' क्रिकेटर्सच्या शर्टवर नंबर का असतात? ते कसे ठरवले जातात? – InMarathi

क्रिकेटर्सच्या शर्टवर नंबर का असतात? ते कसे ठरवले जातात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेटची मॅच बघताना आपले लक्ष आपापल्या आवडत्या खेळाडूंकडे लागलेले असते. मैदानावर इतके खेळाडू असताना त्यातला नेमका कोणता खेळाडू कोण आहे हे ओळखणे एखाद्या दर्दी प्रेक्षकाला कठीण नाही. ते लोक त्यांच्या आवडत्या खेळाडूंना अगदी लांबून सुद्धा बरोब्बर ओळखतात.

खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या नाव/ आडनावांसह त्यांचा नंबर देखील ठरलेला असतो. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर म्हटले की १० नंबरची जर्सी, महेंद्रसिंह धोनी म्हटले की ७ नंबरची जर्सी, विराट कोहलीच्या जर्सीचा क्रमांक १८ आहे तर रोहित शर्माचा जर्सी क्रमांक ४५ आहे.

 

jersy inmarathi

 

आपली मॅच कुठल्याही देशाविरुद्ध असो, हे खेळाडूंचे जर्सीचे क्रमांक कधीच बदलत नाहीत ही गोष्ट दर्दी क्रिकेट फॅन्सना माहिती असते. पण सर्वसामान्य व्यक्तींना नेहेमी प्रश्न पडतो की या खेळाडूंचे हे विशिष्ट जर्सी क्रमांक कोण ठरवतो? कुणाला कुठल्या क्रमांकाची जर्सी घालायची आहे हे कशावरून ठरत असेल?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ठरवणारे आयसीसी आहे की त्या त्या देशांचे क्रिकेट बोर्ड?

खरे तर प्रत्येक व्यक्ती आपल्या यश-अपयशामागे कुठल्या ना कुठल्या गोष्टींना जबाबदार मानत असते. एखाद्या व्यक्ती लकी असणे किंवा लकी अनलकी घटना घडणे या कारणांना आपण आपल्या यश किंवा अपयशासाठी जबाबदार ठरवत असतो. भलेही काही लोक त्याला अंधश्रद्धा म्हणू देत पण क्रिकेटर्स देखील माणसेच आहेत!

भारतीय संघातील क्रिकेटपटू त्यांच्या जर्सीचा क्रमांक स्वतः निवडतात. आणि ते निवडण्यामागे अशी कारणे आहेत. या कारणांना क्रिकेटची अंधश्रद्धाही म्हणता येईल.

मास्टरब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर फलंदाजीला तयार होताना आधी डाव्या पायात पॅड घालायचा, तसेच गुडलकसाठी त्याच्या किटबॅगमध्ये साईबाबांचा फोटो कायम असायचा.

 

tendulkar inmarathi

 

भारतीय संघातील खेळाडूने कुठल्या क्रमांकाची जर्सी घालावी हा निर्णय बीसीसीआय आणि आयसीसी घेत नाही. भारतासह जगातील इतर देशांतील खेळाडू देखील स्वतःच्या जर्सीचा क्रमांक स्वतः निवडतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत. परंतु या क्रमांकांचे वाटप करताना एका संघातील कोणतेही दोन खेळाडू एका सामन्यात एकाच क्रमांकाची जर्सी घालणार नाहीत याची काळजी मात्र घेतली जाते.

आपल्याला माहीतच आहे की सचिन तेंडुलकरच्या जर्सीचा क्रमांक १० होता, जो त्याने स्वतः निवडला होता. १० हा नंबर त्याच्यासाठी खूप लकी ठरला.. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले होते की त्याच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये टेन हा आकडा येतो, म्हणून त्याने त्याच्या जर्सीसाठी १० हा क्रमांक निवडला.

जेव्हा सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा बीसीसीआयने सांगितले की भारताला दुसरा सचिन तेंडुलकर आता मिळू शकत नाही. म्हणून आता १० क्रमांकाची जर्सी देखील फक्त सचिनची म्हणून ओळखली जाईल. म्हणजेच आता भारताचा कोणताही खेळाडू १० क्रमांकाची जर्सी वापरू शकणार नाही.

शार्दुल ठाकूरने मॅचमध्ये १० क्रमांकाची जर्सी घातली होती.पण आता त्याने जर्सीसाठी ५४ हा क्रमांक निवडला आहे.

tendulkar shardul inmarathi

 

विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितले की, तो १८ क्रमांकाची जर्सी घालण्यास स्वत:ला भाग्यवान समजतो. त्याने १८ हा क्रमांक निवडण्याचे कारण ही की १८ डिसेंबर २००६ रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाले. आणि १८ नंबरची जर्सी घातल्यानंतर त्याला असे वाटते की त्याचे वडील कायम त्याच्या बरोबर आहेत.

विराट कोहली त्याच्या अंडर नाईंटीनच्या दिवसांपासून १८ क्रमांकाची जर्सी घालतो आहे.

त्याचप्रमाणे महेंद्रसिंह धोनीने ७ हा आकडा निवडण्याचे कारण असे की, ७ जुलैला धोनीचा वाढदिवस असतो. तसेच धोनीला फुटबॉल प्रचंड आवडतो आणि त्याचा आवडता खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या जर्सीचाही नंबर ७ हाच होता.

 

dhoni ronaldo inmarathi

 

द वॉल म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ५ क्रमांकाची जर्सी घालायचा पण लग्नानंतर त्याने हा नंबर बदलून १९ केला. कारण तो मानतो की त्याची पत्नी त्याच्यासाठी खूप लकी आहे आणि त्याच्या पत्नीचा वाढदिवस १९ तारखेला असतो.

तसेच रोहित शर्माच्या जर्सीचा क्रमांक ४५ आहे आणि हा क्रमांक त्याच्या आईने निवडला होता. खरंतर रोहित ९ हा त्याचा लकी नंबर मानतो. पण हा नंबर आधीच पार्थिव पटेलला देण्यात आला होता. म्हणूनच त्याने त्याच्या आईच्या सांगण्यावरून ४५ हा नंबर निवडला कारण ४+५ ची बेरीज ९ होते. ४५ हा क्रमांक रोहितसाठी लकी ठरला आहे.

 

rohit sharma inmarathi

 

तर वरील तथ्यांच्या आधारे असे म्हणता येईल की भारतीय संघातील खेळाडूंनी परिधान केलेल्या जर्सीचा क्रमांक त्यांनी स्वतःच निवडला आहे. क्रमांकाप्रमाणेच खेळाडूला त्याच्या जर्सीवर कोणते नाव लिहायचे आहे हे देखील खेळाडू स्वतःच ठरवतात.

टोनी ऍडम्स हे माजी इंग्लिश फुटबॉल खेळाडू व आताचे प्रशिक्षक एकदा म्हणाले होते की ,”“Play for the name on the front of the shirt and they will remember the one on the back.” हे अगदी खरे आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?