चीनशी वाकडं, त्यांच्याशीच करार.. इस्रोने केली चिनी कंपनीशी हातमिळवणी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘चीन’ या देशाचं नाव ऐकताच भारतीयांमध्ये संतापाची लाट उठते. चीनशी झालेलं युद्ध, तिथून आलेला कोरोना व्हायरस या सगळ्या गोष्टींमुळे भारतीयांनी चिनी कंपन्यांवर बहिष्कार टाकायला सुरुवात केली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
चिनी गोष्टी जाळून टाकण्यात आल्या.. देशी बनावटीच्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं. स्वदेशीची किंमत लोकांना कळली, पण आता सरकारनेच एक अजब निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद सुरु झालेत.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने चिनी मोबाईल कंपनी इस्रोशी एक करार केलाय. नाविक (NavIC) मेसेजिंग सर्व्हिसच्या रिसर्च काम या संस्था एकत्र करणार आहेत.
नाविक (NavIC) सिस्टीम ही इस्रोने विकसित केली असून नेव्हिगेशन सांगण्याचं काम ही प्रणाली करते. यामध्ये भारतीय भूमी आणि बाहेरचा १५०० किलोमीटरचा भाग येतो. या प्रणालीचे मुख्य कार्य पीएनटी म्हणजेच पोझीशन सांगणे, नेव्हीगेट करणे टायमिंग बघणे हे आहे. या प्रणाली मार्फत छोटे मेसेजेसदेखील पाठवले जातात.
ही प्रणाली अजून विकसित व्हावी यासाठी इस्रोने ओप्पो इंडियाशी करार केला आहे. ओप्पो इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट तसलिम आरिफ यांनी सांगितले, की इस्रोला आणिखीन मजबूत करण्यासाठी आम्ही काम करू. नाविक (NavIC) अॅपचा वापर करणाऱ्या युजर्सना यांनी खूप चांगला अनुभव मिळेल. ओप्पो इंडियाचे ऑफिस दिल्लीत आहे आणि त्यांचे रिसर्च सेंटर हैद्राबादमध्ये आहे.
टेक्निकल सपोर्टसाठी इस्रो आणि ओप्पोमध्ये चर्चा होणार आहे. (NavIC) मेसेजिंग सेवा जलद करण्यासाठी, एन्ड टू एन्ड मेसेजिंग सोल्युशन्स बनवण्यासाठी लागणाऱ्या माहितीची देवाणघेवाण इस्रो आणि ओप्पोमध्ये होणार आहे. भारतीय युजर्सना डोळ्यांसमोर ठेऊन हे काम होणार आहे.
ज्या भागांमध्ये कम्युनिकेशन सुविधा नाहीये किंवा खूप कमी आहे अशा भागांसाठी ही सेवा काम करेल. मुख्यतः समुद्री भागांसाठी या सेवेचा उपयोग होईल.
ओप्पो इंडियाने ट्विट करून असे म्हटले आहे, की आत्मनिर्भर भारताला समोर ठेऊन आम्ही इस्रोशी हा करार केला आहे.
या करारावरून सोशलमीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. टिकटॉकसारख्या चिनी अॅपवर सरकारने बंदी आणली होती. अजूनही सीमा भागांमध्ये चीन या विषयावरून चिंतेचं वातावरण आहे. एवढं सगळं असूनही चिनी कंपनीशी केलेला हा करार म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्याची बाब आहे. अनेक नेत्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.