सोशल मीडियावर काही दिवस याबद्दल पोस्ट टाकतात आणि नंतर त्या पीडित व्यक्तीबद्दल विसरून जातात.
प्रसारमाध्यमेसुद्धा फार तर दोन तीन दिवस हा विषय उचलून धरतात आणि नंतर त्यांना चर्वितचर्वण करायला नवा विषय सापडला की हा गुन्हा, त्यासाठी असायला हव्या त्या कडक शिक्षा, पीडित व्यक्तीचे पुनर्वसन ह्या सगळ्या गोष्टी मागे पडतात.
बरं ज्या लोकांच्या हातात कायदा आणि सत्ता असते त्यापैकी अनेक लोक हा विषय विनोदाचा आहे असे समजून त्यावर अत्यंत खालच्या थराचे विनोद करतात. असंवेदनशील वादग्रस्त वक्तव्ये करतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के आर रमेश कुमार यांनी बेळगावी येथे सुरू असलेल्या राज्य विधानसभेच्या अधिवेशनात अशीच एक लिंगभेदी टिप्पणी केली आहे. आर रमेश कुमार सभागृहात म्हणाले की “एक म्हण आहे… जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा आडवे व्हा आणि त्याचा आनंद घ्या.”
रमेश कुमार हे विनोद निर्मितीसाठी बोलले असले तरीही एका जेष्ठ नेत्याने बलात्कारासारख्या गंभीर विषयावर विनोद करणे आणि असंवेदनशील वक्तव्य करणे ह्यावरून दिसून येते की स्त्रियांची सुरक्षितता हा विषय आपल्या देशात किती गांभीर्याने घेतला जातो. आणि महत्वाची बाब म्हणजे असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
सलमान खानसारख्या मोठ्या अभिनेत्यानेसुद्धा सुलतान सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यानसुद्धा असंच एक बलात्कारपीडितेविषयी एक वादग्रस्त विधान केलं होतं जे त्याला चांगलंच महागात पडलं, आणि त्यावरून प्रचंड गदारोळही माजला आणि सलमानला त्याबद्दल माफीदेखील मागावी लागली होती!
–
- ”जर बलात्कार टाळू शकत नसाल, तर एन्जॉय करा”… काँग्रेस नेत्याचे लज्जास्पद वक्तव्य!
- विवाहापूर्वी पत्नीवरील अत्याचाराचा छडा लावण्यासाठी झुंजणा-या लढवय्या पतीची कथा…
–
यापूर्वीदेखील अशाच काही नेतेमंडळी किंवा सेलेब्रिटीजने या विषयावर वादग्रस्त आणि असंवेदनशील वक्त्यव्ये केली आहेत, त्याबद्दलच आपण जाणून घेऊयात.
१. लडके है गलती हो जाती है! – मुलायम सिंह यादव
एप्रिल २०१४ मध्ये, एका सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या तीन जणांच्या फाशीच्या शिक्षेला विरोध करताना, समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते मुलायम सिंह यादव म्हणाले होते, “लडके है गलती हो जाती है!” म्हणजेच मुलांकडून चुका तर होतातच.”
ते असेही म्हणाले होते की मुली मुलांशी मैत्री करतात आणि जेव्हा त्यांच्यात भांडणे होतात आणि मतभेद होतात तेव्हा मुली जाणूनबुजून मुलांवर बलात्काराचे आरोप करतात.
२. “४ पुरुषांनी एका महिलेवर बलात्कार करणे अशक्य आहे”- मुलायम सिंह यादव
२०१४ नंतर २०१५ साली मुलायम सिंह यादव परत एकदा बरळले होते की “एक व्यक्ती बलात्कार करते आणि चार जणांची नावे तक्रारीत येतात. स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी ते पुढे असेही म्हणाले होते की , “४ पुरुषांनी एका महिलेवर बलात्कार करणे अशक्य आहे. मला अशी अनेक प्रकरणे माहित आहेत, जिथे एका व्यक्तीने बलात्कार केला आहे आणि ४ लोकांची नावे अहवालात आहेत. अशीही प्रकरणे आहेत जिथे एका व्यक्तीने गुन्हा केला आहे, एकाच कुटुंबातील ४ भावांना अटक केली गेली.”
