Site icon InMarathi

दिव्याभारतीच्या मृत्यूनंतर, श्रीदेवीला सेटवर पाहून लोक खूप घाबरले कारण …

divya 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दिव्या भारती ही नव्वदच्या दशकातील एक गोड अभिनेत्री होती. हजारो लोक तिचे चाहते होते. कमी वेळात विविध प्रकारचे चित्रपट आणि विविध प्रकारच्या भूमिका केल्यामुळे तिला “तिच्या पिढीतील सर्वात उल्लेखनीय तरुण अभिनेत्री” असा मान मिळाला होता. नव्वदच्या दशकात तिने कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि लवकरच बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींनमध्ये तिचे नाव घेतले जाऊ लागले.

एकापाठोपाठ एक असे अनेक यशस्वी चित्रपट करत असताना अचानक ५ एप्रिल १९९३ रोजी धक्कादायक बातमी आली की दिव्या भारती हे जग कायमचे सोडून गेली. पाचव्या मजल्यावर असलेल्या तिच्या घरातील एका खिडकीतून पडून तिचा अकाली दुर्दैवी अंत झाला.

 

 

आता हा एक अपघात होता की घातपात ह्यावर अनेक वर्षे चर्चा झाली. काहींचे म्हणणे होते की हा निव्वळ एक अपघात होता पण अनेकांना असेही वाटत होते की बॉलिवूड व अंडरवर्ल्ड ह्यांच्यामध्ये असलेल्या कनेक्शनमुळे तिचा खून झाला असावा. तिला असे काहीतरी कळले असावे किंवा तिने असे काहीतरी बघितले असावे जे इतरांना गोत्यात आणू शकेल, म्हणून तिचा पद्धतशीरपणे काटा काढला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे गूढ इतकी वर्षे झाली तरी अजून सुटलेले नाही. केवळ १९ वर्षे वय असलेल्या दिव्या भारतीच्या अश्या संशयास्पद मृत्यूमुळे तिचे अनेक चित्रपट अर्धवटच राहिले. तिच्या केवळ तीन वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत तिने अनेक हिट चित्रपट दिले.

दिव्या भारतीने तिच्या तीन वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत एकूण १४ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तिने ६ दक्षिण भारतीय चित्रपटही केले. दिव्याचा पहिला हिंदी चित्रपट ‘विश्वात्मा’ १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

 

 

या चित्रपटातील ‘सात समुंदर पार’ हे गाणे आजही लोक आवडीने ऐकतात व बघतात. दिव्याचे दीवाना, दिल ही तो है, दिल आशना है, शोला और शबनम, दिल का क्या कसूर, रंग, क्षत्रिय, दुश्मन जमाना, जान से प्यारा, सतरंज हे चित्रपट लोकांना खूप आवडले.ती गेली तेव्हा तिने लाडला या चित्रपटाचे जवळपास ८०% चित्रीकरण पूर्ण केले होते. पण चित्रपट पूर्ण होण्याआधीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचे अर्धवट राहिलेले चित्रपट इतर अभिनेत्रींनी पूर्ण केले. तिचे रंग आणि शतरंज हे चित्रपट तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले.

ती व श्रीदेवी सख्ख्या बहिणी वाटाव्या इतके या दोघींच्या चेहेऱ्यात साम्य होते. म्हणून दिव्या भारतीच्या अर्धवट राहिलेल्या काही चित्रपटांत श्रीदेवीची वर्णी लागली. त्यातील एक प्रमुख चित्रपट म्हणजे ‘लाडला’ होय.

 

दिव्याच्या मृत्यूनंतर अशा काही घटना घडल्या ज्यामुळे लोकांची भीतीने बोबडी वळली. रंग या चित्रपटातील नायिका आयेशा जुल्का हिनेही एका मुलाखतीत दिव्याच्या मृत्यूनंतर सेटवर घडलेल्या विचित्र गोष्टी सांगितल्या होत्या. अशीच एक घटना ‘लाडला’ चित्रपटाच्या सेटवर घडली जो तिचा अर्धवट राहिलेला चित्रपट होता. त्यावेळी श्रीदेवी त्याच ठिकाणी शूटिंग करत होती जिथे दिव्या तिच्या मृत्यूपूर्वी शूटिंग करत होती.

एका दृश्यादरम्यान दिव्या भारती जो संवाद म्हणताना अडकत होती तोच संवाद म्हणताना श्रीदेवी देखील वारंवार ओळी विसरत होती. या सीनमध्ये शक्ती कपूर आणि रवीना टंडन हे दोघे कलाकार देखील होते. जो संवाद म्हणताना दिव्या वारंवार विसरत होती त्याच ओळी श्रीदेवी देखील विसरतेय हे बघून त्यावेळी सेटवर असलेले सगळे लोक घाबरले होते.

 

 

या घटनेनंतर शक्ती कपूरने सुचवल्यावर त्या सेटवर गायत्री मंत्राचे पठण करण्यात आले आणि नारळ फोडण्यात आला. त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग सुरळीतपणे पूर्ण झाले. हा चित्रपट खूप यशस्वी ठरला आणि जर दिव्या भारती असली असती तर तिच्या करिअरमधील हा आणखी एक मोठा हिट चित्रपट ठरला असता. पण श्रीदेवीच्या नशीबात हे यश होते. ह्या चित्रपटासोबतच अनिल कपूर आणि श्रीदेवीची जोडीही इंडस्ट्रीत खूप गाजली. या दोघांचे ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘लम्हे’ असे अनेक चित्रपट यशस्वी झाले.

 

दुर्दैव असे की गुणी आणि अनेकांची लाडकी अभिनेत्री श्रीदेवी हिचाही अकाली आणि संशयास्पद मृत्यू झाला. ज्याप्रमाणे दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य अजूनही लोकांपुढे आलेले नाही तसेच श्रीदेवीसारख्या व्यक्तीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू कसा होऊ शकतो हे सुद्धा अजूनही पचनी पडत नाही. दिव्या भारती व श्रीदेवी ह्या दोघींचेही चाहते त्यांची अजूनही आठवण काढतात. ह्या दोन्ही अभिनेत्रींना भावपूर्ण श्रद्धांजली!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version