स्वित्झर्लंड-यूरोप विसरा; आपल्याच देशात स्नो-फॉल बघायला जाण्यासाठी ७ बेस्ट जागा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सुरुंच्या झाडामागे होणारा सूर्यास्त, सोनेरी रंगाने झळाळून उठणारी पर्वतशिखरे आणि कापसासारखा भुरुभुरु पडणारा पांढराशुभ्र बर्फ असे विहंगम दृश्य पाहायला मिळणे यासाठी योग यावा लागतो तो बर्फवृष्टीचा. जर तुम्ही आयुष्यातला बराच काळ भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात व्यतीत केला असेल तर तुमच्यासाठी बर्फ्वृष्टीचा आनंद घेता येणे हा दुर्मिळ योग म्हणावं लागेल. पण आता कोरोंनाची बंधने शिथिल होत आहेत तेव्हा तुम्ही हा योग नक्की साधू शकता.
भारतात बर्फवृष्टी पाहण्यासाठी डिसेंबर-जानेवारी हा सर्वोत्तम काळ आहे. उत्तराखंड, जम्मू काश्मीरपासून ईशान्येपर्यंत अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे दरवर्षी हिवाळ्यात सुंदर बर्फवृष्टी पाहायला मिळते.
काश्मीर मधील गुलमर्ग, सोनमर्ग पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, हिमाचल प्रदेशातील मनाली, मसूरी ही बर्फवृष्टी होणारी लोकप्रिय ठिकाणे सोडून भारतात अशी अनेक नयनरम्य ठिकाणे आहेत जी तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतील. आम्ही तुम्हाला अशाच ७ सुंदर ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकता.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
१.सोनमार्ग :
हिमनग, गोठलेले तलाव आणि क्षितिजापर्यंत बर्फाचे गालिचे गुंडाळलेले, सोनमर्ग, ज्याचे अक्षरशः भाषांतर ‘सोन्याचे कुरण’ असे केले जाते , सोनमर्ग हे हिवाळ्यात बर्फाचे नंदनवन आहे, जे हिवाळ्यात बर्फाच्या सुंदर चादरीने झाकलेले असते आणि ते पाहण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे आहे. ट्रेकिंग आणि रिव्हर राफ्टिंगसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात सोनमर्गला जात असाल तर ‘थाजीवास ग्लेशियर’ ला भेट द्यायलाच हवी.
२. नैनिताल :
उत्तराखंड हे राज्य बर्फाचे माहेरघर म्हटले तर त्यात नवल नाही. उत्तराखंडमध्ये चोपटा, औली याबरोबरच अनेक तळ्यांचे नगर नैनिताल हे सुद्धा बर्फवृष्टी साठी आणि तळ्यातील बोटिंग साथी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. नैनितालला अफाट निसर्गसौंदर्य लाभले आहे. इथल्या तलावांच्या संख्येमुळे त्याला ‘भारताचा तलावांचा जिल्हा’ अशी उपमा दिली गेली आहे.
नैनितालमध्ये हिमवर्षाव पाहाण्यासाठी असलेल्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी ‘स्नोपॉइंट’ सर्वात उत्तम जागा आहे, जिथे जाण्यासाठी रोपवेची देखील सोय आहे. जरी आता ते एक व्यावसायिक ठिकाण बनले असले तरी, तुम्हाला येथे मिळणारा अनुभव एक यादगार आठवण बनेल.
३. चादर ट्रेक-लडाख :
लेह-लडाख परिसर प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात बंद रहात असला तरी चादर ट्रेक हा प्रत्येक भटक्या आणि त्रेकर लोकांच्या यादीत खूप वरच्या क्रमांकावर आहे. गोठलेली ‘झांस्कर’ नदी ओलांडून पुढे जाताना ९ दिवसांचा हा एक आव्हानात्मक ट्रेक आहे जो जानेवारीपासून अनेक तुकड्यांमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारीपर्यंत, कधी कधी अगदी मार्चपर्यंत चालू राहतो. यात अनेक गट आणि संघटना सहभागी होतात.
हा ट्रेक नवशिक्यांसाठी नाही. तरीही तुम्हाला भारतातील सर्वात आश्चर्यकारक हिमवर्षाव अनुभवायचा असेल तर चादर ट्रेक तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल. ‘स्टोक कांगरी ट्रेक’ हा देखील चादर ट्रेक सारखाच बर्फ वृष्टी अनुभवण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे.
