Site icon InMarathi

एकाच मंडपात ७ जणींचा “विवाह”-सोहळा! सर्वांनी प्रेरणा घ्यावी असं काही…

samuhik vivah sohla InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न ही एक अशी गोष्ट आहे ती एकदाच होते! सध्याचा काळ बदलला असला तरी जुन्या गोष्टींचं महत्व अजूनही तसंच टिकून आहे आणि त्यामुळेच आपल्या इथे लग्न ही गोष्ट खूप पवित्र मानली जाते!

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हे फार महत्वाचं असतं. आपलं लग्न हे खास असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण परिस्थितीमुळे ते काही शक्य होत नाही, आणि त्यांचं लग्न हे कधीकधी अगदी साधारण पद्धतीने पार पडतं.

आणि मुलीच्या बाबतीत तर लग्न म्हणजे एक प्रकारचा सोहळाच असतो. प्रत्येक मुलीचे आई वडील तिच्या लग्नासाठी तिच्या जन्मापासूनच सगळ्या सोयी करत असतात, आपल्या मुलीच्या लग्नासाठी ते अक्षरशः झटत असतात!

 

pinterest

 

आपल्या मुलीला चांगल सासर मिळावं,  तिचा होणारा नवरा स्वभावाने चांगला असावा, तिला तिच्या सासरी कसलाही त्रास होऊ नये यासाठी मुलीचे आई वडील तिच्यासाठी चांगलं घर शोधत असतात!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

  1.  

निदान भारतात तरी आजही हीच प्रथा चालू आहे, कितीही समाज पुढारलेला असला तरी आजही मुलीची बाजू हि पडतीच मानली जाते!

 

theindiantelegraph.com.au

 

प्रत्येक बापासाठी आपल्या मुलांचं लग्न हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखद अनुभव असतो. आणि प्रत्येक बाप आपापल्या परीने तो दिवस आपल्या मुलांसाठी स्पेशल कसा करता येईल ह्याची पुरेपूर काळजी देखील घेतो.

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. सोशल मिडीयावर तर ह्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओजचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. फेसबुक-इंस्टाग्राम उघडलं की निव्वळ हे लग्नाचे फोटोज दिसतात. आणि आपले भारतीय लग्न म्हटलं तर सर्वकाही जरा काकणभर जास्तच असतं.

 

theindianfeed.in

आपल्या देशात लग्न ही गोष्ट अशी आहे जी करताना बारीक सारीक गोष्टी बघितल्या जातात जसं कि जात-पात, धर्म, गोत्र, नाड, रंग, मिळकत, घराणं, संस्कार, चाली-रीती अशा कित्येक गोष्टी खूप बारकाईने बघितल्या जातात!

आणि मगच पुढे लग्नाची बोलणी होतात! त्यातूनही ग्रामीण भागात आजही या गोष्टी खूप कट्टरपणे मानणारे बरेच लोकं आहेत!

जात-पात, श्रेष्ठ कनिष्ठ या गोष्टीवरून झालेले वादंग आपण न्यूज चॅनल्सच्या  माध्यमातून बऱ्याचदा पाहिला असेल! त्यामुळे भारतातल्या बऱ्याच भागात आजही तसेच मागासलेल्या विचारधारेची माणसं आहेत!

जे आजही त्यांच्या रूढी परंपरांना चिकटून आहेत! ज्यामुळे आजही कित्येक ठिकाणी मुलांना मोकळेपणाने बोलता येत नाही, मुलींना त्यांची मतं व्यक्त करता येत नाहीत!

 

 

काही ठिकाणी तर लग्नाच्या प्रथा सुद्धा इतक्या विचित्र असतात कि त्या बघूनच आपल्याला कळत कि आजही आपला समाज इतका मागासवर्गीय का आहे?

पण आज आपण एक वेगळीच गोष्ट जाणून घेणार आहोत ती ऐकून तुम्हाला हा प्रश्न सुद्धा पडेल कि या मागासलेल्या भागांमध्ये सुद्धा अशी काही माणसं आहेत ज्यांच्या कार्याला आपल्याला सलाम करावासा वाटेल!

आज आपण एका अशा बापाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने एक खूप वेगळी गोष्ट करून समाजासमोर एक उदाहरण मांडून ठेवलं आहे! या बापाने आपल्या मुलीचे लग्न अविस्मरणीय आणि खास बनविण्यासाठी असं काही केलं जे प्रत्येकाला जमणार नाही.

पाटण जिल्ह्यापासून ७ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अजीमना गावात अमृत देसाईने आपल्या मुलीच्या लग्नाच्या मुहूर्तावर वाल्मिकी समाजाच्या म्हणजेच दलित समाजातील ७ मुलींचा विवाह करवला आहे.

 

timesofindia.indiatimes.com

 

ह्या आगळ्यावेगळ्या सामुहिक विवाहात जवळजवळ ३ हजार लोकांनी आपली उपस्थिती दर्शविली. एवढेच नाही तर अमृत ह्यांनी नव्या जोडप्यांना आशीर्वाद म्हणून घरात कामी येणारे काही समान देखील दिले.

ह्या बाबत बोलताना अमृत ह्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की,

 

momspresso

 

दलित मुलींचा विवाह माझ्या मुलीच्या लग्नावेळी एकाच ठिकाणी करून मी पूर्वापारपासून चालत आलेली जाती प्रथा तोडण्याचा प्रयत्न केला. दलीतांप्रती होणारे दुर्व्यवहार, अन्याय, प्राचीनकाळापासून चालत असलेल्या परंपरा संपविण्याचा आमचा हा एक प्रयत्न होता.

म्हणून मी मुली आणि त्यांच्या कुटुंबाची परवानगी घेतली, आणि संपूर्ण गावकऱ्यांसमोर माझा हा प्रस्ताव मांडला. ज्याला गावकऱ्यांचा होकार लाभला आणि हे शक्य झालं.

momspresso

अमृत ह्यांनी उचललेलं हे पाउल खरंच कौतुकास्पद आहे. कारण आज आपल्या देशाला, समाजाला अश्या लोकांची नितांत गरज आहे.

जी लोक आजही त्यांच्या जुन्या बुरसटलेल्या विचारांना धरून आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांचे नुकसान होत आहे अशा लोकांनी तर यातून नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे!

 

या सगळ्यातून आपल्याला बोध एकच मिळतो कि आपण आपल्या डोळ्यांवरच्या धर्म जात पात यांची झापडं काढून टाकून एका वेगळ्याच नजरेतून समाजाकडे आणि त्यातल्या घटकणाकडे बघायला पाहिजे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version