Site icon InMarathi

लखलखत्या मुकुटासह मिस युनिव्हर्सला मिळणारी बक्षिसं वाचूव थक्क व्हाल

miss uni inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तब्बल २१ वर्षानंतर भारताच्या लेकीने मिस युनिव्हर्सचा लखलखता मुकुट भारतात पुन्हा आणलाय. पंजाबच्या हरनाज कौर सिंधुने यंदा मिस युनिव्हर्सचा किताब पटकवत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

सौंदर्य, बुद्धीमत्ता आणि अथक प्रयत्नांमुळे हा किताब आज हरनाजच्या माथ्यावर खुलून दिसत असला तरी केवळ हा मुकुट हेच तिचे पारितोषिक नाही.

दिमाखदार सोहळ्यात अनेक सौंदर्यवतींना मागे टाकत भारताच्या हरनाजने हा पुरस्कार मिळवलाय, पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर तिच्या डोक्यावर मानाचा मुकुट घालण्यात आलाच, शिवाय गळ्यात ‘मिस युनिव्हर्स २०२१’ लिहीलेला सॅशही अडकवण्यात आला, आणि हाती भरगच्च पुष्पगुच्छ यांसह तिचा सन्मान केला गेला. मात्र ही केवळ प्रेक्षकांना दिसणारी पारितोषिकं आहेत.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

तुम्हाला ठाऊक आहे का, की मिस युनिव्हर्स हा किताब जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला नेमकं किती आणि कोणती बक्षिसंं मिळतात? अथक परिश्रम करून स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या पारितोषिकांची यादी वाचून थक्क व्हाल.

१. यंदा हरनाजने हा पुरस्कार पटकावल्यानंतर तिला तब्बल २ लाख ५० हजार डॉलर म्हणजेच १,८९,१५,९८७ रुपये एवढे पारितोषिक देण्यात आले आहे. दरवर्षी या रकमेत वाढ गेली जाते.

 

 

२. मिस वर्ल्ड् प्रमाणेच मिस युनिव्हर्स हा किताब जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला मिळणारा आणखी एक बहुमान म्हणजे ‘वर्ल्ड् टूर’! स्पर्धा जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला वेगवेगळे शो, कार्यक्रम, तसेच इतर ब्युटी पेजन्ट्स यासाठी विविध देशांना भेटी द्याव्या लागतात. अशावेळी त्यांच्या संपुर्ण वर्ल्ड टूरचा खर्च आयोजकांतर्फे केला जातो. त्यामुळे भारताच्या हरनाजलाही वर्ल्ड टूरची भेट देण्यात आली आहे.

३. रत्नजडित देखणा मुकूट हे त्यातील महत्वाचे आकर्षण आहे.

 

३. मिस युनिव्हर्सचा किताब पटकाविणाऱ्या सौंदर्यवतीसाठी खास अपार्टमेंटची सोय केली जाते. या घरात राहण्याचा खर्च, वर्षभराचे वास्तव्य तसेच सामान, प्रवासखर्च ही सगळी रक्कम आयोजकांकडून दिली जाते. पुढील वर्षभर हरनाजचा मुक्काम या खास वास्तुत असेल.

४. स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्यासाठी मेकअप आर्टिस्ट तसेच पुर्णवेळ असिस्टन्टची सोय करण्यात आली आहे.

५. वर्षभरासाठी तिला विविध फॅशनचे कपडे, मेकअप, स्कीन केअर उत्पादने दिली जाणार आहेत. तिच्या इतर सर्व कार्यक्रमांसाठी कपड्यांचा खर्चही आयोजकांतर्फे केला जाणार आहे.

 

 

६. यासह वर्षभर तिला देणाऱ्या वैद्यकीय सेवांचा खर्चही केला जाणार आहे.

वरकरणी पाहता पारितोषिकांची यादी मोठी असली तरी ही स्पर्धा जिंकण्यासाठी अथक परिश्रम, अनेक गोष्टींचा त्याग केला जातो. त्यामुळे अशा अनेक खडतर कसोट्या पार करून विजेतीपदावर नाव कोरणाऱ्या हरनाजला खूप खूप शुभेच्छा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version