Site icon InMarathi

पुन्हा एकदा लखलखता मुकूट भारतात आणणाऱ्या हरनाज संधूबद्दल सर्व काही…!

harnaz sandhu featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकूणच हे सरतं वर्षं भारतासाठी खास ठरलं आहे. आधी ऑलम्पिक आणि आता जागतिक सौंदर्य स्पर्धा. भारत प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. आजची सकाळ तमाम भारतियांसाठी एक “सुंदर” हेडलाईन आणि ब्रेकिंग न्यूज घेऊन आली.

भारतीय सौंदर्यवती २१ वर्षिय हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून तब्बल दोन दशकांनंतर हा झळाळता मुकूट भारतात आणला आहे. हरनाजच्या आधी एकवीस वर्षांपूर्वी २००० साली लारा दत्ताने हा मुकूट जिंकला होता.

 

 

गंमत म्हणजे, एकवीस वर्षांची सौंदर्यवती, वर्षं २०२१ आणि भारताला हा २१ वर्षांनंतर मुकूटही मिळणं असा अजब योगायोग यानिमित्तानं जुळून आलेला आहे.

हरनाजच्या या विजयाची घोषणा मिस युनिव्हर्सच्या अधिकृत इन्स्टा हॅण्डलवरून करण्यात आली देशभर आनंदाची लहर उमटली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कालपर्यंत हरनाज हे अनोळखी नाव आज घराघरात ऐकू येत आहे. कोणं आहे हरनाज?

चंदीगढची असणार्‍या हरनाजचा जन्म एका शिख कुटुंबातला आहे. पहिल्यापासूनच तिला फिटनेसची आवड होती. नियमित योगासनं करत तिनं आपला फिटनेस राखला आहे. अत्यंत शिस्तबध्द मुलगी म्हणून हरनाझची ओळख आहे.

लहान वयापासूनच प्रत्येकच गोष्टीत शिस्तबध्दता आणि काटेकोरपणा असणार्‍या हरनाजला जज बनायचं असल्याचं तिच्या आईने तिनं मुकुट जिंकल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

 

 

तिच्या या यशात केवळ तिच्या सौंदर्याचा हात नाही तर तिच्या अंगी असणारी चिकाटी, शिस्त आणि फिटनेसबाबतची जागरुकता यांचा मोठा वाटा आहे. भरपूर व्यायाम आणि सकस आहार याबाबत ती नेहमी आग्रही असते.

किशोर वयापासूनच आपल्या सौंदर्याची जाणीव असणार्‍या हरनाजने विविध सौंदर्य स्पर्धात भाग घेण्यास आणि जिंकण्यास सुरवात केली होती. २०१७ साली तीने मिस चंदीगढचा मुकुट जिंकला. यानंतर लगेचच म्हणजे २०१८ साली तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडियाचा मुकुट मिळाला.

यानंतर हरनाजने प्रत्येक भारतीय सौंदर्यवतीचं स्वप्न असणार्‍या मिस इंडिया स्पर्धेच्या तयारीला सुरवात केली. २०१९ साली आधी मिस इंडिया पंजाब आणि नंतर झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत तिने टॉप १२ मधे स्थान पटकावलं.

या वर्षी २०१२ च्या सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या मिस दिवा युनिव्हर्सचा मुकुट मिळविला. यानंतर तीने मिओस युनिव्हर्ससाठी तयारी सुरू केली. यंदाचं हे वर्ष स्पर्धेचं सत्तरावं वर्ष आहे.

 

 

इलात (इस्त्रायल) इथे पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका आणि पराग्वेच्या स्पर्धकांना मागे सारत हरनाजने हा मुकुट जिंकला आहे.

हरनाजने पंजाब मॉडेलिंग विश्र्वात काम केलेलं आहे तसेच काही पंजाबी चित्रपटात भूमिकाही साकारल्या आहेत. “यारा दियां पू बारां” आणि “बाईजी कुट्टांगे” या चित्रपटांत ती झळकली आहे.

फॅशन, अभिनय या क्षेत्रांची ओढ आणि आवड असणारी हरनाज शिक्षणातही हुशार आहे. सध्या ती पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

ब्युटी विथ ब्रेन हे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या या सौंदर्यवतीला इनमराठी परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version