आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गुजरातमध्ये आज दिमाखात उभं असलेलं सोमनाथ मंदिर पहिल्यांदा नेमकं कधी बांधलं गेलं, याविषयी खास माहिती उपलब्ध नाही. महादेव शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जाणारं हे सोमनाथ मंदिर हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. याशिवाय हा हिंदूंच्या जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा विषय सुद्धा आहे.
मुघल शासनाच्या काळात अनेकदा हे मंदिर उध्वस्त झाले आणि पुन्हा बांधण्यात आले अशी इतिहासात नोंद आहे. एवढंच नाही, तर या मंदिराच्या जागी मशिदी बांधण्याचा प्रयत्न झाला असल्याच्या खुणा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत कायम होत्या.
सध्या उभे असलेले सोमनाथ मंदिर हे चक्क भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि काँग्रेस सरकारच्या राजवटीत बांधले गेले आहे. हे मंदिर उभारलं जावं यासाठी एका काँग्रेस नेत्याने पुढाकार घेतला आणि त्यांच्या अथक प्रयत्नातूनच हे मंदिर साकार झालं आहे. हा नेता नेमका कोण होता आणि काय होता सोमनाथ मंदिर बांधकामाचा घटनाक्रम, आज जाणून घेऊयात…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
सगळ्याच बाजूने होणारा विरोध...
सोमनाथ मंदिर पुन्हा उभं राहावं यासाठी हिंदूंचे प्रयत्न सुरु होते, मात्र या मंदिराच्या पुनर्बांधणीला मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता. जुनागढ संस्थान हे तिथल्या नवाबाच्या अधिपत्याखाली होतं. नवाबाने सोमनाथ मंदिर बांधण्याची परवानगी हिंदूंना कधीच दिली नाही.
१९४७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात हे संस्थान अखेर भारतात विलीन करण्यात आलं आणि सोमनाथ मंदिराचा मार्ग काहीसा मोकळा झाला.
सरदार पटेल यांनी सोमनाथ मंदिर पुन्हा उभारलं जाणार असल्याची घोषणा केली.
या घोषणेनंतरही त्यांना अंतर्गत विरोधाचा सामना मात्र करावा लागला. तत्कालीन शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. मंदिराचे अवशेष भारतीय पुरात्तव खात्याला स्वाधीन करावेत आणि सोमनाथ मंदिराची जागा ही केवळ एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन करावी अशी त्यांची मागणी होती.
सरदार पटेल मात्र त्यांच्या मागणीवर ठाम होते. सोमनाथ मंदिर बांधलं जावं यासाठी ते आग्रही होते. हिंदूंसाठी एक महत्त्वाचा भावनिक विषय असणारं हे मंदिर बांधणं हिंदूंच्या भावनांचा आदर करण्यासाठी आवश्यक आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. कुठल्याही विरोधाला न जुमानता, त्यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार हा मुद्दा लावून धरला.
कन्हैयालाल मुन्शी यांचा महत्त्वाचा वाटा
कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी हे एक राजकीय नेते, हुशार आणि कर्तबगार वकील आणि लेखक म्हणून माहित असतात. मात्र त्यांचा सोमनाथ मंदिर उभारणीमध्ये असलेला महत्त्वाचा वाटा फारसा कुणाला ठाऊक नसतो. सोमनाथ मंदिराची अवस्था पाहून तेही भावनिक होत असत.
१९२२ मध्ये त्यांच्या लिखाणातून मुन्शी या विषयावर व्यक्त झाले होते. त्यांनी असं म्हटलं होतं की, सोमनाथ मंदिर अंकेदा उध्वस्त करण्यात आलं. त्यामुळे हिंदूंच्या भावना नेहमीच दुखावल्या गेल्या आहेत. या भग्न वास्तूमधून फिरताना, कधीकाळी दिमाखात उभा असलेला, मात्र आज उध्वस्त झालेला सभामंडप पाहताना मन हेलावून जातं. हे दुःख शब्दांत मांडणं शक्य नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.
