' ‘K3G’च्या यशाचा सोहळा; मात्र काजोलच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ… – InMarathi

‘K3G’च्या यशाचा सोहळा; मात्र काजोलच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

सिने कलाकारांच्या आयुष्यामध्ये अनेक अशा घटना घडत असतात ज्याबद्दल आपल्याला जाणून घेण्यात प्रचंड रस असतो.

अशीच एक घटना स्वतः काजोल देवगण हिने काही महिन्यांपुर्वी एका फेसबुक पेज वरती शेअर केलेली आहे.

 

bollywood gossip inmarathi

 

तिने एका इंटरव्ह्यूमध्ये कभी खुशी कभी गम या चित्रपटा दरम्यानची एक आठवण सांगितली आहे. ज्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊ!

कभी खुशी कभी गम चित्रपट १४ डिसेंबर २००१ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने तेव्हा प्रचंड कमाई केलेले होती. बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर पैकी एक असा हा चित्रपट मानला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ह्रितिक रोशन, करीना कपूर आणि काजोल अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटाने प्रचंड ॲवॉर्ड देखील मिळवले आहेत.या स्टारच्या अभिनयामुळे हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला.

 

 

k3g inmarathi

 

आज देखील या चित्रपटाची प्रत्येक जण आठवण काढताना दिसून येईल.

परंतु कदाचित काजोल साठी या चित्रपटाच्या आठवणी आनंददायी नसतील कारण जेव्हा या चित्रपटातील सर्व कलाकार या चित्रपटाच्या प्रचंड यशस्वीतेचे सोहळे करत होते तेव्हा काजोल प्रचंड त्रास सहन करत होती!

याबाबतीत काजोलने प्रसिद्ध इंस्टाग्राम पेज ह्यूमन्स ऑफ बॉम्बे मध्ये आपले म्हणणे शेअर केलेले आहे.

 

kajol inmarathi

 

काजोल देवगण बद्दल आपण सर्वजण जाणतोच. तिचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ रोजी झाला होता तिचा जन्म एका बंगाली कुटुंबात झाला होता!

काजोल ची आई देखील हिंदी सिनेमांमध्ये काम करत असे. त्यामुळेच काजोलनेही तिचा वारसा पुढे चालवत बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये काम करताना अनेक विक्रम रचले आहेत.

kajol & tanuja

 

तिच्या बॉलीवूडमधील कामासाठी तिचे नेहमीच कौतुक केले जाते. ती एक चांगली कलाकार आहे. तिला आजपर्यंत सहा फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळालेले आहेत.

२०११ मध्ये तिला पद्मश्री सारखा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. जो पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि पैकी एक समजला जातो.

 

kajol padmashree

 

२४ फेब्रुवारी १९९९ मध्ये काजोल आणि अजय देवगण यांनी लग्न केलं. लग्न करायच्या आधी तब्बल चार वर्ष त्यांचं अफेअर देखील होतं. घरच्या विरोधामुळे काजोल लग्नाला होकार द्यायला थोडा वेळच केला होता!

मग त्यानंतर करिअर आणि वैवाहिक आयुष्य या गोष्टी सांभाळताना या दोघांचीही तारांबळ उडत असे. लग्नाबद्दलची एक आठवण सांगताना काजोल म्हणते की,

 

ajay devgan kajol marriage

 

” आम्ही एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं ठरवलं होतं. आम्ही घरीच लग्न केलं होतं. आम्हाला मीडियाचा लुडबुड नको होती त्यामुळेच आम्ही मीडियाला चुकीची जागा सांगितली जेणेकरून आम्हाला लग्न मध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही. ”

“आम्ही पंजाबी आणि मराठी या दोन्ही पद्धतीने लग्न केलं होतं.”

“मला आजही आठवतं की लग्नामध्ये अजय एवढा कंटाळला होता की त्याने भटजींना पैसे देऊन लवकर विधी करायला सांगितलं होतं ”

 

kajol marriage inmarathi

काजोल आणि अजय देवगण यांनी इश्क, प्यार तो होना ही था, यू मी और हम असे अनेक चित्रपट त्याआधी सोबत केलेले होते.

