Site icon InMarathi

”घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू”: पाकिस्तान्यांना आव्हान देणारे बिपीन रावत यांचा जीनवप्रवास

bipin 1 inmaathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – संजीव वेलणकर

===

भारतातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ(सीडीएस अधिकारी) बिपिन रावत यांचे आज हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.

सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरण खराब आहे. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
बिपिन रावत यांचा अल्पपरिचय!

जन्म.१६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे!  बिपिन रावत हे देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस अधिकारी) होते. सीडीएसचे काम लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे होती.

बिपिन रावत यांचे वडील एल एस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एल एस रावत म्हणून ओळखले जात होते. बिपिन रावत यांचे बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं.

त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

बिपिन रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना १६ डिसेंबर १९७८ रोजी यश मिळाले. त्यांना गुरखा ११ रायफल्सच्या ५ व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली.

 

 

रावत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आले ते इतरत्र कुठंही शिकायला मिळालं नाही. इथं त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आय एम ए देहराडून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.

सैन्यात असताना बिपिन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली होते. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली होती. त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या आणि ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक काम करत होते.

बिपिन रावत म्हणत असतत, की त्यांनी एकट्याने काहीही केलं नाही. टीम वर्कमुळेच यश मिळालं. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले, आता ते भारतातील पहिले सीडीएस अधिकारी म्हणूनही काम करत होते.

मधुलिका रावत या बिपीन रावत यांच्या पत्नी होत. मधुलिका रावत यांचे ही या अपघातात निधन झाले आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version