Site icon InMarathi

दिग्दर्शकाने ‘कट’ सांगूनही वेड्यापिश्या विनोद खन्नाने डिंपलला किस करणं सुरूच ठेवलं

dimpal vinod feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडमध्ये चित्रपट चालण्यासाठी एकत्र त्यात आयटम सॉंग ओढूनताणून घातलं जातं किंवा मग एखादा जबरदस्त बोल्ड सीन घुसवला जातो, अर्थात दरवेळेस चित्रपटाच्या कथानकाचा आणि या बोल्ड सीनचा संबंध असेलच असं नाही.

बोल्ड सीन्स म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर काही ठराविक अभिनेते किंवा चित्रपट येतात. बोल्ड सीन्स असणाऱ्या चित्रपटांना जास्त पसंती मिळत असली, तरीही हे सीन्स करणं सोपं काम नव्हे, अनेकदा असे सीन्स करताना अभिनेत्यांचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि काहीतरी भलतंच होऊन बसतं. अशावेळेस ती अभिनेत्रीही गांगरून जाते.

 

 

सत्तर- ऐंशीच्या दशकात अशाच एका अभिनेत्यासोबत बोल्ड सीन करायला अभिनेत्री घाबरायच्या, तो अभिनेता म्हणजे ‘विनोद खन्ना’. विनोद खन्नासोबत बोल्ड सीन्स द्यायला अभिनेत्री विचार करत असतं, यामागे कारणही तसंच होतं.

धक धक गर्ल माधुरी दीक्षित, डिंपल कपाडिया अशा अनेक अभिनेत्रींना याआधी विनोद खन्नासोबत काम करण्याचा असा वाईट अनुभव आला आहे. बोल्ड सीन्स देत असताना विनोद खन्ना यांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्यांनी सीन चालूच ठेवला.

 

 

१९८८ सालचा हा किस्सा आहे. तेव्हा महेश भट्ट हेमामालिनी, डिंपल आणि विनोद खन्ना यांना घेऊन ‘मार्ग’ हा चित्रपट करत होते. हा काळ विनोद खन्नाने चांगलाच गाजवला होता. ‘सुपरस्टार’ म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

महेश भट्ट यांच्या ‘मार्ग’ या चित्रपटात विनोद खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचा एक बोल्ड सीन शूट करायचा होता. यामध्ये विनोद खन्ना आणि डिंपल यांचा एक किसिंग सीन होता, सीनचं शूटिंग चालू असताना दिग्दर्शकाने ‘कट’ असे म्हणूनही विनोद खन्ना यांनी डिंपलला किस करणं चालूच ठेवलं.

या चित्रपटाचा शूटिंग रात्री सुरु होतं. लाईट कमी करण्यात आले होते. महेश भट्ट यांनी ‘अॅक्शन’ असं म्हणताच विनोद खन्नाने डिंपलला मिठीत घेऊन किस करायला सुरुवात केली. त्याच्या या आवेशाने डिंपल घाबरून गेली. महेश भट्ट यांनी लगेचच ‘कट’ असं म्हणूनही विनोद खन्नाने किस करणं थांबावलंच नाही. डिंपलने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि ती मेकअप रूममध्ये पळाली.

असाच अनुभव धक धक गर्ल माधुरी दीक्षितलाही आला होता. माधुरी आणि विनोद खन्ना ‘दयावान’ या चित्रपटात एकत्र काम करत होते. फिरोज खान यांनी या चित्रपटासाठी माधुरीला १ कोटी रुपयांचं मानधन दिलं होतं.

 

 

या चित्रपटातील ‘आज फार तुमपे प्यार आय है’ या गाण्यात माधुरी आणि विनोदचे हॉट सीन्स होते. आणि किसिंग सीनमध्ये विनोद खन्नाचा स्वतःवरील ताबा सुटला होता.

या चित्रपटातील सीनमुळे माधुरीवर सडकून टीका झाली होती, तिने हा सीन काढण्याची मागणीही केली होती, पण फिरोज खान यांनी तो सीन अजिबात काढला नाही. याच सीनमुळे चित्रपट चांगलाच गाजला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने तुफान कमाई केली.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version