Site icon InMarathi

त्याचा नकार होकारात बदलला नसता तर दया दरवाजा तोडूच शकला नसता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टीव्हीवरच्या काही काही मालिका, कार्यक्रम आपल्या कधीच विस्मरणात जात नाहीत. ते कार्यक्रम बघत बघतच आपण लहानाचे मोठे झालेलो असतो. ‘सीआयडी’ हा असाच एक कार्यक्रम! या कार्यक्रमाने अनेक वर्ष आपली करमणूक केली. प्रत्येक वेळी गुन्हेगाराचा तपास घेतला जायचा तेव्हा आपलाही त्या तपास घेणाऱ्यांबरोबर नकळत एक प्रवास घडायचा.

तो संबंध वेळ आपले डोळे आणि मन टीव्हीला खिळलेलं असायचं. उत्सुकता ताणली गेलेली असायची. पाहता पाहता तब्बल २१ वर्षं या कार्यक्रमाने आपल्या मनावर राज्य केलं.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

एसीपी प्रद्युमनच्या बरोबरीने साळुंके, दया ही सीआयडीतली बाकीची पात्रंही चांगलीच लोकप्रिय झाली. ‘सीआयडी’ मधले संवादही आपल्या चांगलेच लक्षात राहिले. कुठलाही ‘सीआयडी’ प्रेमी “दया दरवाजा तोड दो” हा संवाद कसा विसरेल! ‘दया’ या पात्रामुळेच खऱ्या आयुष्यातल्या दयानंद शेट्टीला ‘सीआयडी’ मुळे खरी ओळख मिळाली. पण दयाला खरंच आधीपासून ‘सीआयडी’त काम करायचं होतं का?

दयानंद शेट्टीचा अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा अजिबातच विचार नव्हता. त्यांचा हॉटेलचा वडिलोपार्जित व्यवसाय होता ,त्यामुळे त्यालाही पुढे तेच करणं सुरू ठेवायचं होतं. मात्र छंद म्हणून त्याने अभिनय करणं सुरू ठेवलं होतं. बऱ्याच जणांनी त्याला ‘तू छान अभिनय करतोस. तू व्यावसायिक अभिनेता व्हावंस.”, असं  सुचवलं. त्यानंतर त्याने नाटकात कामं करायला सुरुवात केली. तिथे आपल्या कामाचं कौतुक होतंय हे पाहून तो दूरचित्रवाणीकडे वळला.

नंतर १९९८ मध्ये त्याने सोनीच्या ‘सीआयडी’ कार्यक्रमातून दूरचित्रवाणीवर पदार्पण केले.

 

२००७ साली आलेल्या ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाव्यतिरिक्त त्याने ‘रनअवे’, ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटांमधूनही आपली अभिनयकौशल्यं दाखवली आहेत. असं असलं तरी आपल्याला ‘सीआयडी’तला ‘दया’ म्हणूनच दयानंद शेट्टी लक्षात राहिलेला आहे.

दयानंद शेट्टीला मोठं केलेल्या, घराघरात पोहोचवल्या ‘दया’च्या भूमिकेला त्याने मात्र आधी नकार दिलेला होता. दयानंद शेट्टी हा अभिनेता होण्यापूर्वी एक खेळाडू होता. तो एक उत्तम शॉटपूट खेळाडू आणि डिस्कस थ्रोवर होता. पण पायाला झालेल्या जखमेमुळे त्याला क्रीडाक्षेत्रातल्या आपल्या करिअरला रामराम ठोकावा लागला.

दयानंद शेट्टीने टीव्हीवरचे एकूण १५ कार्यक्रम आणि ३ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘सीआयडी’व्यतिरिक्त त्याने ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘कुमकुम’, ‘डील या नो डील’, ‘जिना इसी का नाम है’ या आणि अशा अनेक कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ‘झलक दिखला जा’, ‘एक्स – फॅक्टर’, ‘एंटरटेनमेंट के लिये कुछ भी करेगा – ४’, ‘सूर्या द सुपर कॉप’, ‘कहानी कॉमेडी सर्कस की’, ‘आपका सपना हमारा सपना’, सायलेंट कॉमेडी शो ‘गुटूर गु’ अशा कार्यक्रमांमधूनही तो झळकला आहे.

दयानंद शेट्टीने वेगवेगळ्या नावाजलेल्या ब्रॅण्ड्स बरोबर मॉडेल म्हणून काम केलं आहे.

 

 

‘सीआयडी’ने इतिहास रचला. पण हा कार्यक्रम इतका चालेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. जास्तीत जास्त हा कार्यक्रम दोन वर्षं चालेल असं त्यातल्या सगळ्या कलाकारांना वाटलं होतं. कधीकधी एखादी छोटी भूमिकाही आपलं नशीब घेऊन येत असावी.

असे कितीतरी कार्यक्रम आणि चित्रपट जितके आपल्याला त्यातल्या मुख्य पात्रांमुळे लक्षात राहतात तितकेच त्यातल्या छोटी भूमिका असलेल्या पात्रांमुळेही राहतात. या छोट्या पात्रांना प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळतं आणि त्यांच्या भूमिकांचं पाहतापाहता सोनं होतं. ‘सीआयडी’तलया ‘दया’च्या बाबतीतही असं म्हणणं योग्य ठरेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version