आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
यंदा ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पार पडले. या साहित्य संमेलनात गालबोट लावणाऱ्या काही घटना घडल्या, त्यापैकी एक घटना म्हणजे लेखक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली.
अशा घटना संभाजी ब्रिगेडकडून घडणं आपल्यासाठी नवीन नाहीत, याआधी तर चक्क कै.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरसुद्धा शाई फेकण्याचं कृत्य त्यांच्याकडून घडले आहे.
त्यामुळे कुबेरांच्या या घटनेनंतर संभाजी ब्रिगेड ही संस्था पुन्हा चर्चेत आली. काय आहे ही संस्था, आतापर्यंत कोणकोणत्या कारणांमुळे ती चर्चेत आली आहे? ते पाहुयात आजच्या लेखात
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
कोणी केली संभाजी ब्रिगेडची स्थापना?
१ सप्टेंबर १९९० रोजी अकोल्यात मराठा सेवा संघाची स्थापना झाली. सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला जिल्यात या संघाची स्थापना केली.
मराठा- कुणबी समाजाचं प्रबोधन करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, या समाजातील अधिकाऱ्यांना एकत्र करणं हा प्रमुख उद्देश या संघाचा होता. पुढे या संघाचे ३० हून अधिक विभाग झाले. या संघाने पुढे मोठं स्वरूप घेतलं.
संघाने जे ३०-३२ विभाग केले, त्यात तरुणांसाठीचं ‘संभाजी ब्रिगेड’ कायम चर्चेत राहिलं.
संभाजी ब्रिगेड आणि त्यामुळे झालेल्या विविध चर्चा –
भांडारकर प्राच्यविद्या संशोधनावर झालेला हल्ला –
जानेवारी २००४ मध्ये पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर काही लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात संस्थेत खूप नासधूस झाली. अनेक पुस्तकं खराब झाली. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले. हा हल्ला संभाजी ब्रिगेडने केला होता. तेव्हा, संभाजी ब्रिगेड हे नाव चर्चेत आलं.
अमेरिकन लेखक जेम्स लेन यांच्या ‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकातील आक्षेपार्ह विधानांमुळे हा हल्ला करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी आणि वीरमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड यांनी केला होता.
या हल्ल्यात त्यांनी भांडारकर संस्थेतील महत्त्वाच्या, दुर्मिळ हस्तलिखितांची नासधूस केली. या हल्ल्यानंतर ७२ जणांना अटक करण्यात आली होती.
—
- छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्यांना ‘हे’ सत्य दिसत नाही की मान्य नाही?
- शिवरायांना मिळालेला खजिन्याचा संकेत आणि संभाजी राजांचं कवित्व यांचा साक्षीदार!
—
दादोजी कोंडदेव यांचा पुतळा –
पहिला वाद शांत होतो न होतो, संभाजी ब्रिगेडने ‘दादोजी कोंडदेव’ यांच्यावरून एक नवीन वाद सुरु केला. दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवरायांचे गुरु नाहीतच, त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार रद्द व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने केली.
हा वाद पुढे वाढत गेला. लालमहालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला.
वाघ्या कुत्र्याची समाधी –
‘वाघ्या’ कुत्रा हा शिवाजी महाराजांचा नव्हताच, असं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून त्याच पुतळा दरीत फेकला.
राम गणेश गडकरी यांचा पुतळा –
गडकरी यांनी आपल्या साहित्यातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील त्यांचा पुतळा मुठा नदीत फेकला होता.
लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक –
कुबेरांनी लिहिलेल्या “रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र” या पुस्तकातील मजकुरामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे, म्हणूनच कुबेरांचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने कुबेरांच्या तोंडाला शाई फासली.
एकंदरीत काय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वीरमाता जिजाऊ यांच्यावरील आक्षेपार्ह विधानांवरून त्यांची अनेकदा हल्ले केले आहेत. मात्र पुढे काही मुद्द्यावरून वाद झाल्याने दोन संभाजी ब्रिगेड अस्तित्वात आल्या.
२०१६ साली मराठा सेवा संघापासून प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक गट वेगळा झाला आणि त्याच गटातील संभाजी ब्रिगेडने गिरीश कुबेरांवे शाईफेक केली आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.