४. औली :
स्कीइंगसाठी उपयुक्त , बर्फाच्छादित उतारांसाठी प्रामुख्याने प्रसिद्ध , औली हे बर्फवृष्टी पाहण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. सुरुवातीला, ते आताच्यासारखे प्रसिद्ध नव्हते, फक्त एक लहान ऑफबीट हिल स्टेशन मानले जात असे.
‘नंदा देवी, मन पर्वत आणि कामत कामेत’ या हिमालयातील उंच, उंच पर्वतशिखरांच्या काही सुंदर विहंगम दृश्यांमुळे आणि स्कीइंगमुळे ते प्रकाश झोतात आले. येथून तुम्हाला जोशीमठला म्हणजे औलीच्या अगदी जवळ असलेल्या हिंदूंसाठी धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी जाण्याचाही बेत आखता येतो, . औली हे भारतातील हिमालयातील मंत्रमुग्ध करणारी दृश्ये देणारे सर्वोत्तम बर्फाचे ठिकाण आहे.
५. लंबसिंगी :
विशाखापट्टणमच्या चिंतापल्ली मंडळाच्या पूर्व घाटात वसलेले, लंबसिंगी हे आंध्र प्रदेशातील एक छोटेसे गाव आहे. जर तुम्हाला या भागात बर्फवृष्टी पाहायची असेल तर नोव्हेंबर ते जानेवारी हा साधारणपणे लांबसिंगीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे; जरी बर्फ वृष्टी दरवर्षी होत नसली तरी हे गाव निसर्गसौंदर्य, धुक्याच्या चादरीत लपलेल्या सकाळी आणि परिसरातील धबधब्यांसाठी देखील ओळखले जाते.
६. पटनीटॉप :
जम्मू काश्मीरच्या उधमपुर जिल्ह्यातील पटनीटॉप हे हिमालयाच्या ‘शिवालिक’ टेकड्यांमध्ये वसलेले हिल स्टेशन आहे. पाइन,देवदार वृक्षाची जंगले, जवळून वाहणारी ‘चिनाब नदी’ आणि मनमोहक निसर्ग असलेले पटनीटॉप हे छोटेसे गाव भारतातील सर्वात शांत बर्फवृष्टीच्या ठिकाणांपैकी एक समजले जाते. पॅराग्लायडिंग, स्नोबोर्डिंग आणि स्कीइंग साठी हे ठिकाण म्हणजे सर्वोत्तम ठिकाण आहे.
७. हेमकुंड साहिब, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स :
अक्षरशः ‘बर्फाचे सरोवर’, हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स सामान्यतः डिसेंबर ते मे पर्यंत बंद असते. हेमकुंड आणि खोऱ्यातील बर्फवृष्टीसाठी ऑक्टोबर आणि डिसेंबरच्या सुरुवात ही योग्य वेळ आहे . समुद्रसपाटीपासून ४६०० मीटर उंचीवर असलेला येथील गुरुद्वारा, शिखांचे १०वे गुरु गुरु गोविंद सिंग यांना समर्पित आहे. परिसरातील हवामान पाहता त्या ठिकाणी पोहोचणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण अनुभव छान आहे.
–
- गो कॅम्पिंग – मुंबईजवळची ही कॅम्पिंग डेस्टिनेशन्स देतील तुम्हाला अविस्मरणीय अनुभव
- पृथ्वीवरील या अत्यंत सुंदर ठिकाणांवर मनुष्य फारसा गेला नाहीये हे खरं वाटणार नाही…!
–
याखेरीज नरकंडा, रुपकुंड ट्रेक, तवांग, शिमला, डलहौसी-खज्जियार, कटाव ही ठिकाणे देखील हटके आणि निसर्गाने परिपूर्ण असून आनंददायी बर्फवृष्टी चा अनुभव देणारी आहेत. बर्फात ट्रेकिंग असो किंवा शेकोटीच्या शेजारी आरामशीर राहणे असो, बर्फाच्या ठिकाणी जाणे नेहमीच मजेदार असते. तेव्हा या बर्फवृष्टीचा अनुभव आणि आनंद घ्यायचा असेल तर नक्की या ठिकाणांना भेट द्या.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.