३. “दोघांनी केलेला बलात्कार म्हणजे गॅंग रेप नव्हे” – के जे जॉर्ज
२०१५ साली कर्नाटकचे तत्कालीन गृहमंत्री के जे जॉर्ज ह्यांनी असे वक्तव्य केले होते की ,”एका महिलेवर दोन पुरुषांनी बलात्कार केला असेल तर त्या घटनेला सामूहिक बलात्कार म्हणून संबोधले जाऊ शकत नाही.” त्यांनी अशी वादग्रस्त टिप्पणी करून पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून स्वतःवर रोष ओढवून घेतला होता.
प्रसारमाध्यमांनी त्यांना बीपीओ कर्मचाऱ्यावर एका तरुणीवर झालेल्या बलात्काराविषयी प्रश्न विचारले असताना त्यांनी हे असंवेदनशील आणि वादग्रस्त विधान केले. एका बीपीओ कर्मचारी असलेल्या २२ वर्षीय तरुणीवर टेम्पो ट्रॅव्हलरच्या ड्रायव्हर आणि हेल्परने सामूहिक बलात्कार केला होता.
ही घटना ती तरुणी तिच्या कामावरून परतत असताना दक्षिण पूर्व बेंगळुरूमध्ये रात्री १० वाजताच्या सुमारास घडली होती.
४. “बलात्काराच्या गुन्ह्यासाठी महिलांना देखील शिक्षा द्या.” – अबू आझमी
२०१४ साली एसपीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी ह्यांच्यावर बलात्कार पीडितांबद्दल केलेल्या विधानांमुळे टीका झाली.
ते म्हणाले होते की, “जर एखादी महिला (बलात्काराच्या प्रकरणात) पकडली गेली तर तिला आणि मुलाला दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे. भारतात बलात्कारासाठी फाशीची शिक्षा आहे, पण जेव्हा संमतीने विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवले जातात तेव्हा मात्र महिलांना फाशीची शिक्षा होत नाही.”
५. “बलात्काराचा संबंध वाढत्या लोकसंख्येशी आहे”. – ममता बॅनर्जी
२०१३ साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता बोलल्या होत्या की, “बलात्काराच्या वाढत्या घटनांचा संबंध वाढत्या लोकसंख्येशी आहे. तुम्ही म्हणता की बलात्काराच्या घटना वाढत आहेत. पण लोकसंख्याही वाढते आहे. आता अधिक गाड्या आहेत. शॉपिंग मॉल्स वाढत आहेत. तरुण मुले आणि मुली अधिक आधुनिक होत आहेत.”
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
६. “स्त्रियांनी अंधारात घराबाहेर पडू नये.” – बोट्सा सत्यनारायण
दिल्लीत निर्भयावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या संदर्भात बोलताना आंध्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रमुख बोट्सा सत्यनारायण म्हणाले होते की, “भारताला मध्यरात्री स्वातंत्र्य मिळाले याचा अर्थ असा नाही की स्त्रिया अंधार पडल्यानंतर बाहेर पडू शकतात. त्यांनी कमी प्रवासी असलेल्या बसने प्रवास करू नये.”
७. “बलात्काराच्या घटना कमी करण्यासाठी मुला-मुलींनी लहान वयातच लग्न केले पाहिजे.” – ओम प्रकाश चौटाला
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला ह्यांनी २०१२ साली खाप पंचायतीने केलेल्या सिद्धांताचे समर्थन केले. एका खाप पंचायतीच्या सदस्याने महिलांसाठी विवाहयोग्य वयोमर्यादा रद्द करावी आणि मुलींचे लग्न लवकरात लवकर केले जावे अशी विचित्र सूचना केली होती.
“मुले आणि मुलींचे वय १६ वर्षांचे होईपर्यंत लग्न केले पाहिजे, जेणेकरून ते भरकटणार नाहीत. यामुळे बलात्काराच्या घटना कमी होतील,” असे खापचे प्रतिनिधी सुबे सिंग म्हणाले होते.
यावर चौटाला ह्यांनी वक्तव्य केले होते की ,”लोक आपल्या मुलींना मुघलांच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी त्यांचे लवकर लग्न उरकायचे आणि सध्या राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच खापने असा निर्णय घेतला आहे आणि मी त्याचे समर्थन करतो.”
