Site icon InMarathi

सोनिया गांधींनी सुद्धा निवडणुकांच्या आधी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेणार होत्या पण

sonia final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

परीक्षा जवळ आल्या की हमखास विद्यार्थी आपापल्या देवांचा धावा करतात आणि देवाकडे थेट सौदाच करतात. परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यास करणे! अभ्यास न करता कोणताच देव तुम्हाला उत्तम मार्क देऊ शकत नाही. मात्र याचा विसर अनेकांना पडलेला असतो.

एरवी विद्यार्थी त्याच देवांकडे चुकून सुद्धा बघणार नाहीत, विद्यार्थ्यांप्रमाणे नेतेमंडळी देखील निवडणूक जवळ आल्यावर आपापल्या मतदार संघात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतात, लोकांचे प्रश्न ऐकून घेतात, निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतात.

 

 

नुकतंच मोदींनी देखील उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काशी विश्वनाथ मंदिराच्या कॉरिडॉरच्या उदघाट्नचा घाट घातला होता, त्यानिमित्ताने त्यांनी वाराणसीकरांच्या भेटी घेतल्या. गंगा नदीत जाऊन स्नान केले, विश्वनाथाच्या बरोबरीने गंगेचे देखील त्यांनी दर्शन घेतले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

निवडणुका तोंडावर असताना मोदींच्या या प्रसंगामुळे नक्कीच पुन्हा एकदा त्यांनी वाराणसीकरांची मनं जिंकली आहेत, मात्र मागच्या निवडणुकांच्या वेळी सोनिया गांधींनी देखील असाच प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला. वाराणसीमध्ये येऊन सुद्धा त्यांना काशी विश्वनाथाचे दर्शन घेता आले नव्हते, नेमकं काय कारण होते चला तर मग जाणून घेऊयात….

 

 

नेमकं काय घडलं होत?

२ ऑगस्ट २०१७ रोजी खुद्द सोनिया गांधी यूपीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी प्रचाराची सुरवात वारणासीतूनच केली होती. मोदींचा लोकसभा मतदार संघ देखील वाराणसीच होता. सोनिया गांधी येणार म्हणून तिकडच्या काँग्रेस मंडळींनी रोड शोचे आयोजन केले होते.

विमानतळावर उतरून त्यांनी सर्किट हाऊसपासून आपल्या रोड शोला सुरवात केली. सर्किट हाऊसमध्ये असलेल्या बाबासाहेब आंबडेकरांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन करून, पुष्पहार अर्पण केला होता. नंतर त्या गंगा नदी साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भेटी घेणार होत्या मात्र त्याआधी काढलेल्या भव्य रैलीमध्ये सहभागी झाल्या.

 

 

काँग्रेसकडून यूपीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार शीला दीक्षित, प्रमोद तिवारी, गुलाब नबी आझाद, राज बब्बर यासारखी मंडळी देखील या रैलीमध्ये सहभागी झाली होती. बुलेटप्रूफ एसयूव्हीवर उभे राहून त्यांनी वाराणसीकरांना अभिवादन केले. त्यांच्यावर पुषवृष्टी करण्यात आली होती.

या भव्य रैलीला मात्र गालबोट लागले कारण या रोड शो दरम्यान अचानक सोनियाजींची प्रकृती ढासळली, लगेचच स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ‘उच्च रक्तदाब आणि तापामुळे त्यांची प्रकृती बिघडली’. पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासाठी खास दिल्लीवरून विमान पाठवले सोबत काही डॉक्टरांची टीमदेखील पाठवली आणि त्यांना दिल्लीत आणून आर अँड आर हॉस्पिटलात दाखल केले होते.

 

वेळच्या वेळी अनेकांनी मदतीचे हात पुढे केल्याने सोनियाजींनी अनेकांचे आभार मानले होते .मात्र त्यांना ही काशी विश्वनाथचे दर्शन घेता आले नाही, याबद्दल त्यांनी खेद ही व्यक्त केला होता.

निवडणूका आल्या की राजकीय मंडळींना आपापले मतदार संघ आठवतात, आपले देव आठवतात मात्र एकदा निवडणून झाली की याच सगळ्यांकडे ते पाठ फिरवतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version