Site icon InMarathi

या अभिनेत्रींनी केवळ वडिलांसोबतच नव्हे तर त्यांच्या मुलांसोबतही ऑनस्क्रीन रोमान्स केलाय

madhuri khanna inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मोठे मोठे दिग्गज कलाकार आहेत. बऱ्याच अभिनेता आणि अभिनेत्री यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा काळ आपल्या कारकिर्दीचने गाजवला आहे.

 

 

 

बॉलिवूडमध्ये येणे, टिकून राहणे आणि यशाचे शिखर गाठणे हे वाटते तितके सोपे नाही.यासाठी प्रचंड मेहनत तसेच नशीबाची साथ तर असावीच लागते शिवाय सोबत काम करणारी व्यक्ती त्याच ताकदीची आणि तोडीस तोड मिळणे गरजेचे असते.

चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या अदाकारीने आणि अभिनयाने त्यांच्या करोडो फॅन्सना घायाळ केले आहे. या अभिनेत्रींनी इतका काळ इथे घालवला आहे की आपल्यापेक्षा वयाने छोट्या आणि मोठ्या सुप्रसिद्ध अभिनेता सोबत काम केले आहे. इतकेच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीत अशा अनेक टॉप अभिनेत्री आहेत ज्यांनी वडिलांसोबतच नव्हे तर त्यांच्या मुलांसोबत पण पडद्यावर काम केलंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बी टाऊन मधील कोणत्या टॉप अभिनेत्रीचा यात समावेश आहे ते पाहूया.

१. माधुरी दिक्षीत 

देखणे रुप, अभिनय कौशल्य, सुंदर अदाकारी असे परिपुर्ण व्यक्तीमत्व म्हणजे माधुरी दिक्षीत. अनेकांच्या ह्रदयांची धकधक वाढवणाऱ्या या अभिनेत्रीने ऋषी कपूर यांच्या सोबत याराना आणि प्रेमग्रंथ या चित्रपटात काम केले आहे.

 

 

तर ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर यांच्या सोबत ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील गाजलेले गाणे घागरा यात थिरकतना दिसल्या आहेत.

 

 

१९८८ मध्ये विनोद खन्ना सोबत दयावान या चित्रपटात त्यांनी काम केले तर १९९७ मध्ये त्यांचा मुलगा अक्षय खन्ना सोबत मोहब्बत या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

 

 

२. डिंपल कपाडिया 

राजेश खन्ना यांच्या पत्नी डिंपल कपाडिया यांनी अभिनेता धर्मेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल यांच्या सोबत पडद्यावर काम केले आहे. १९८४ मध्ये सनी देओल सोबत मंजिल मंजिल या चित्रपटात तर १९९१ मध्ये धर्मेंद्र सोबत मस्त कलंदर आणि दुश्मन देवता या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

 

 

दुश्मन देवता या चित्रपटात डिंपल कपाडिया यांनी धर्मेंद्र सोबत किसींग सीन शूट केला होता.

३. श्रीदेवी 

उत्तम अभिनय, घायाळ आदा आणि नृत्याची उत्तम जाण यामुळे करोडो लोकांच्या मनावर श्रीदेवी यांचे गारुड कायम आहे. १९८९ मध्ये अभिनेता सनी देओल यांच्या सोबत चित्रपट ‘चालबाज’ मध्ये तर १९९० मध्ये अभिनेता धर्मेंद्र यांच्या सोबत नाकाबंदी या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे.

 

 

श्री देवी आणि धर्मेंद्र यांनी एकूण पाच चित्रपटात एकत्र काम केले आहे.

४. अमृता सिंह 

अभिनेत्री अमृता सिंह यांनी १९८३ मध्ये अभिनेता सनी देओल सोबत बेताब चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर सहा वर्षांनी अभिनेता धर्मेंद्र यांच्या सोबत ‘सच्चाई की ताकद’ या चित्रपटात त्यांनी धर्मेंद्र यांच्या पत्नी ची भूमिका साकारली होती.

 

 

५, राणी मुखर्जी 

राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांनी एकूण तीन चित्रपटात एकत्र काम केले होते.त्यावेळी दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. २००१ मध्ये ‘बस इतना सां खाब हैं’ या चित्रपटात राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांनी एकत्र काम केले होते.नंतर दोघे ‘युवा’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटातही एकत्र दिसले होते.

 

 

त्यानंतर २००५ मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सोबत ब्लॅक या चित्रपटात एकत्र काम केले होते.

 

 

अर्थात या चित्रपटात अमिताब आणि राणी यांनी टिपिकल नायक-नायिकांची प्रेमकथा रंगवली नव्हती. मात्र या दोघींनी एकाच चित्रपटात मध्यवर्ती भुमिका साकारल्या होत्या.

६. हेमा मालिनी 

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अभिनेता आणि निर्माता राज कपूर यांच्या सोबत चित्रपट ‘सपनो के सौदागर’ यामध्ये रोमान्स केला होता तर त्यानंतर राज कपूर यांचा मोठा मुलगा रणधीर कपूर यांच्या सोबत त्या पडद्यावर दिसल्या होत्या.

 

 

एकंदरित बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये अजब-गजब जोड्या दिसून आल्यात. सेलिब्रिटींना वयाचे फारसे बंधन नसल्याने पडद्यावर कधी कोणत्या अभिनेत्यासह कोणती अभिनेत्री दिसेल याचा काही नेम नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version