' मंत्र्याचा दारूमंत्र – “मंत्री ते अधिकारी सर्वजण घेतात, तुम्हीपण घ्या, फक्त प्रमाणात घ्या” – InMarathi

मंत्र्याचा दारूमंत्र – “मंत्री ते अधिकारी सर्वजण घेतात, तुम्हीपण घ्या, फक्त प्रमाणात घ्या”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कालच राज्य सरकारने अशी घोषणा केली की ‘किराणा मालाचे दुकान, बेकरी यासारख्या ठिकाणी वाईनची विक्री करू शकता. सरकारच्या या निर्णयावर समाजातून फार मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसून येत आहे. आधीच पेपर घोटाळे, एसटी संप, मंत्र्यांची वसुली प्रकरणे यामुळे जनतेच्या मनात सरकारबद्दल संभ्रम पसरला आहे.

मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असताना तळीरामांची फार मोठ्या प्रमाणावर पंचाईत झाली होती. सरकारने वाईन शॉप्स खुली करून तळीरामांना खुश केले मात्र जनतेच्या टीकेला  त्यांना सामोरे जावे लागले होते. वाढत्या महागाईने जनता आधीच त्रस्त असतानाच, ‘पेट्रोल डिझेलच्या किंमती आम्ही करू शकत नाही तेच आमचं उत्पन्नाचं साधन आहे’, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केले होते.

 

alcohol sell inmarathi

 

दारू, तंबाखूजन्य पदार्थ, इंधन ही खरं तर सरकारी तिजोरीची मोठी साधन आहेत कारण यातून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असतो. एकीकडे सरकार दारूतून महसूल गोळा करत असत तर दुसरीकडे सरकार दारूबंदीसाठी राज्यात अनेक कार्यक्रम आखत असते.

 

 

हे जरी असलं तर आपल्याकडील काही मंत्री महोदयमंडळी मात्र चक्क दारू पिण्याचा सल्ला लोकांना देत आहेत. नेमके कोण आहेत ते मंत्री महोदय चला तर मग जाणून घेऊयात…

 

army-men-alcohol-inmarathi01
indianexpress.com

 

कोण आहेत ते मंत्री?

बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी  दारूसंदर्भात असे वादग्रस्त विधान केले आहे. हरतांड हायस्कुलमध्ये आयोजन केलेल्या एका कार्यक्रमात ते असे म्हणाले की, डीएम – एसपी पासून ते आमदारपर्यंत सर्व मंत्री अधिकारी, डॉक्टर दारू पितात. त्यांना कोणीही अटक करत नाही. औषध म्हणून थोडेसे अल्कोहोलचे सेवन करणे हे चुकीचे नव्हे.

 

manzi inmarathi

 

ते पुढे म्हणाले की बिहारमध्ये, ‘अनेक नेते, आमदार, खासदार रात्री दहा नंतर दारूचे सेवन करतात. मात्र दारूबंदीच्या नावाखाली गरीब आणि दलित लोकांना अटक केले जाते. हे साफ चुकीचे आहे. एका मर्यादेपर्यंत दारूचे सेवन करणे फायद्याचे असते, असे खुद्द वैद्यकीय शास्त्र सांगते’.

स्वतःच्या घरात दारू तयार व्हायची :

दारू बद्दलचे गोडवे गात देताना असताना मंत्री महोदयांनी आपल्या घरचा देखील उल्लेख केला, ते असं म्हणाले की ‘मी लहान असताना माझे आई वडील दारू बनवायचे, मात्र माझं शिक्षण सुरु झाल्यानंतर त्यांनी दारू बनवणायचे बंद केले. आमच्या देवी देवतांना देखील आम्ही दारू अर्पण करतो. दारूबंदी असताना देखील सरकारने ३ लाख २५ हजार इतक्या मोठ्या प्रमाणवर दारू जप्त केली होती.

 

alcohol inmarathi
asiaone

एकूणच दारूबंदी या कार्यक्रमावर त्यांनी मोठया प्रमाणावर टीका केली, आज दारूमुळे देशात अनेक संसार उध्वस्त होत आहेत. मात्र त्याचा विसर बहुदा मंत्री महोदयांना पडला असावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?