सरदार पटेल यांनी हा मुद्दा लावून धरला होता, मात्र १९५० साली त्यांचा मृत्यू झाला. पटेल यांच्या मृत्यूनंतर, १९५० ते १९५२ या काळात मुन्शी यांनी सोमनाथ मंदिर उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलला. केंद्रीय कृषिमंत्रालय सांभाळणारे कन्हैयालाल मुन्शी, हे सोमनाथ मंदिर बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षस्थानी होते. म्हणजेच या सरकारी योजनेचा चेहरा म्हणून मुन्शी यांनीच काम पाहिलं आहे.
१९३७ साली मुन्शी यांनी लिहिलेल्या जय सोमनाथ या पुस्तकात सुद्धा त्यांचा हे मंदिर उभारण्याविषयीचा आग्रह दिसून येतो. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार ही देशाची मागणी असल्याचं त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांचं हे पुस्तक सुद्धा सोमनाथ मंदिराचे समर्थक आणि विरोधक यांच्यासाठी चर्चेचा विषय ठरलं होतं.
नेहरूंचा विरोध
सोमनाथ मंदिर पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मंदिराचा जोर्णोद्धार व्हावा यासाठी आग्रही असणारे सरदार पटेल आणि महात्मा गांधी या दोन बड्या नेत्यांचा मृत्यू झाला होता. अशातच पंतप्रधान नेहरू यांनी मुन्शी यांच्याशी संवाद साधला.
हिंदू धर्माचे, त्यांच्या भावनांचे पुनरुज्जीवन ठरू शकणारी मंदिर जीर्णोद्धाराची योजना त्यांना मेनी नसल्याचं मुन्शी यांना सांगितलं गेलं. हा मुन्शी यांचा अपमान होता, असं म्हणायला हरकत नाही. कारण, मंदिर जीर्णोद्धाराचा निर्णय, त्यासाठी सुरु असलेले प्रयत्न याविषयी नेहरूंना संपूर्ण कल्पना होती. असं असतानाही त्यांनी अचानक केलेला विरोध मुन्शी यांना अजिबातच पटत नव्हता.
एप्रिल १९५१ मध्ये मुन्शी यांनी थेट पंतप्रधान नेहरू यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं की, साहित्य आणि समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी हिंदू धर्मातील अनेक पैलू समजून घेऊन त्यात योग्य बदल घडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. आधुनिक विचारसरणीशी जुळवून घेणारा आणि आधुनिक गोष्टी समाविष्ट करू शकणारा धर्म, म्हणेजच हिंदू धर्म आहे.
हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मातिलक शिकवण जतन होणं गरजेचं आहे. यासाठी हिंदू धर्माचा ठेवा जतन व्हायला हवा. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आवश्यक आहे ज्यामुळे हिंदू धर्माला नवी दिशा मिळायला सुद्धा मदत होईल.
–
- एक विमान चक्क नेहरूंच्या लाडक्या सिगरेटचं पाकीट आणण्यासाठी पाठवलं होतं!
- जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान नाहीत, वाचा “लपवलेला” इतिहास!
–
पंतप्रधान नेहरू यांचा विरोध असूनही मुन्शी ठाम राहिले. सोमनाथ मंदिर पुन्हा बांधले जाईल यासाठी पाठपुरावा करतच राहिले. त्यामुळेच हे मंदिर पुन्हा नव्याने बांधले गेले. नंतरच्या काळात काँग्रेसची विचारसरणी न पटल्याने, त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. नंतरच्या काळात ते स्वराज्य पार्टीचा भाग होते. गुजरातमधील एक दर्जेदार साहित्यिक म्हणून मुन्शी माहित आहेतच, मात्र काँग्रेसमध्ये असताना, थेट नेहरूंचा विरोध करून सोमनाथ मंदिरासाठी त्यांनी दिलेला लढा ही सुद्धा त्यांची महत्त्वाची ओळख आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.