आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दक्षिण भारतातील प्रमुख भाषा म्हणजे तमिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड! दक्षिण भारत वगळता भारतातील इतर भागांमध्ये या चार भाषांबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. अनेक जण तर या चार भाषा एकच समजतात. त्याला कारण म्हणजे त्यांची अक्षरे!
या सर्वच भाषांची अक्षरे पाहायला गेलं तर सारखीच दिसतात. जर कोण्या उत्तर भारतीयासमोर किंवा दक्षिण भारत वगळता भारतातील कोणत्याही व्यक्तीसमोर जर या चार भाषा मांडल्या तर त्याचे सर्व अंदाज चुकतील अश्या या भाषा बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत.
तुमचा देखील या चार भाषांबद्दल चांगलाच गोंधळ उडत असेल, तुमचा हाच गोंधळ दूर व्हावा म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगतोय या चार भाषांमधला फरक!
–
- भाषेच्या उगमाची कथा : रोजच्या वापरातली भाषा कशी निर्माण झाली?
- “मराठी प्रेम” आणि “हिंदी द्वेष” यातील फरक समजू न शकणाऱ्या सगळ्यांसाठी : वाचा, विचार करा!
–
त्या पूर्वी आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे की कोणत्या राज्यात कोणती भाषा बोलली जाते.
१) तमीळ ही तामिळनाडू राज्याची भाषा होय. सोबत ही भाषा पोंडेचेरी या भारताच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये देखील बोलली जाते. आता जाणून घ्या या भाषेबद्दल तुम्हाला माहित नसलेली अजून एक गोष्ट – तमिळ ही श्रीलंका आणि सिंगापूर या देशांची अधिकृत भाषा आहे.
२) तेलुगु ही भाषा आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये सर्वाधिक बोलली जाते. तसेच आसपासच्या इत दाक्षिणात्य राज्यांमध्ये देखील तेलुगु भाषिक मोठ्या संख्येत आढळतात.
३) मल्याळम ही केरळ राज्याची भाषा होय. सर्वाधिक साक्षरता केरळ राज्यामध्ये असल्यामुळे येथून मोठी लोकसंख्या विदेशांमध्ये स्थलांतरीत होत आहे आणि हेच कारण आहे की युरोप खंड, अमेरिका, बहारीन, सौदी अरेबिया, सिंगापूर, फिजी यांसारख्या अनेक देशांमध्ये मल्याळम भाषिक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
४) कन्नड ही कर्नाटक राज्याची भाषा. ही भाषा महाराष्ट्रातील दक्षिणेकडील काही भागात ही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.
अगोदर सांगितल्याप्रमाणे या चारही भाषांची अक्षरांची शैली एक सारखी असल्याने आपला गोंधळ उडतो, त्यामुळे अक्षरांमधील फरक समजावून घेणे गरजेचे आहे. मल्याळम आणि तमिळ भाषेतील जवळपास १५-२० अक्षरे एकसारखीच वाटतात, पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात मोठा फरक आहे. कन्नड आणि तेलुगु अक्षरांच देखील तसंच आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मल्याळम आणि तमिळ भाषेमधील फरक
या चारही भाषांमधील अक्षरे गोल वळणदार आहेत. पण मल्याळम भाषेतील अक्षरे ही तमिळ भाषेपेक्षा अधिक गोल आहेत आणि मल्याळम भाषेतील अक्षरांवर कुठेही वरच्या बाजूस रेष वा दांडी दिसत नाही.
मल्याळम भाषेमध्ये ५१ अक्षरे असून त्यातील केवळ १४ अक्षरांमध्ये जोडलेली सरळ रेष पाहायला मिळते, अन्यथा सर्व अक्षरे रेषाहीन गोल आहेत. उदाहरणार्थ, खाली दिलेले अक्षर पहा. हे आहेत मल्याळम भाषेमधील गोल आणि रेष असलेले अक्षर, ज्याचा उच्चार ‘व’ असा होतो.
तमिळ भाषेमध्ये जवळपास ३६ अक्षरे असून त्यातील तब्बल २६ अक्षरांमध्ये सरळ रेष आढळते. तमिळ भाषेतील सर्व अक्षरे नीट पहिली की लक्षात येतं, त्यात बहुतेक अक्षरांमध्ये इंग्रजी T सारखा आकार आढळून येतो.
तमिळ भाषेतील खालील अक्षरे पहा. त्यात तुम्हाला कुठे न कुठे इंग्रजी T सारखा आकार आढळून येईल.
हा इंग्रजी T सारखा आकार मल्याळम भाषेमध्ये अजिबात आढळत नाही. ही खालील अक्षरे आहेत ‘क’ या उच्चाराची/शब्दाची!
अजून एक उदाहरण पहा, ही खालील अक्षरे ‘न’ या शब्दासाठी वापरली जातात.
मल्याळम/तमिळ आणि कन्नड/तेलुगु भाषेमधील फरक
या भाषांमधील फरक त्यांच्या अक्षरांच्या वक्रतेवरून सहज लक्षात येतो. बहुतेक मल्याळम/तमिळ अक्षरांची वक्रता खालील बाजूस आहे, तर बहुतेक कन्नड/तेलुगु अक्षरांची वक्रता वरील बाजुस आहे.
कन्नड आणि तेलुगु भाषेमधील फरक
या दोन भाषांमधील फरक समजावून घेणे काहीसे कठीण आहे, कारण दोन्ही भाषांमधील अक्षरे एकसारखीच दिसतात. काही अक्षरांमध्ये फरक आहे पण तो देखील अगदीच बारीक! तरीही नीट अभ्यास केल्यास हया दोन भाषांमधील फरक लक्षात येण्यासारखा आहे. आता खालील अक्षर पहा. हे अक्षर दोन्ही भाषांमध्ये ‘क’ या शब्दासाठी वापरले जाते. हे अक्षर दोन्ही भाषांमध्ये अतिशय वेगळ्या शैलीमध्ये लिहिले जाते.
पण इतर अक्षरे अगदीच एकसारखी आहेत. कन्नड भाषेतील अक्षरांच्यावर अगदी छोटेसे वळण असलेली रेष असते. तर तेलुगु भाषेतील अक्षरांवरवर एकतर लहानगा टिंब नाहीतर पूर्णत: वळलेली रेष दिसते.
ही माहिती जरी चारी भाषा पूर्णपणे ओळखण्यास पुरेसी नसली तरी या माहितीच्या आधारे चारही भाषांमधील मुलभूत फरक लक्षात घेता येईल आणि आपल्या मनातील अनेक शंका दूर होतील.
सदर लेख क्वोरा वरील प्रश्नोत्तरावर आधारित आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.