नुकताच त्या दोघांनी तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट केलेला आहे. चित्रपट सध्या बॉलिवुडमध्ये धुमाकूळ घालत आहे. अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढलेले आहेत.

 

tanhaji inmarathi

 

या चित्रपटात देखील दोघांनीही आपली व्यक्तिरेखा खूप चांगल्या पद्धतीने साकारलेले आहे काजोलने देखील चांगली जबाबदारी बजावलेली आहे.

कभी खुशी कभी गम या चित्रपटाबद्दल बोलताना काजोल म्हणाली की या चित्रपटाच्या आधीच आमचं लग्न झालं होतं. लग्नाच्या नंतर लगेच आम्हाला मुलं हवी होती.

२००१ मध्ये जेव्हा कभी खुशी कभी गम या चित्रपटाचं काम सुरू झालं तेव्हा मी प्रेग्नंट होते. परंतु माझं मिसकॅरेेज झालं. ज्या दिवशी या चित्रपटाने सर्वात जास्त कलेक्शन केलं नेमकं त्याच दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होते.

या चित्रपटाच्या यशामुळे त्या चित्रपटात काम करणारा प्रत्येक कलाकार अत्यंत आनंदी होता परंतु मी मात्र हॉस्पिटलमध्ये प्रचंड त्रास सहन करत होते. त्यानंतर मी परत प्रेग्नेंट होते तेव्हा देखील मिसकॅरेेज झालं. तो काळ मोठा कठीण होता.

परंतु त्यानंतर सर्व काही ठीक झालं न्यासा आणि युग आमच्या जीवनात आले आणि आमचं सुखी परिवाराचं स्वप्न पूर्ण झालं.

 

kajol family inmarathi

 

ह्युमन्स ऑफ बॉम्बे सोबत बोलताना काजोलने तिच्या आयुष्यातील आणखीही काही आठवणी शेअर केलेल्या आहेत. त्यामध्ये अजय देवगण आणि तिची झालेली पहिली भेट आणि इतरही अनेक आठवणी आहेत.

या तिच्या आठवणी जाणून घेऊयात तिच्याच शब्दांमध्ये.

याच इंटरव्ह्यूमध्ये बोलताना काजल पुढे म्हणाले की,

” आम्ही पंचवीस वर्षांपूर्वी भेटलो होतो. ‘हलचल’ म्हणून एक सिनेमा आम्ही दोघेही करत होतो. या सिनेमाच्या सेटवरतीच आमची पहिली भेट झाली. मी सेट वरती शूटिंगसाठी रेडी होते आणि मी हिरो बद्दल चौकशी केली तेव्हा एका स्पॉटबॉय ने अजय कडे बोट केलं.

तो अत्यंत शांतपणे एका कोपऱ्यात बसून काहीतरी वाचन करत होता. तेव्हा त्याला पाहून मी काही अपशब्द देखील वापरले.

 

hulchul inmarathi

 

त्यानंतर आम्ही भेटलो आम्ही एकमेकांशी गप्पा मारल्या आणि आम्ही खूप चांगले मित्र देखील झालो. तेव्हा आम्ही दोघंही वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होतो. मी तर अगदी माझ्या बॉयफ्रेंडच्या तक्रारीदेखील अजय कडे करत असे.

परंतु लवकरच माझं आणि माझ्या बॉयफ्रेंडच ब्रेकअप झालं आणि अजयच देखील ब्रेकअप झालं.

आमच्यापैकी कोणीही एकमेकांना प्रपोज केलेलं नाही कारण आम्हाला माहिती होतं की आम्हाला संपूर्ण आयुष्य सोबत व्यतीत करायचं आहे.

आमच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार आले. एकमेकांचा हात हातात घेण्या पासून सुरू झालेले हे नातं आम्हाला काही कळायच्या आत आमच्यासाठी फार महत्त्वाचं झालं आणि मग आम्ही एकमेकांसाठी वेळ द्यायला लागलो.

