' हिंदी पत्रकारितेचे मानबिंदू विनोद दुवा; काही कडू, काही गोड आठवणी! – InMarathi

हिंदी पत्रकारितेचे मानबिंदू विनोद दुवा; काही कडू, काही गोड आठवणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणूस जो पर्यंत जिवंत असतो तेव्हा तो एकाच गोष्टीसाठी आसुसलेला असतो ते म्हणजे आपल्याबद्दलचे चार कौतुकाचे  शब्द आप्तस्वयकीयांकडून ऐकावेत. माणूस आयुष्यभर आपले चरित्र जपण्यासाठी कष्ट घेत असतो कारण आपण ज्या समाजात राहतो तिथे प्रत्येकाला स्वतःची ओळख निर्माण करायची असते.

समाजात वावरताना अनेक लोकांशी आपलं संबंध येत असतो, मग ते नोकरीचे ठिकाण असो किंवा एखाद्या सामाजिक कार्यात हातभार लावताना असो, आपल्या चारित्र्यवरूनच लोक आपल्याकडे बघत असतात, आपल्यावर एखादी जबाबदारी टाकायची  की नाही याचा विचार करता असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सामान्य माणसापासून ते समाजातील प्रतिष्टीत व्यक्ती देखील याची काळजी घेत असतात. राजकारणी व्यावसायिक आयुष्यभर कष्ट घेतात आणि शुल्लक गोष्टींमुळे आपले समाजातील स्थान गमावून बसतात. पत्रकरांच्या बाबतीत देखील असेच होते. नुकतेच ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांचे निधन झाले, निर्भीड पत्रकार अशी ओळख असलेल्या विनोदजीं बद्दल आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत…

 

dua inmarathi

 

पार्श्वभूमी :

दुवांच मूळ गाव पाकिस्तानामधलेअसून भारत पाक फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आले आणि दिल्लीमध्ये स्थायिक झाले. हंसराज कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेऊन, दिल्ली महाविद्यालयातून साहित्यमध्ये मास्टर डिग्री मिळवली. साहित्याची आणि इंग्रजीची उत्तम जाण असल्याने त्यांनी आपले करियर पत्रकारितेमध्ये करण्यास सुरवात केली.

पत्रकारिता :

ज्या काळात आजच्यासारख्या न्युज चॅनल्सचा भडीमार आणि TRP साठीची चढाओढ नव्हती, त्याकाळात आपल्या खुमासदार शैलीतून पत्रकारितेला सुरवात केली. देशातील पहिल्या हिंदी साप्तहिकाला सर्वदूरर पोहचवण्यामागे विनोदजींचा हात होता.

 

journalism-marathipizza

 

निवेदनाचा श्रीगणेशा :

आज अनेक चॅनेल्सवरील निवेदक जिवाच्या आकांताने ओरडून समोरच्याला बोलून न देता केवळ आपलाच मुद्दा मांडत असतात, मात्र विनोदजी आपल्या धीरगंभीर आणि स्पष्ट वक्त्तेमुळे आपली पदार्पणातच छाप सोडली होती. तब्बल साडेतीन दशक ते टीव्ही जगतावर राज्य करत होते.

सुरवातीला बातम्या नसल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्यास सुरवात केली, दूरदर्शनवर युवा मंच नावाचा कार्यक्रम सुरु केला. पुढे दैनंदिन घडणाऱ्या घटनांवर कार्यक्रम करण्यास सुरवात केली. देशात होणाऱ्या निवडणुकांचे आणि निकालांचे आज जसे विश्लेषण केले जाते त्याची सुरवात खरीतर विनोदजींनी केली आहे. निवडणुकीच्या सखोल विश्लेषणामुळे ते चांगलेच चर्चेत आले. 

 

dua inmarathi 2

सहारा, झी सारख्या चॅनल्सवर ते टॉक शो करत असे, आपल्या खास शैलीत ते सूत्रसंचालन करत असतात. मोठमोठ्या नेतेमंडळींना देखील ज्या पद्धतीने प्रश्न विचारायचे ते आजच्या पत्रकारांना देखील जमेलच असे नाही.

राजकरण, समाजातील प्रश्नांनाच नव्हे तर त्यांनी पाककलेचे कार्यक्रम देखील उत्तमरित्या सादर केला होता. एनडीटीव्ही वरील चख ले जायका का इंडिया का या कार्यक्रमाद्वारे त्यांनी काश्मीर पासून ते केरळ पर्यंतचा भाग पिंजून काढून तिकडची खाद्य संस्कृती संपूर्ण देशाला दाखवली.

वाद :

ज्या पद्धतीने माणसू आयुष्यात कायम चान्गल्या गोष्टी हातून घडाव्यात यासाठी झटत असतो त्याच पद्धतीने नकळत कधीतरी हातून चुका घडत असतातच. विनोदजींच्या जातुन देखील अशाच काही नकळत चुका घडल्या आहेत. त्यांच्यावर Me 2 पासून निवडणुकांचे चुकीचे पोल्स सांगून संविधानाच अपमान केला होता. काँग्रेच्या उत्तर प्रदेशमधील जागा जिथे कमी जिंकून येत होत्या तिथे यांनी वाढवून सांगितल्या होत्या.

 

dua inmarathi 1

 

विनोद दुवा शो या स्वतःच्या कार्यकमवर भारताची प्रतिमा नकारत्मक रित्या दाखवली गेली आहे असे आरोप करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमामध्ये काही धार्मिक मुद्यांवर वाद निर्माण झाले होते.

समाजातील शांतता भंग करणारा हा शो असल्याचे आरोप केले गेले होते. CAA सारख्या वादग्रस्त विषयावर त्यांनी उलटसुलट माहिती सांगितली होती तसेच दिल्लीमध्ये उफाळेलल्या दंगलीमध्ये त्यांचा हात होता असे बोलले जात होते. लॉकडाऊन असताना पोलिसांवर देखील टीका केली होती.

 

keral police inmarathi

 

आरोप प्रत्यारोप माणसू गेल्यावरच होत असतात, मात्र आपण नेहमी त्या माणसातील चांगल्या गुणांकडे बघितले पाहिजे. विनोद दुवा हे पत्रकारिता क्षेत्रातील एका आदर्श निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जात होते. अनेक तरुण पत्रकरांना त्यांनी मदत केली आहे. अनेक पत्रकार देखील त्यांना आपले आदर्श मानतात. भारत सरकारने त्यांना पदमश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील केला होता. अशा या निर्भीड पत्रकाला आमचा मानाचा मुजरा….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?