' सर्वत्र व्हायरसची दहशत; पण प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा हा ‘व्हायरस’! – InMarathi

सर्वत्र व्हायरसची दहशत; पण प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा हा ‘व्हायरस’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – धनंजय कुरणे 

VIRU सहस्त्रबुद्धे अर्थात ‘व्हायरस’ हे बॉलीवूडमधलं एक अफलातून आणि कायम लक्षात राहणारं कॕरॕक्टर आहे. ‘थ्री इडियटस्’ चा नायक खरंतर ‘रणछोडदास’ उर्फ ‘रँचो!’ हा ‘रँचो’ आपल्याला, त्याच्या चमकदार बुद्धिमत्तेमुळे आणि ‘आऊट अॉफ द बॉक्स’ विचारांमुळे भारावून टाकतोच, पण ‘अभिनयाच्या दृष्टीनं’ विचार केला तर ‘व्हायरस’ साकारणाऱ्या बोमन इराणीनं ‘नाद खुळा’ कामगिरी केली आहे.

इंजिनियरिंग कॉलेजच्या प्रिसिपॉलचा जो ‘मॕनरिझम’ त्यानं उभा केलाय त्याला तोडच नाही. त्याची ‘ड्रॕकोनियन’ पद्धत आणि रँचोची ‘easy going policy’ यातला विरोधाभास हा या सिनेमाचा आत्मा आहे. सध्याच्या लोकप्रिय परिभाषेत सांगायचं तर या सिनेमात बोमन इराणीनं अक्षरशः ‘तोडलंय!’

 

boman irani inmarathi

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘मुन्नाभाई MBBS’ मधला बोमनचा ‘डॉ. जे. सी. अस्थाना’ हा देखील असाच अद्भुत होता. त्याची हुशारी, नीतीमत्ता, पांढरपेशी वृत्ती विरुध्द मुन्नाभाईची दादागिरी आणि मठ्ठपणा… हे द्वंद्व केवळ लाजबाब होतं! इथूनच बोमन सिनेइंडस्ट्रीत स्थिरावला आणि अनेक दिग्दर्शकांना हवाहवासा वाटू लागला.

इथून त्याची कारकीर्द सुपरफास्ट वेगानं धावायला लागली. टॉपचे सगळे दिग्दर्शक त्याला ‘साईन’ करु लागले. जबरदस्त रुबाबदार व्यक्तिमत्त्व … चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज.. खानदानी श्रीमंत वा ‘आंग्लाळलेल्या’ भूमिकांसाठी अगदी सुयोग्य…

 

boman-irani-inmarathi

 

इतकी जबरदस्त पर्सनॕलिटी असलेला माणूस ‘ताज’ हॉटेल मधे ‘वेटर’ होता हे कुणाला पटेल काय? त्यानं ‘वेटर’चा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला होता… नंतर त्यानं ‘ताज’मधे नोकरी पकडली. तरुणपणी तो अतिशय राजबिंडा दिसायचा. त्याला ‘वेटर’ म्हणून ‘अॉर्डर’ देत असताना कस्टमरवरच दबाव येत असेल बहुतेक.

तो जरी ‘वेटर’चं काम करत असला तरी त्याचं पहिलं प्रेम होतं ‘फोटोग्राफी!’.. विशेषतः ‘स्पोर्टस् फोटोग्राफी!’ वेटर म्हणून मिळणाऱ्या ‘टीप’ चे पैसे साठवून त्यानं एक उत्तम कॕमेरा घेतला. ‘स्कूल स्पोर्टस्’ चे फोटो काढून तो २०-३० रुपयांना विकायचा.

 

boman irani inmarathi1

 

त्याला ‘बॉक्सिंग’ खूप आवडायचं. बॉक्सिंगच्या ‘वर्ल्ड कप’ मधे फोटोग्राफीची संधी मिळावी म्हणून त्यानं सहा महिने काही स्पर्धांमधे ‘फुकट’ फोटोग्राफी केली. त्यानं काढलेले फोटो ‘बॉक्सिंग असोसिएशन’ला आवडले. वर्ल्डकपसाठी अधिकृत फोटोग्राफर म्हणून त्याची निवड झाली.

असा हा हरहुन्नरी माणूस. ८०च्या दशकात याला अचानक ‘अॕक्टिंग’ शिकायची इच्छा झाली. मग अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं.. आणि रंगभूमीवर पदार्पण केलं. जवळजवळ वीस वर्षं चाळीसहून अधिक नाटकात विविधरंगी भूमिका वठवल्या. जेव्हा तो सिनेमात आला तेव्हा चाळीशी उलटून गेली होती. त्यामुळे ‘हीरो’चे रोल मिळायचा सवालच नव्हता, पण यानं अनेक भूमिकांत हीरोलाच ‘खाऊन टाकलं.’

त्याच्या अविस्मरणीय भूमिकांची यादी भलीमोठी आहे. ‘मैं हूँ ना, डरना मना हैं, लक्ष्य, मैंने गांधी को नही मारा, बूम, वक्त, वीर जारा, पेज थ्री, खोसला का घोसला, मि. प्राईम मिनिस्टर, नो एंट्री, लगे रहो मुन्नाभाई, हाऊसफुल…. आणि अनेक…. !

 

boman irani inmarathi2

 

बोमनचा जन्म २ डिसेंबर १९५९ चा. तो अवघा सहा महिन्यांचा असताना त्याचे वडील वारले. वडीलांचं ‘फरसाण आणि स्वीटस्’ चं दुकान होतं. परीस्थिती बेतास बात, पण त्याची आई धीराची निघाली. पती- निधनाच्या धक्क्यातून सावरुन तिनं दुकान पुन्हा सुरु केलं… समर्थपणे सांभाळलं.. मुलांना मोठं केलं.

बोमननं ‘मीठीबाई’ कॉलेजमधून शिक्षण घेतलं… आणि वेटर, रुम सर्व्हिस स्टाफ, फोटोग्राफर, नाटकातला नट… अशी खडतर वाटचाल करत शेवटी बॉलीवूडमधे सन्माननीय स्थान प्राप्त केलं.

अनेकांना प्रेरणादायी ठरावी अशी त्याची ही जीवनकहाणी!अंगभूत गुणवत्तेला चिकाटी व परीश्रम यांची जोड देऊन त्यानं स्वतःला ‘काबिल’ बनवलं… आणि ‘थ्री इडियटस्’ मधला बाबा रणछोडदासचा मंत्र खरा करुन दाखवला.. “बच्चा, काबिल बनो काबिल.. कामयाबी तो साली झक मारके पीछे भागेगी!”

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?