' Champions Trophy च्या सामन्यांमधील बॅटवर सेन्सर्स का लावले गेलेत? जाणून घ्या या मागचं कारण! – InMarathi

Champions Trophy च्या सामन्यांमधील बॅटवर सेन्सर्स का लावले गेलेत? जाणून घ्या या मागचं कारण!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सध्या क्रिकेटविश्वात ICC Champions Trophy ची धूम सुरु आहे. रोज बलाढ्य संघ एकमेकांशी झुंज देतायत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करतायत. तुम्ही देखील क्रिकेटचे भयंकर मोठे फॅन असाल आणि ICC Champions Trophy चा प्रत्येक सामना आवर्जून बघत असाल तर एव्हाना एक गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल ती म्हणजे फलंदाजाच्या बॅटवर लावले गेलेले सेन्सर्स! चला तर जाणून घेऊया काय आहे या बॅट सेन्सर्स मागचे गौडबंगाल!

bat-sensors-marathipizza04
dailymail.co.uk

सध्या क्रिकेटमध्ये नव नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करुन हा खेळ अधिक पारदर्शक कसा होईल तसेच या खेळामध्ये नव नवीन पद्धतींचा वापर करून तो अधिक प्रगत कसा होईल या कडे ICC चे लक्ष आहे. त्याच दृष्टीने एक पाउल टाकत ICC ने या स्पर्धेदरम्यान फलंदाजाच्या बॅटवर सेन्सर्स लावण्याचा निर्णय घेतला. जग विख्यात इंटेल कंपनीने हे सेन्सर्स तयार केले आहेत. हे सेन्सर्स बॅट हँडलच्या वरच्या भागात लावले जातात, त्यामुळे आजवर कधीही मिळवता न आलेला डेटा मिळवता येणार आहे. जसे की फलंदाजाच्या बॅटची स्पीड आणि त्याच्या बॅक लिफ्टचा अँगल!

bat-sensors-marathipizza02
eftm.com.au

या सेन्सर्समूळे प्रेक्षकांना अधिक सखोल डेटा देण्यास मदत होईल आणि क्रिकेटचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या कोचन देखील प्रशिक्षणादरम्यान या डेटाचा वापर करता येईल असे ICC तर्फे सांगण्यात येत आहे.
इंग्लंड संघाचे माजी कॅप्टन नासेर हुसेन यांनी या बाबत माहिती देताना सांगितले की,

आपण नेहमी फलंदाजाची बॅट फिरवण्याची शैली आणि त्याच्या बॅटची स्पीड किती मस्त आहे याची वाहवा करत असतो, पण ती स्पीड नेमकी किती आहे? किंवा त्याची शैली नेमकी कशी आहे? हे मात्र आपण कधीच जाणून घेतले नाही आणि या सेन्सर्सद्वारा तीच गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच जेव्हा फलंदाज देखील त्याने मारलेले फटके बघेल तेव्हा त्याच्या लक्षात येईल की कोणत्या अँगलने बॅट फिरवणे सोपे जाते आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो.

bat-sensors-marathipizza03
newatlas.com

या ICC Champions Trophy दरम्यान प्रत्येक संघातील पाच फलंदाजांच्या बॅटवर हे सेन्सर्स लावून प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात येणार आहे. भारतीय संघातून रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांची या प्रयोगासाठी निवड करण्यात आली आहे हे नक्की, इतर ३ खेळाडू कोण हे मात्र समजू शकलेले नाही.

bat-sensors-marathipizza01
indiatoday.intoday.in

जर हे सेन्सर्स तंत्रज्ञान ICC च्या अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले, तर येणाऱ्या काळात हे प्रत्येक फलंदाजाच्या बॅटवर हे सेन्सर्स पाहायला मिळतील.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?