Site icon InMarathi

जेव्हा विकीने सलमानसमोरच कतरिनाला मागणी घातली…

salman vicky inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘लव्ह ट्रॅंगल’ ही बाब बॉलिवूडकरांसाठी काही नवीन नाही. अमिताब बच्चन, रेखा आणि जया हे त्रिकूट असो किंवा सैफ, करिना आणि शाहीद! अर्थात  या सगळ्या इदाहरणांमध्ये सलमान खानचं नाव आलं नाही तरच नवल!

ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस अशा अनेक अभिनेत्रीशी नाव जोडणारा सल्लु अजूनही सिंगल आहे. त्याच्या अनेक प्रेयसींनी इतर अभिनेत्यांशी लग्न करत आपली वेगळी निवड केली मात्र प्रत्येक लग्नाच्या दरम्यान त्या वधुवरांपेक्षाही चर्चा झाली ती सलमानचीच.

 

 

सध्या जोधपुरमध्ये शाही विवाह सोहळ्यात रमलेले विकी कौशल आणि कतरिना कैफ जितके चर्चेत आहेत त्याहूनही जास्त चर्चा आहे ती सलमानची! सलमानला लग्नाला बोलवणार का? सल्लुभाई आता रडणार का? अशा अनेक विषयांवर ट्रोलर्सनी तोंडसुख घेतलं आहे. मात्र तुम्हाला हे ठाऊक आहे का की सलमानच्याच समोर विकीने कॅटशी फ्लर्ट केलं होतं.

विश्वास बसत नाहीये? अर्थात सलमानचा इतिहासच तसा असल्याने विश्वास न बसणं स्वाभाविक आहे. मात्र ऊरीमधील जोष कायम ठेवत विकीने हे धाडस केलं होतं.

”मुझसे शादी करोगी?”

बॉलिवूडच्या एका पुरस्कार सोहळ्यात स्टेजवर विकी-कॅट उभे होते. प्रेक्षकांमध्ये इतर सेलिब्रिटींसोबत सलमानही बसला होता. स्टेजवर ही जोडी गप्पांमध्ये रमली होती.

अचानक विकीने कतरिनाला विचारलं ”तुम्ही, विकी कौशल सारखा एखादा चांगला मुलगा बघून लग्न का करत नाही?”.

विकीने सर्वांसमोर अचानक हा प्रश्न विचारल्याने कॅट आधी घाबरली, ”तुला असं का वाटतं?” असा प्रतिप्रश्न तिने केला. अर्थात हा सगळा प्रसंग सुरु असताना कॅमेरे हे सलमानवरच खिळले होते. सलमानही आपल्या भावना लपवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होता. उपस्थित अनेक सेलिब्रिटींमध्येही चुळबुळ सुरु झाली.

 

 

विकीने आपल्या खास शैलीत उत्तर दिले ” सध्या सगळीकडे वेडिंग सिझन सुरू असल्याने तूही लग्न करावं असं वाटलं”.

गमतीचा भाग हा की विकीने हा प्रश्न विचारताच स्टेजवर सलमानच्या चित्रपटातील ‘मुझसे शादी करोगी’ हे गाणं वाजायला लागलं आणि कॅटसह विकीही लाजला.

प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून हा प्रसंग एन्जॉय केला, मात्र प्रत्यक्षात ही मागणी भविष्यात खरी ठरेल याची कुणालाही कल्पना नव्हती. मात्र लगीनसराईच्या निमित्ताने या जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

करण जोहरने केली मध्यस्थी?

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात विकीने हजेरी लावली होती. ”कॅटला तुझ्यासोबत काम करायचं असून तुमच्या दोघांची जोडी ऑनस्क्रीन उत्तम दिसेल” असे करणने सांगितले.

 

 

खुद्द करण जोहरकडून आलेली ही प्रतिक्रिया ऐकताच विकीने ह्रदयावर हात ठेवत आनंद झाल्याची भावना व्यक्त केली होती.

एकत्र काम न करताही जुळले नाते

विकी आणि कॅटने आतापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही, असे असूनही या दोघांचे सुत नेमके जुळले कुठे हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र बॉलिवूडमधील काही मंडळी, मित्र तसेच बि टाऊन पार्ट्यांमध्ये यांचे प्रेम फुलले असे म्हटले जाते.

सुरुवातीला ही केवळ अफवा असल्याचेही अनेकांना वाटले. या दोघांनीही त्यांच्या नात्यावर कधीही फारशी चर्चा केली नाही. मात्र काही दिवसांपुर्वी आलेल्या यांच्या लग्नाच्या अधिकृत बातमीने सगळीकडे खळबळ माजली.

 

 

हे दोघं परवा शाही विवाह सोहळ्यात आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार असून यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील कोण कोण उपस्थित राहतं? हे येत्या काही दिवसात कळेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version