Site icon InMarathi

”जर बलात्कार टाळू शकत नसाल, तर एन्जॉय करा”… काँग्रेस नेत्याचे लज्जास्पद वक्तव्य!

rape inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकारण्यांच्या बोलण्यावर कुणाचाही अंकुश नाही, ‘ना त्यांना कायद्याची भिती, ना लोकलाज’ हे सिद्ध करणारी अनेक लज्जास्पद विधानं भारतीय मंत्र्यांनी यापुर्वीच केली आहेत.

लोकप्रतिनिधी हे पद मिरवताना त्यांनी आपल्या विधानांनी जनतेच्या भावना दुखावल्याचीही अनेक उदाहरणं सापडतील. मात्र कर्नाटकमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के आर रमेश कुमार यांनी विधान सभेत नुकतेच केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रातच नव्हे तर देशभरात नवे रणकंदन माजले आहे.

 

 

के आर रमेश कुमार यांच्या वक्तव्यानंतर ‘यांना जनाची नाही, तर मनाचीही नाही’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

संतापजनक विधान

”बलात्कार टाळता येत नसतील तर झोपून ते एन्जॉय करा” असं धक्कादायक, लज्जास्पद आणि माणूसकीला काळीमा फासणारं विधान! केवळ हे शब्द वाचतानाच अंगावर काटा येतो, मात्र विधान सभेत शेकडो आमदारांच्या गर्दीच खुलेआम हे शब्द बोलणारे के आर रमेश कुमार किती निगरगट्ट असतील याची कल्पनाही करता येणार नाही.

 

 

नेमकं काय झालं?

कर्नाटक विधानसभेत आमदारांची चर्चा सुरु होती, ”प्रत्येकालाच आपला मुद्दा मांडायचा होता, मात्र अपुऱ्या वेळेअभावी प्रत्येकाला वेळ दिला तर अधिवेशन आटपायचं कसं?” असा सवाल विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी केला.

त्यांच्या या मागणीवरही विधानसभेतील सदस्य ऐकत नसल्याने अखेरिस कागेरी यांनी हतबलतेने विधान सभेचे माजी अध्यक्ष के आर रमेशकुमार यांच्याकडे पाहिले. निदान त्यांनी तरी यावर भाष्य करत सदस्यांना सल्ला द्यावा यासाठी कागेरी यांनी रमेश कुमार यांना विनंती केली. मात्र यावेळी के आर रमेश कुमार यांची जीभ घसरली.

सदस्यांना शांत करण्याऐवजी उलट त्यांनी वेगळाच पवित्रा घेतला. कागेरी यांनाच समजवण्याचा प्रयत्न करताना रमेश कुमार म्हणाले,” परिस्थिती नियंत्रणात येणार नाही हे ठाऊक झाले, तर त्यावर मार्ग काढत आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचा आनंद घेणे गरजेचे आहे”.

 

 

एवढं बोलूनही ते शांत बसले नाहीत, तर उलट आपले हे विधान पटवून देण्यासाठी त्यांनी उदाहरणाचा आधार घेतला आणि तिथेच त्यांची गाडी घसरली.  ”हिंदी भाषेत एक म्हण आहे, बलात्कार टाळता येत नसतील तर झोपा आणि ते एन्जॉय करा” असं म्हणत आर के रमेशकुमार यांनी पातळी सोडली.

त्यांच्याया विधानावर काहींनी भुवया उंचावत नाखुशी दाखवली, मात्र त्यांच्याचसारख्या काही हिडीस विचारांच्या नेत्यांनी हसून त्यांना दादही दिली.

स्वतःची बलात्कार पिडीतेशी तुलना

बालात्कारासारख्या संवेदनशील विषयावर रमेश कुमार यांनी यापुर्वीही मुक्ताफळं उधळली होती.

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष असताना कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. भाजपचे नेते बीएस येडियुरप्पा आणि इतर वरिष्ठ नेत्यांमधील वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये त्यांचे नाव समोर आलं होतं. ज्यात त्यांनी पक्षाकडून ५० कोटी रुपयांची लाच कशी घेतली याचा उल्लेख स्वत: केला आहे.

 

 

कोर्टात उलटतपासणी घेतल्यावर जसा बलात्कार पीडितेवर पुन्हा पुन्हा बलात्कार होत असल्याचा असंवेदनशील विनोद करत ते म्हणाले होते की, “मला बलात्कार पीडितेसारखे वाटतं.” त्याबाबत जेव्हा महिला आमदारांनी या असंवेदनशील विधानाचा निषेध केल्यानंतर कुमार यांनी माफी मागितली होती.

यांना शिक्षा होणार का?

बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब असतानाच त्यावर लोकप्रतिनिधींकडून अशी हीन दर्जाची विधानं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी आहेत. लोकांचे हित, भावना जपण्याऐवजी बलात्कार, पिडीत महिला यांच्यावर विनोद करून प्रसिद्धी मिळवणाऱ्यांंना वेगळी शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

 

 

बलात्कार हा गुन्हा आहे, त्याचप्रमाणे त्यावर विनोद करून लोकांच्या भावना दुखावणं, केवळ प्रसिद्धीसाठी इतक्या संवेदनशील विषयावर मुक्ताफळं उधळणं हा देखील तितकाच गंभीर अपराध आहे. त्यासाठी अशा महाशयांना शिक्षा व्हावी का? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की मांडा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version