Site icon InMarathi

व्हाईट कॉलर गुंड ते राजकारण व्हाया बॉलीवूड, बाबा सिद्दिकीचा प्रवास!

baba-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

=== 

लेखक – विक्रांत जोशी

===

काही वर्षांपूर्वी बाबा सिद्दिकीच्या घरावर अचानक ईडीने धाड टाकली आणि कित्येक वर्षांपासून बांद्रा विभागात वावरणारा गुंड, ब्लॅकमेलर, सेटलर (मध्यस्थीकार), बोगस नेता बाबा सिद्धीकी याच्या वर्चस्वाला जबर हादरा बसला.

याचे संपूर्ण श्रेय जाते भारतीय जनता पार्टीचे विद्यमान मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांना!

बांद्रा पूर्व विभाग म्हणजे मुस्लीमबहुल भाग! बाबा सिद्दिकी हा देखील इथलाच आणि धर्माने मुस्लीम. त्यामुळे साहजिकच त्याला मुस्लीम समुदायाचा मोठा पाठींबा मिळाला होता.

आणि त्याच पाठिंब्याच्या आधारावर गेली १५ वर्षे त्याने या भागावर हुकुमत गाजवली असे म्हटले तर वावगे ठरू नये.

 

 

सोबतच त्याला साथ लाभली दिवंगत कॉंग्रेस खासदार सुनील दत्त आणि त्यांची कन्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांची. दत्त कुटुंबाचे खासदार म्हणून येथील वर्चस्व आणि बाबा सिद्दिकी याची दत्त कुटुंबियांशी असळलेली जवळीक सिद्दीकीच्या गुंडाशाहीला खतपाणी घालणारी होती.

असो, पण २०१४ साली बांद्र्याच्या राजकारणामध्ये आशिष शेलार यांनी जोरदार मुसंडी मारली आणि त्यांना मोदी लाटेचीही साथ लाभली. त्याचाच परिणाम म्हणून २०१४ च्या निवडणुकीमध्ये बाबा सिद्दिकी पर्व संपले आणि आशिष शेलार युग सुरु झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

२००९ च्या निवडणुकीमध्ये ज्या आशिष शेलारांना केवळ १४०० मतांनी हार स्वीकारावी लागली होती, त्याच आशिष शेलारांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये तब्बल ३०,००० मतांनी विजय मिळवत बाबा सिद्दीकीचा पुरता धुव्वा उडवला.

आज या भागातील सर्वच पॉवरफूल मुस्लीम लॉबीज शेलारांच्या पाठीशी आहेत, कारण त्यांना देखील कळून चुकले होते की धर्माच्या नावावर राजकारण करून, त्यांचा वापर करून बाबा सिद्धिकी आज मोठा झाला आहे.

गेल्या १५-२० वर्षांत या लोकांनी बाबाला निवडून दिले होते पण त्या बदल्यात या भागात साध्या रुपयाचीही सुधारणा झालेली दिसून येत नाही.

बाबाची पाठीराखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिया दत्त यांचे करियर देखील जवळपास संपुष्टात आले आहे. (सध्या बाबा सिद्दिकी त्यांचा सल्लागार म्हणून काम पाहतोय असे कानावर आहे.)

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पूनम महाजन यांच्याकडून हार स्वीकाराव्या लागल्यानंतर बाबा सिद्दिकीचा एकमेव आधार देखील दूर झाला आहे.

 

 

बाबा सिद्दीकीचे आई वडील हे पटण्यामधून मुंबईमध्ये आले होते. बाबाचे पूर्वाश्रमीचे आयुष्य देखील म्हणावे तितके सुसंस्कृत नव्हते. लोकांना सिंगापूरला वगैरे पाठवून तेथील इलेक्ट्रोनिक वस्तू त्यांच्या मार्फत भारतामध्ये लपवून आणण्याचा बाबाचा धंदा होता.

ही एकप्रकारे स्मगलिंगच होती.

बाबा सिद्दिकी हा एक व्यसनी माणूस होता, त्याला दारू भयंकर प्यारी होती. त्याचा मुलगा झीशान हा देखील काही कमी नाही. त्याचे प्रताप दाखवायला बांद्र्याच्या विविध बार मधील सीसीटीव्ही फुटेजेस पुरेशी आहेत.

