Site icon InMarathi

या राशींच्या जोड्यांची लग्न म्हणजे घराची युद्धभुमी; तुमची रास यात आहे का?

fighting couple inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्नाच्या गाठी स्वर्गात मारल्या जातात हे जरी खरं मानलं तरिही मृत्यूलोकांत येता येता या गाठीच्या अनेक निरगाठी बसतात आणि मग अशा निरगाठी बसलेले नवरा बायको आयुष्यभर एकमेकाच्या राशीला न लागले तरच नवल! या निरगाठी दोघं दोन्ही बाजूंनी सोडविण्यात यशस्वी झाले तर मग सुखी संसार रथाची दोन चाकं वगैरे नाहीतर दोन्हीकडून दोघं दोन टोकं ओढत राहिले तर रथ तर सोडाच पण संसार गाडा गडबडलाच म्हणून समजा.

लग्न सुखी होण्याचा हमखास असा काही उपाय आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे. जी गोष्ट ब्रह्मदेवाला जमणं शक्य नाही तिची अपेक्षा धरणंही चूकच आहे. मात्र आपल्याकडे अशी काही कोष्टकं आहेत, जेणेकरून नवरा बायकोच्या जोड्या जमवतानाच थोडी खबरदारी घेतली तर पुढचा प्रवास बर्‍यापैकी सुरळीत होण्याच्या शक्यता वाढतात. हे कोष्टक काय? तर राशी!

 

 

प्रत्येक राशीचा आपला असा स्वभाव असतो आणि त्या त्या राशीची व्यक्ती ही त्या त्या राशीच्या स्वभावगुणधर्मानुसार वागत असते. आता कोणती रास कशी आहे? हे लक्षात घेतलं तर कोणत्या राशीचं कोणत्या राशीसोबत जुळणं कठीण आहे हे समजेल. आहे नं सोपं गणित?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

चला तर मग या अशा ‘रब ने अजिबातच न बनविलेल्या’ कोणत्या राशींच्या जोड्या आहेत ते पाहू-

१. कर्क – सिंह

या दोन राशी बोहल्यावर एकत्र म्हणजे गृहकलहाची हमखास खात्री. कर्क रास ही नात्यांच्या बाबतीत अत्यंत सजग अशी रास मात्र सिंह ही वर्चस्व गाजविणारी रास! दोन्ही राशींचा अहंभाव तडजोड कोण करणार? यावर अडून बसण्याच्या शक्यता जास्त.

 

 

रोजच्या जगण्यातले छोटे छोटे वादही हे दोघे सहजपणे टोकाला नेऊन ठेवू शकतात. म्हणूनच या दोन राशींचे नवरा बायको असतील तर ते एकत्र सुखात रहाणं हे डॉन को पकडना नामुमकीन ही नहीं मुश्किल है काम.

२. कुंभ – मकर

हे जोडपं तुम्ही बाहेरून बघाल तर अत्यंत आदर्श, एकमेकांत रमलेलं दिसेल. मात्र वास्तवातलं चित्र याउलट असतं. मकर रास अतीसंवेदनशील तर कुंभ रास अति तटस्थ. यांना तर भांडायला कारणाचीही गरज उरणार नाही.

 

लव्ह मॅरेज V/S अरेंज मॅरेज… काय बेस्ट आहे?

एकाचं तटस्थ असणं दुसर्‍याच्या हळव्या स्वभावाला चिडचिडीचं कारण बनेल. त्यातही जर पत्नी मकरची असेल तर बेदर्दी बालमाचे सूर घरात वाजतील.

३. मिथून – कन्या

मिथून ही राशीतली लोकं म्हणजे मज्जानू लाईफ. जमिनीपासून दोन बोटं हवेत उडणारी आनंदी जमात. याउलट कन्या तटस्थ आणि हे कमी म्हणून संशयी म्हणजे मिथूनमध्ये रोमान्स कुटकुटके भरलेला आणि कन्येला या कुटाण्याचा रोजचा ताप.

 

 

 

या दोघांचं एकत्र रहाणं म्हणजे नुसता न संपणारा संगीत संशय कल्लोळ.

४. वृषभ – तूळ

संतुलन राखणं, जमिनीवर रहाणं हे या दोन्ही राशींच वैशिष्ट्य आहेत. दोन्ही राशी नातेसंबंधांना जपण्यावर भर देतात. मात्र या सगळ्याचा एक काळी बाजू म्हणजे या दोन्ही राशींचे याच स्वभाचे घडे कालांतरानं रिकामेही होतात.

 

 

म्हणून सुरवातीला खूप प्रेमात असणारी या राशींची जोडपी नंतर विभक्त होतात कारण एकदा घडा रिकामा झाला की तो पुन्हा भरण्यात दोन्ही राशिंना काहींना रस नसतो. म्हणूनच यांचं एकत्र येणं म्हणजेच एक पल का जीना फिर तो है जाना प्रकार!

५. मीन – वृश्चिक

खरंतर ज्योतिषशास्त्रानुसार ही जोडी आदर्श मानली जाते मात्र या राशींचे स्वभाव मात्र वेगळंच चित्र उभं करतात. मीन राशीचे लोक अतिसंवेदनशिल आणि प्रेमळ तर वृश्चिक मनात प्रेमाचा पूर असला तरिही तो व्यक्त न करणारे अबोल. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, असला यांचा प्रकार असल्यानं सतत प्रत्येक गोष्टित प्रेम व्यक्त करण्याची सवय असणारे मीनवाले यांना वैतागतातच.

 

 

मीन राशीचा नवरा वृश्चिकेच्या बायकोला साधा आईस्क्रिमचा कोन घेऊन येताना एकच आणेल जेणेकरून एका कोनातून खाता येईल वृश्चिक बायको मात्र तो कोन पटकन हातात घेऊन काही कळण्यापूर्वी संपून टाकेल आणि वर नवर्‍याकडे बघून गोड हसेल. यांचे असे सतत क्रॉस कनेक्शन नंतर नंतर खटक्याची कारणं बनतात.

६. कर्क – धनू

एक पूर्व तर दुसरी पश्चिम अशा या दोन टोकाच्या राशीच्या आहेत. धनू म्हणजे काटेकोरपणाला समानार्थी शब्द. वेळ पाळणं हे यांना जिवनमरणाइतकं महत्वाचं तर कर्केला घड्याळ हे वेळही दाखवतं आणि ती पाळण्यासाठी असते हे सांगूनही कितपत कळेल शंका. कर्क म्हणजे साक्षात तंद्री. एकवेळ तंद्री काटेकोरपणाशी जुळवून घेईल पण काटेकोरपणाला तंद्रीचा अक्षरश: जाच होऊ लागतो.

 

 

चुकून यांचं लग्न ठरलं तरिही साखरपुढ्यापर्यंतही या जोडीची गाडी जाणं कठीण. त्यातूनही स्वर्गात मारलीच गेली असेल गाठ आणि झालंचं यांचं लग्न तर पुढे आयुष्यभर फ़क्त भांडत रहातील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version