' बुंदी, खाण्याचा पदार्थ नाही; हे आहे एक गाव जिथे नक्की जायला हवं! – InMarathi

बुंदी, खाण्याचा पदार्थ नाही; हे आहे एक गाव जिथे नक्की जायला हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजस्थान म्हणजे केवळ जयपूर मधील गुलाबी घरे किंवा जोधपुरमधील साजरा होणारा फेस्टिवल नव्हे. त्याहीपेक्षा ‘पधारो म्हारे देस’ असे म्हणत आपल्या रंगरंगिल्या संस्कृतीने, आदरातिथ्याबरोबरच आपल्या शौर्य, इतिहास, खानपान यांनी पर्यटकांना आकर्षित करणारं राज्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तिथल्या सगळ्याच गोष्टी अजब गजब, आपल्या डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या आहेत. मग ते तिथले महाल असोत, किल्ले असोत की तलाव.. प्रत्येक गोष्ट सौंदर्यपूर्ण आणि आपली कहाणी जपणारी आहेत. तिथली गावे, शहरे देखील तशीच, आपल्या नावासारखीच राजस आहेत. जयपूर, जोधपूर, अजमेर ही काही त्यातील प्रसिद्ध नावे आहेत.

 

Bundi City 2nd Image IM

 

ही नावे सोडून अशीही शहरे आहेत जी राजस्थानी पाचुसारखी आहेत. त्यातील एक नाव म्हणजे ‘बुंदी ‘. आता कदाचित तुम्हाला खायची बुंदी वाटू शकते, पण तसे नाहीये. ‘बुंदी’ हे एका शहराचे नाव असून त्याला संस्कृतिक ,ऐतिहासिक परंपरा आहे. कशी ते पाहूया.

प्राचीन बुंदी प्रदेशावर मीणांच्या ‘उषार’ गोत्राचे राज्य होते, परंतु ‘अक्रंकटा’ राजपूतांनी जुन्या शहराचा नाश केला. सध्याच्या बुंदीची स्थापना ‘राव देवा हाडा’ यांनी १२४२ मध्ये जैता मीनाची कपटाने हत्या करून केली होती. राजा बुंदा मीनाच्या नावावरून या भागाला ‘बुंदी’ असे नाव पडले. पुढे शहरातून वाहणार्‍या नाल्याचे पाणी अडवून नवलसागर तलाव बांधण्यात आला.

राजा देव सिंह यांच्यानंतर राजा बारसिंगने १३५४ मध्ये टेकडीवर तारागड नावाचा किल्ला बांधला. यासोबतच किल्ल्यात राजवाडा आणि तलाव-बावडी बांधण्यात आली. १४व्या ते १७व्या शतकाच्या दरम्यान पायथ्याशी एक भव्य राजवाडा बांधण्यात आला.

 

bundi inmarathi

 

१६२० मध्ये राव रतन सिंह जी यांनी राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी एक भव्य खांब (दरवाजा) बांधला. दोन हत्तींच्या पुतळ्यांनी सजवलेल्या खांबाला ‘हत्तीपोल’ म्हणतात. राजवाड्यात अनेक राजवाडे तसेच ‘दिवाण-ए-आम’ आणि ‘दिवाण-ए-खास’ बांधले गेले.

‘बुंदी’ त्याच्या विशिष्ट चित्रकला शैलीसाठी प्रसिद्ध आहे, राजवड्यातील चित्रकला दालन हे महाराव राजा “श्रीजी” उमेद सिंग यांनी बांधले होते, जे त्यांच्या चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. या चित्र विषयांमध्ये शिकार, स्वारी, रामलीला, स्नान करणारी नायिका, चालणारा हत्ती , सिंह, हरीण, आकाश-पक्षी ही विषयचित्रे प्रामुख्याने पाहावयास मिळतात.

बुंदी हे डोंगरांनी वेढलेले, घनदाट जंगलाने झाकलेले नयनरम्य शहर आहे. हे राजस्थानचे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. बुंदी पार्कला चार दरवाजे आहेत:- चौगन द्वार, मीरा द्वार, खोज द्वार, लंका द्वार असे चार दरवाजे या शहराला आहेत, जे चारही दिशांनी उघडतात. चौगन गेटवरचा मोर हे मनमोहक शैलीचे सुंदर चित्रण आहे. तुम्हाला खरा राजस्थान पाहायचा असेल तर तुम्ही बुंदी शहर पाहावयास हवेच.

सभोवताली असलेल्या अरवली पर्वतारांगा या आणखी एका इतिहासाच्या साक्षीदार आहेत, तो म्हणजे पृथ्वीराज चौहान आणि महम्मद घोरी यांच्यातील युद्ध. या युद्धात जिंकल्यावर घोरीने तारागड किल्ला जिंकला आणि त्याच्या पायथ्याशी असलेले सरस्वती संस्कृत महाविद्यालय उध्वस्त करून त्याजागी एक मुघल शैलीतील बांधकाम केले, ज्याला आज ‘अढाई दिन का झोपडा’ असे म्हटले जाते.

 

bundi inmarathi1

 

संगीत आणि चित्रकला हे बुंदी शहराच्या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. याच कारणामुळे अनेक गायक, संगीतकार, चित्रकार यांचे हे घर आहे. या शहरात बरीच प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. ज्यामध्ये तारागढ़ किल्ला, बुंदी महाल, राणीजी- की- बावडी, नवल सागर, सुख महाल, चौरासी खंबोंकी छतरी, मोती महाल, बादल महाल, जैत सागर आणि फूल सागर हे तलाव आहेत.

याबरोबरच बुंदी चित्रकला शैली देखील प्रसिद्ध आहेत. येथील चित्रांमधील स्त्री पात्रे अतिशय आकर्षक आहेत. तीक्ष्ण नाक, पातळ कंबर, लहान आणि गोल चेहरा इत्यादी स्त्री चित्रणातील मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

महिला लाल-पिवळे कपडे घालताना जास्त दाखवल्या जातात. बुंदी शैलीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पार्श्वभूमीचे लँडस्केप. चित्रांमध्ये कडाळी, आंबा आणि पिंपळाची झाडे तसेच फुले आणि वेलींचे चित्रण आहे. चित्राच्या वरच्या बाजूला झाड बनवणे आणि खाली पाणी, कमळ, बदके इत्यादी रंगवणे हे बुंदी चित्रकलेचे वैशिष्ट्य होते. 

रंग रंगिल्या राजस्थानचा असाही एक अनोळखी चेहरा आहे जो आपल्याला बुंदी मध्ये सापडतो. तेव्हा मित्रांनो राजस्थानच्या सहलीला जाल तेव्हा बुंदी शहराला अवश्य भेट द्या.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?