आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. सर्व धर्मातील, जातीतील लोक तेथे एकोप्याने राहतात, आपली परंपरा जपतात, मान ठेवतात आणि गुण्यागोविंदाने राहतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आपल्या देशात भरपूर मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराचा सुरेख असा इतिहास आहे. हा इतिहास आपल्या देव देवतांशी संबंधित आहे, ज्याचा उल्लेख स्कंद पुराणात किंवा पौराणिक,अध्यात्मिक पुस्तकांमध्ये वाचायला मिळतो.
करोडो लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतात प्रत्येकाचे असे वेगळे श्रद्धा स्थान आहे. देवावर प्रत्येकाची श्रद्धा आहे, विश्वास आहे, म्हणूनच आपल्या भारतात ३३ कोटी देव आहेत. प्रत्येकाचे कार्य वेगळे, अवतार घेण्यामागे लपलेली कथा वेगळी. या सर्व देवी देवतांनी लोककल्याणासाठी सतत वेगवेगळे अवतार घेऊन आपल्या हिताचाच विचार केला, प्रसंगी युद्ध सुद्धा केले.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर, जे महाबळेश्वर येथील शिवमंदिरामुळे खूप नावाजलेले आहे. याच शिवमंदिराच्या निर्मितीमागे एक सुंदर इतिहास दडलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील भारत देशाचे एक खास आकर्षण आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा भोवती वेढलेले हे सुंदर हिल स्टेशन आहे.
येथे फिरायला येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. येथील गर्दी कधीच कमी होत नाही. निसर्गाचे वरदान लाभलेले हे सुंदर ठिकाण अतिशय नयनरम्य आणि प्रेक्षणीय असे आहे.
पाण्यात खेळण्याची आवड असणाऱ्या लोकांसाठी हे खास आकर्षण असलेले ठिकाण आहे, कारण येथे धोबी धबधबा आणि चीनामनाज पाण्याचा फॉल येथे आहे. त्यामुळे पाण्यात ट्रेकिंग करणे, तसेच बोटिंग करणे या गोष्टींसाठी आवर्जून जावे असे हे ठिकाण आहे.
येथील एकेकँट हेड पॉइंट तसेच अर्थुट सीट हे ठिकाणे विशेष पाहण्यासारखी आहेत. आपण येथे बसने, रेल्वेने तसेच विमानाने जाऊ शकतो. मड स्मोक हाऊस आणि बगीचा कॉर्नर हे येथील खाण्यासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे आहेत.
—
- महाराष्ट्रातील ही दहा ठिकाणे तुमची हिवाळ्यातील सहल एकदम भारी करुन टाकतील!
- “ब्रह्म” देवाचं एकच मंदिर असण्यामागे कारणीभूत आहे ‘सावित्रीचा शाप’!
—
या ठिकाण सोबतच महाबळेश्वरचे अजून एक खास आकर्षण म्हणजे येथील महाबळेश्वर शिवमंदिर. महाबळेश्वर येथे खूप उंचच उंच पर्वतरांगा आहेत, तसेच या मंदिराची रचना हमदांता पद्धतीने केली गेली आहे, जे दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे.
या मंदिराच्या भिंती पाच फूट उंचीच्या असून भिंतींवर भगवान शंकराची सवारी असलेले नंदी आणि अंगरक्षक असलेले काळभैरव यांचे कोरीव शिल्प आहे. येथे नवरात्री आणि महाशिवरात्री हे हिंदू सण अतिशय उत्साहाने आणि मोठ्या थाटात साजरे केले जातात.
हे मंदिर आठशे वर्षांपूर्वीचे असून येथील शिवलिंग हजारो वर्षांपूर्वीच्या आहे. या मंदिरात श्री छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाबाई यांच्या वजनाची सोन्याची तुला म्हणजेच तुलदान करत असत आणि गरजू लोकांना वाटत असत.
या मंदिराची एक खास कथा आहे ज्याचे वर्णन स्कंद पुराणात पहिल्या दोन भागात केले गेले आहे.
ही कथा तेव्हाची आहे जेव्हा ब्रह्मदेव पद्मकल्पमध्ये सह्याद्री जंगलाची मानवजात साठी निर्मिती करत होते. तेव्हा सृष्टीनिर्माण केली जात होती. त्यावेळी असुर बांधव अतीबळ आणि महाबळ हे सृष्टीनिर्मितीत अडथळे निर्माण करत होते. महाबळेश्वरमध्ये असलेले हजारो वर्षांपूर्वीचे रुद्राक्ष आकाराचे, स्वयंभू शिवलिंग लंकेचा राजा असुर रावण घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता.
त्या वेळी भगवान विष्णूंनी युद्ध करून त्या भागाचे रक्षण केले होते. युद्धाच्या वेळी अतीबाल मारला गेला, मिळालेल्या वरदानमुळे महाबळ मात्र जिवंतच राहिला. त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला कोणीच मारू शकणार नव्हते. तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली आणि भगवान शंकर आदिमायेच्या मदतीने महाबलाकडे गेले.
त्यावेळी आदिमायेन महबळाच्या सुंदरतेचे वर्णन केले आणि त्याला शरण येण्यासाठी विचारले. तेव्हा महाबळ शरण जाण्यास तयार झाला, पण महादेव शंकरांनी याच भागात कायम वास्तव्य करावे अशी त्याने मागणी केली. त्यावर भगवान शंकर तेथे राहायला तयार झाले आणि हे ठिकाण तुझ्या नावावरूनच ओळखले जाईल असे वरदान महाबळाला देण्यात आले, म्हणून या ठिकाणाला महाबळेश्वर असे म्हटले जाते.
हे मंदिर सकाळी ५-१२ या वेळेत तर संध्याकाळी ४-९ या वेळेत दररोज उघडे असते, तर अशा या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात दर्शनासाठी जायलाच हवे. हो ना??
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.