Site icon InMarathi

झेब्रा..काळ्यावर पांढरे पट्टे की पांढऱ्यावर काळे? जाणून घ्या, नेमकं काय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

=== 

आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो, की थक्क व्हायला होते. निसर्गाचे एक एक चमत्कार बघताना आपले डोळे दिपतात. अगदी सूक्ष्मजीवांपासून तर ब्ल्यू व्हेल पर्यंत विविध प्रकारचे प्राणी, झाडे, पक्षी निसर्गाने निर्माण केले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

निसर्गाने प्रत्येक जीवाला ह्या जगात टिकून राहण्यासाठी काही खास शक्ती दिल्या आहेत. काहींना ताकद दिली आहे तर काहींना वेग, काहींना लपून राहण्याचे ज्ञान दिले आहे तर काहींना स्वसंरक्षणासाठी काही विशेष शक्ती दिल्या आहेत.

तशी तर निसर्गाने निर्माण केलेली प्रत्येकच गोष्ट सुंदर आहे, पण काही प्राणी व पक्षी आपले विशेष लक्ष वेधून घेतात. ते म्हणजे हत्ती, वाघ, सिंह, जिराफ, चित्ता, हरीण, कांगारू, पांडा आणि झेब्रासारखे काही प्राणी.

 

 

लहान मुलांना तर प्राणी बघायला विशेष आवडतात. त्यात हा काळ्या पांढऱ्या पट्ट्या असलेला घोड्याप्रमाणे दिसणारा झेड फॉर झेब्रा तर लहान मुलांना फारच आवडतो.

झेब्रा हा प्राणी आफ्रिका खंडात आढळतो. हा घोड्याच्या जमातीतीलच एक प्राणी आहे. झेब्राच्या तीन प्रजाती काळाच्या ओघात टिकलेल्या आहेत. त्या म्हणजे ग्रेव्हीज झेब्रा (इक्वस ग्रेव्ही), मैदानी झेब्रा (इक्वस क्वाग्गा) आणि माउंटन झेब्रा (इक्वस झेब्रा).

आपल्या बोटांच्या ठश्याप्रमाणेच प्रत्येक झेब्राचे पट्टे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये असतात. दोन झेब्रांच्या पट्ट्यांचे पॅटर्न एकसारखे कधीच नसतात. झेब्राकडे बघितल्यास त्याच्या शरीरावर काळ्यावर पांढरे पट्टे आहेत की पांढऱ्यावर काळे पट्टे आहेत हे कळत नाही.

 

 

बहुतांश झेब्रांना त्यांच्या फर खाली काळी त्वचा असते. आपल्याला असे दिसते, की त्यांना पांढरे फर आहे आणि त्यात गॅप असल्यामुळे केल्यावर पांढऱ्या पट्ट्या दिसतात, पण तसे नाही. झेब्रांना काळे आणि पांढरे असे दोन्ही रंगांचे फर असते.

झेब्राचे फर त्यांच्या शरीरात असलेल्या फॉलिकल पासून तयार होते. या फॉलिकल्समध्ये मेलॅनोसाइट पेशी असतात. या पेशींमध्ये मेलॅनिन पिगमेंट तयार होते ज्यामुळे फरला वेगवेगळा रंग मिळतो.

ज्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे फर असते त्या ठिकाणच्या मेलॅनोसाईट्स ह्या पेशी निष्क्रिय असतात. म्हणून त्या ठिकाणच्या फरला काळा रंग प्राप्त होत नाही. ह्याचा अर्थ असा होतो, की नैसर्गिकरित्या झेब्राच्या फरचा रंग काळा आहे आणि त्यामुळे बहुतेक तज्ज्ञ झेब्राचे वर्णन पांढरे पट्टे असलेले काळा प्राणी असे करतात.

 

 

आपल्याही शरीरावर जे केस असतात ते नैसर्गिकपणे काळे असतात. पण ज्या पेशींमध्ये मेलॅनिन तयार होत नाही त्याठिकाणचे केस पांढरे होतात. त्याचप्रमाणे झेब्राच्या शरीरावरील ज्याठिकाणी मेलॅनोसाईट्स निष्क्रिय असतात त्याठिकाणचे त्याचे फर हे पांढऱ्या रंगाचे असते.

काळ्या पांढऱ्या पट्ट्यांचा झेब्राला काय उपयोग आहे?

अनेकांनी भक्षकापासून लपून राहण्यास मदत (camouflage), परजीवींपासून त्वचेचे संरक्षण करणे असे बरेच तर्क केले आहेत. पण अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी जानेवारी २०१५ मध्ये अशी माहिती प्रकाशित केली आहे, की उष्णतेपासून बचावासाठी झेब्राच्या शरीरावर या काळ्या पांढऱ्या पट्ट्या असतात.

काळ्या आणि पांढर्‍या पट्ट्या उष्णता शोषून घेतात या विरोधाभासी पद्धतीने उष्णतेपासून बचाव करण्यात झेब्राला फायदा होतो. काळा रंग पांढऱ्यापेक्षा जास्त उष्णता शोषून घेतो आणि त्यामुळे जास्त गरम होतो. काळ्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे झेब्राच्या त्वचेवर हवेचा प्रवाह थंड होतो व त्याला उष्णतेचा दाह कमी जाणवतो.

 

 

झेब्रामध्ये, रासायनिक संदेशवाहक हे निर्धारित करतात, की कोणते मेलेनोसाइट्स रंगद्रव्य फरच्या कोणत्या भागात तयार होईल, त्यामुळे झेब्राच्या शरीरावर काळ्या पांढऱ्या पट्ट्यांचे आकर्षक आणि वेगळेच डिझाईन तयार होते.

जर झेब्राचे सगळे वरचे फर शेव्हिंग करून काढून टाकले तर झेब्रासुद्धा घोड्याप्रमाणे काळाशार दिसेल. म्हणजेच ह्यावरून आपण असे म्हणू शकतो की झेब्राच्या शरीरावर काळ्या रंगावर पांढऱ्या फरच्या पट्ट्या आहेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version