८. “मी माझ्या मुलांना पाठवीन आणि ते लोकांवर बलात्कार करतील.”- तपस पाल
अभिनेता आणि टीएमसी खासदार तपस पाल यांनी पश्चिम बंगालमधील चौमाहा गावात भाषणादरम्यान त्यांच्या विरोधकांवर बलात्कार करणाऱ्यांना सोडण्याची धमकी दिली होती. याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता.
त्या व्हिडिओत पाल म्हणाले होते की, “जर विरोधी पक्षातील कोणी किंवा त्यांच्या बायका-बहिणी इथे असतील तर ऐका, जर तुमच्या लोकांपैकी कोणी तृणमूल काँग्रेसच्या लोकांपैकी कोणाला हात लावला तर मी तुमचा नाश करीन, मी त्यांना सोडणार नाही. मी माझ्या मुलांना पाठवीन आणि ते लोकांवर बलात्कार करतील.”
९. “बलात्कार कधी कधी योग्य असतात.”- बाबुलाल गौर
२०१४ साली बदायूंमध्ये झालेल्या भीषण बलात्कारानंतर, भारतातील काही ज्येष्ठ राजकारण्यांनी अतिशय असंवेदनशील टिप्पण्या केल्या होत्या. सपा प्रमुख मुलायम सिंह यादव सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ‘मुलांकडून चुका घडतात’ असे म्हणताना दिसले.
यावर कहर म्हणजे मध्य प्रदेशाचे गृहमंत्री बाबुलाल गौर म्हणाले होते की, “बलात्कार हा एक सामाजिक गुन्हा आहे जो स्त्री-पुरुषांवर अवलंबून आहे. कधी बलात्कार करणे बरोबर असते, तर कधी चुकीचे असते.”
१०. “नव्वद टक्के बलात्कार हे सहमतीने होतात.” – धर्मवीर गोयत
हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटी (HPCC) सदस्य धर्मवीर गोयत यांनी “राज्यातील बहुसंख्य बलात्कार हे सहमतीने होत आहेत” असे खळबळजनक वक्तव्य केले होते.
हिसार येथे पत्रकारांशी संवाद साधताना गोयत यांनी ही प्रतिक्रिया दिली होती की , “बलात्काराच्या आणि अपहरणांच्या घटनांच्या तपशिलात गेलो तर असे आढळून येते की ९०% प्रकरणांमध्ये पीडित आणि आरोपी हे पळून गेलेले जोडपे आहेत. त्यामुळे अशी प्रकरणे सहमतीने घडतात.”
११. “चाउमीनमुळे हार्मोनल असंतुलन होते आणि अशा कृत्ये करण्याची वासना निर्माण होते.” – हरियाणा खाप पंचायत
तुम्हाला काय वाटले? तेलकट चाऊमीन खाऊन फक्त पोट खराब होते? आता ह्या ‘तज्ज्ञांचा’ निष्कर्ष वाचा. काही काळापूर्वी ३० दिवसांत १९ बलात्कारांच्या मालिकेनंतर हरियाणा खाप पंचायतीच्या नेत्याने असे विधान केले होते की, चाऊमीन हे बलात्काराचे एक कारण आहे.
खाप पंचायतीचे छतर ह्यांनी स्पष्टीकरण दिले होते की, “चाऊमीनमुळे हार्मोनल असंतुलन होते व बलात्कार आणि सेक्स सारख्या कृत्यांमध्ये गुंतण्याची इच्छा निर्माण होते. चाउमीन हे मसालेदार अन्न आहे. त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे देखील तुम्हाला माहीत आहे. म्हणून आपल्या वाडवडिलांनी हलके व पौष्टीक अन्न खाण्याचा सल्ला दिला आहे.”
१२. “महिलांनी प्रक्षोभक पेहराव केला, तर पोलिसही बलात्कार थांबवू शकत नाहीत.” – दिनेश रेड्डी
२०११ साली आंध्र प्रदेशचे माजी पोलीस प्रमुख दिनेश रेड्डी यांनी बलात्कारासाठी “प्रक्षोभक” पोशाखांना जबाबदार धरले होते.
ते म्हणाले होते की, “आता लोकांकडे संपत्ती वाढली आहे, कॉर्पोरेट शैली खेड्यांमध्ये शिरली आहे ज्यामुळे दारू आणि इतर कॉस्मोपॉलिटन संस्कृती वाढीला लागली आहे. ह्या आधुनिक स्त्रियांना
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.