Site icon InMarathi

विराट कोहलीच्या यशाचं रहस्य वाचून त्याच्याबद्दल आदर अधिकच वाढेल

kohli-hard-work-marathipizza 00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

२७ मार्च २०१६ – T20 विश्वचषक स्पर्धा : भारत – ऑस्ट्रेलिया सामना.

भारतीय संघात, एकूणच भारतीय क्रिकेटमधे, विराट कोहली नावाचा तारा ह्याच दिवशी अढळपदी विराजमान झाला.

५ ओव्हर बाकी आहेत – ३० बॉलमधे ५९ रन हवे आहेत. अश्यावेळी “थकलेला” कोहली, १६ व्या ओव्हरमधे काय कामगिरी करतो?

०-२-२-४-२-२ : ६ बॉलमधे १२ रन. ज्यातले ८ रन्स “डबल्स” आहेत. ह्या ओव्हरमधे खेळाला भारताकडून गती लाभली.

३ ओव्हर बाकी आहेत – १८ बॉल, ३९ रन्स. आणि परत एकदा कोहली धमाल आणतो.

१८ व्या ओव्हरमधे आपण “मजबूत” खेळलो : ४-४-६-२-१-२ .

लक्षात घ्यायला हवं की कोहलीने ह्या ओव्हरमधे २ डबल्स काढले आहेत. ह्या ओव्हरमधे खेळ फिरला. पुढील ओव्हरमधल्या १६ रन्सने विजय पक्का केला.

कौतुक खूप झालं कोहलीचं. ऑनलाईन, ऑफलाईन, TV, प्रिंट-मिडीया…सर्वत्र.

अर्थात भरपूर कौतुक व्हायलाच हवं. पण त्याहून जास्त कशाची चर्चा व्हावी तर – कोहली हे “कसं” करू शकला – ह्याची. असं काय वेगळं केलं विराटने जे इतर कुणी करत नाही?

उत्तर आहे, अर्थातच – systematic hard-work. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात डबल्स काढणं, मोठ्या शॉट्स मारणं ह्यासाठी लागणारा stamina विराटने मेहेनतीने कमावलाय.

श्रीलंका सिरीज आठवतीये? – ज्यातून कोहलीने माघार घेतली होती?

आपला विराट तेव्हापासून stamina वाढवण्यासाठी systematically मेहनत घेतोय.

त्याने अश्या ट्रेनिंग सेशन्समधून practice केली आहे ज्याने तो अत्यंत थकलेल्या अवस्थेतसुद्धा ताजा-तवाना असल्यासारखा खेळू शकेल.

ह्या सरावासाठी विराट ने high altitude masks वापरले होते.

 

सामन्यानंतर प्रेस कॉन्फरंसमधे संजय मांजरेकरांनी विराटच्या जिम आणि डाएटबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला :

You do gun for that and all those fitness regimes paid off tonight. When I’m tired, I should be able to run as fast as when I’m on zero.

 

अश्या अटीतटीच्या प्रसंगासाठी तयार होण्यासाठी विराटने कित्येक आठवडे, महिन्यांआधी मेहनत घेतली होती.

विराटच्या ह्या मेहनतीला सलाम…!

आपणही त्याच्याकडून प्रेरणा घेऊया?

स्त्रोत

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version