फुकटची मिळालेली श्रीमंती आणि बापाचा आपल्या भागामध्ये असणारा दबदबा यांमुळे बड्या बापाच्या या पोराला जास्तच शिंगे फुटली होती.

 

२०१२ साली बाबा सिद्दिकीने सुरु असलेल्या  विधानसभा अधिवेशनामधून काढता पाय घेतला होता. का? तर त्याला अर्जंटमध्ये दुबईला जायचे होते.

पण नंतर कोणीतरी बातमी फोडली की त्याला पाकिस्तानातून डी गँगचे बोलावणे आले होते. चकवा देण्यासाठी म्हणून त्याने दुबईवरून पाकिस्तान असा प्रवास केला.

त्या वेळी बाबा सिद्दीकीला डी गँगकडून धमक्या येत असल्याच्या बातम्या न्यूज चॅनेल्सवर बराच काळ झळकत होत्या. जेव्हा बाबाने ऐन विधानसभा सत्रामधून पळ काढला तेव्हा या कृतीपायी त्याने कोम्प्रमाईज म्हणून चांगलीच रक्कम दान केल्याचा आरोप देखील त्याच्यावर केला गेला होता.

खरं सांगायचं तर, बाबा सिद्दिकी याची बांद्रा आणि आसपासच्या हाय प्रोफाईल भागांमध्ये रग्गड प्रॉपर्टी आहे, तसेच त्याची अनेक मॉल्स आणि बिल्डींग्समध्ये देखील भागीदारी आहेत.

याचे बक्कळ पैसे रुपी फळ बाबाला वेळोवेळी मिळत असते, पण तो या फळाचा काही भाग डी गँगला देण्यास कदाचित विसरत असावा।

किंवा आपली ही कमाई त्यांच्या सोबत शेअर करण्याची त्याची इच्छा नसावी आणि हेच कारण आहे की त्याला डी गँगकडून पैश्यासाठी सारख्या धमक्या येत होत्या.

 

 

बाबा सिद्दिकी आपल्या इफ्तार पार्टीसाठी भरपूर प्रसिद्ध आहे. त्याच्या या पार्टीला राजकारणातील, फिल्म इंडस्ट्रीमधील एवढंच काय तर मुंबई प्रशासनामधील अनेक व्यक्ती देखील दिसून येतात.

आता बाबाने त्यांच्यावर एवढा काय प्रभाव पडला आहे ते देवच जाणे!

 

 

 पूर्वी बांद्रामधील प्रत्येक बिल्डरला आपल्या कामामध्ये बाबाला ‘पार्टनर’ करून घेणे जणू बंधनकारक होते.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबा सिद्दिकी हा अजून एक गुंड ‘दिवाण’ याचा देखील निकटवर्तीय आहे.

संपूर्ण बांद्राभर उघडलेली अनधिकृत दुकाने आणि ठेले हे बाबाचीच देण आहेत. पण दबंग महिला अधिकारी ए.एम.सी. पल्लवी दराडे यांनी पुढाकार घेत ही दुकाने आणि ठेले हटवले, त्याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत.

बांद्रा रेक्लेमेशन जवळील नर्गिस दत्त रोडवरील झोपडपट्टी ही देखील माजी खासदार (दत्त कुटुंब) आणि बाबा सिद्दिकी यांच्याच कृपेमुळे निर्माण झालेली आहेत.

कारण एकच – मतांचे राजकारण!

ड्रग्जचा धंदा आणि कॉल गर्लचा बांद्रा परिसरात वाढलेला व्यवसाय याला देखील बाबा सिद्दिकीचीच साथ आहे.

संपूर्ण मुंबईभर बांद्रा हे फॅशन हब आणि राहण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणून ओळखले जाते. पण हे सांगताना अतिशय खेद होतोय की आता हे फॅशन हब आणि राहण्यासाठी सर्वोत्तम जागा राहिलेली नसून तो बेकायदेशीर कृत्यांचा आणि बाबा सिद्दिकीच्या भंपकपणावर भाळलेल्या टपोरी पोरांचा अड्डा झालाय!

पत्रकार विक्रांत जोशी यांच्या फेसबुक पोस्टचा अधिकृत अनुवाद

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version