आम्ही सोबत डिनरला जात असू त्यासोबतच आम्ही लॉंग ड्राईव्ह वर देखील बऱ्याच वेळेस गेलेलो आहोत. तो जुहूमध्ये राहत होता आणि मी साउथ बॉम्बे मध्ये त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत कारमध्येच वेळ घालवत असु.

 

kajol old inmarathi

 

माझ्या काही मैत्रिणींनी मला त्याच्याबद्दल सावधान देखील केलं होतं. तो अगदीच शांत असे परंतु तो इतरांसाठी शांत असे माझ्या सोबत असताना मात्र मला वेगळाच अजय बघायला मिळत असे.

त्यामुळेच मला अजय जास्त आवडत असे! आम्ही चार वर्ष एकमेकांना डेट केल आणि जेव्हा आम्ही लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा त्याचे आई-वडील तयार होते, मात्र माझ्या वडिलांना हे सर्व मान्य नव्हतं. त्यांना तेव्हा माझं करिअर महत्त्वाचं वाटत होतं.

त्यामुळेच जेव्हा मी लग्नाचा विषय घरी काढला तेव्हा माझ्या वडिलांनी चार दिवस माझ्यासोबत संभाषण केलं नाही.

परंतु मी यावेळी निर्धार केला होता. काही काळाने घरून देखील मान्यता मिळाली. लग्नाच्या वेळी देखील आमच्यापैकी कोणीही एकमेकांना लग्नाबद्दल विचारलं नाही कारण आम्हाला माहित होतं की आम्हाला एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करायचं आहे.

आम्ही घरीच लग्न केलं आम्हाला मिडीयाची लुडबुड नको होते त्यामुळे आम्ही मीडियाला चुकीचे ठिकाण सांगून घरीच विवाह सोहळा पार पाडला.

 

kajol married inmarathi

 

आम्ही दोन पद्धतीने लग्न केल एक पंजाबी पद्धत आणि दुसरी मराठी पद्धत, त्यामुळे आमचा विवाह सोहळा जरा जास्तच लांबत गेला. आम्ही दोघे देखील प्रचंड वैतागलो होतो आणि भटजींना हा सोहळा लवकर संपवावा अशी विनंती करत होतो.

लग्नानंतर मला हनीमून साठी कुठेतरी लांब जायची इच्छा होती त्यामुळेच आम्ही सिडनीला, हवाई लोस अंजीलीस असे अनेक ठिकाणी आम्ही हनिमूनच्या दरम्यान फिरलो आणि पाच आठवड्यानंतर अजय आजारी पडला.

मला म्हणाला की,” आपण आता पुढच्या फ्लाईट मी घरी जाऊयात” आम्हाला इजिप्तला देखील फिरायला जायचं होतं.

परंतु अजय आजारी असल्यामुळे आम्ही घरी परत आलो. त्यानंतर आम्ही पुढे मुलांची प्लॅनिंग देखील लवकरच सुरू केल.

“कभी खुशी कभी गम” या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान मी प्रेग्नंट होते परंतु दुर्दैवाने मिसकॅरेेज झालं. आम्ही आमच्या यशा सोबतच आयुष्यामध्ये अनेक चढ-उतर सोबत बघितले आहेत.

 

sad kajol

 

आता आम्ही स्वतःची एक कंपनी तयार केलेली आहे. आम्ही रोज नवीन काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. अजय सोबत आयुष्य खूपच आनंददायी आहे.

आम्ही खूप रोमँटिक वगैरे नाही परंतु आम्ही एकमेकांची नेहमीच काळजी घेत असतो आणि हे आम्हा दोघांसाठी देखील भरपूर आहे.

 

kajol inmarathi 2

 

आम्ही एकमेकांसोबत कधीही कृत्रिम वागण्याचा प्रयत्न केला देखील केलेला नाही. जर मला एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल तर कसलाही विचार न करता मी ती गोष्ट बोलून दाखवते. जसे की आता मला वाटत आहे की अजयने मला ईजीप्तला घेऊन जायला हवं.”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?