आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज आपल्या देशाने लोकशाही स्वीकारल्याने देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क स्वातंत्र्य आणि कर्तव्य दिली आहेत. त्यानुसार काहीजण ही जबाबदारी अगदी नेटाने पार पडत असतो. मग ते सत्तेमधील असलेल्या सरकारच्या चुका दाखवणे असो किंवा निवडणूकीमध्ये केलेले मतदान असो.
आज संविधानाने जसे नागरिकांना कोणत्याही प्रदेशात जाऊन वास्तव्य करण्याची मुभा दिली आहे तशी धर्मांतराची सुद्धा दिली आहे. धर्म हा मुद्दा अनेक वर्ष आपल्याकडे धगधगता आहे, आज जगातही पहिला धर्म कोणता यावरून वाद सुरु आहेच. अयोध्यामधील राम मंदिराचा रखडलेला मुद्दा मार्गी लागला, त्यावरून पुन्हा एकदा देशात खळबळ माजली.
राम मंदिर व्हावे अशी अनेक हिंदूंची भावना तर होतीच मात्र एक मुस्लिमाला सुद्धा वाटत होते राम मंदिर व्हावे, आणि तीच व्यक्ती आज हिंदू धर्मात आली आहे, नेमकी कोण आहे ती व्यक्ती, चला तर मग जाणून घेऊयात…
धर्मांतर म्हणजे एका धर्मातून बाहेर पडून विधिपूर्वक दुसरा धर्म स्वीकारणे. काहीजण पैशाच्या लोभासाठी धर्मांतर करतात तर काहीजण स्वतःच्या मर्जीने धर्मांतर करतात. नुकतंच वसीम रिजवी यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. योगी सरकार आल्यासपासून ते चर्चेत होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
कोण आहेत वसीम रिजवी?
मागच्या वर्षीपर्यंत ते यूपी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या या मुलाने आपले कॉलेज शिक्षण पूर्ण न करताआले नाही कारण वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबाच्या पालनपोषणसाठी त्यांनी थेट दुबई गाठली, तिथे त्यांनी एका हॉटेलात काम केले. त्यांनतर जपान अमेरिका देशात जाऊन काम केले.
काही कारणास्तव ते भारतात परत आले आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले, लखनौमधील काश्मीर मोहल्ला भागातून समाजवादी पक्षाकडून ते नगरसेवक सुद्धा झाले. खाजगी आयुष्यात त्यांची दोन लग्न झाली आहेत.
–
- वर्षानुवर्षे सुरु असलेला शिया विरुद्ध सुन्नी विवाद : इस्लाम धर्मातील पंथ
- कट्टरपंथीय मुस्लिमांच्या टीकेला कंटाळून राष्ट्रपतींच्या कन्येचा शेवटी हिंदू धर्मात प्रवेश
–
२०१२ मध्ये शिया धर्मगुरू कलबे जव्वाद यांच्याशी मतभेद झाल्यानांतर त्यांना पक्षातून ६ वर्षासाठी काढून टाकले होते. पुढे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले, कोर्टाने मात्र त्यांना दिलासा दिला आणि पुन्हा एकदा मिळवून दिले.
इस्लाम धर्मात काही सुधारणा कराव्यात अशी मागणी देखील केली होती, कुराणमधील २६ आयते हटवण्यासाठी त्यांनी कोर्टाकडे विनंती केली होती. तसेच राम मंदिराचा वाद कोर्टात सुरु असतानाच त्यांनी घोषित केले होते. मंदिरासाठी लागेल तितकी जमीन घेऊन टाकावी, महत्वाचे म्हणजे असे विधान करताना ते शिया बोर्डाचे अध्यक्ष होते. राम मंदिराला त्यांनी खुलेआम पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे या घटनेवर त्यांनी २०१९ साली राम की जन्मभूमी नावाचा सिनेमा लिहून तयार केला होता.
वसीम चर्चेत आले ते एका पुस्तकावरून, मोहम्मद नावाच्या पुस्तकाने बराच गदारोळ माजला होता. मोहम्मद नावाचे पुस्तक लिहून त्याचे प्रकाशन सुद्धा केले. मात्र त्याच्यात बरेच मुद्दे वादग्रस्त असल्याने त्यांच्यावर मोठया प्रमाणावर टीका झाली होती.
आपल्या स्वतःच्याच धर्माबद्दल अनेक मुद्दे उपस्थित केल्याने वसीम यांना मुस्लिम धर्मियांनी दुय्यम वागणूक देण्यास सुरवात केली. त्यामुळे अखेरीस त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. वसीम यांना गाजियाबाद मधील नरसिंहानंद सरस्वती यांनी हिंदू धर्मात सामील केले.
वसीम रिजवी ते आता जितेंद्र त्यागी :
ज्या प्रमाणे त्यांनी मुस्लिम धर्म मागे टाकला त्याप्रमाणे आपले नाव सुद्धा मागे टाकले, जितेंद्र त्यागी असे त्यांचे नवे नाव आहे. या संदर्भात त्यांनी सूत्रांशी बोलताना असे म्हणले की ‘मला मुस्लिम धर्मातून काढून टाकल्यावर माझ्यापुढे प्रश्न होता की कोणत्या धर्माचा स्वीकार करू. सनातन धर्म हा सर्वात जुना धर्म आहे. या धर्मात अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्या इतर धर्मात नाहीत’.
इस्लाम धर्माला कोणीच धर्म मानत नाही. दर शुक्रवारी नमाज पडल्यानंतर आमचेच शीर कापण्याचे मनसुबे आखले जातात तेव्हा अशा धर्मात कोणता मुस्लिम खुश राहील.
धर्मातर हा खरं तर प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, शेवटी आज जगातला प्रत्येक धर्म हा समानतेची भावना जपण्यासाठी सांगतो, तरीसुद्धा कोणता धर्म श्रेष्ठ हा वाद आजतागायत सुरु आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.