कपिल देव ‘त्या’ मॅचमध्ये खेळला नसता तर भारताला ८३ चा वर्ल्डकप जिंकणं कठीण होतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘८३’ या भारताने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित सिनेमाची सध्या सर्वांनाच उत्सुकता आहे. भारतासाठी १९८३ या वर्षाचा नायक कोण? असं विचारलं तर ‘कपिल देव’ हे नाव अगदी योग्य ठरेल.
क्रिकेटचा विश्वचषक जिंकणं ही भावना जगण्याची संधी सर्वप्रथम या व्यक्तीने भारताला दिली. हा मार्ग प्रचंड खडतर होता हे आपल्याला ‘८३’ या रणवीर सिंगच्या आगामी सिनेमात बघायला मिळेलच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
१९८३ चा विश्वचषक हा भारत विरुद्ध झिम्बाब्वे या सामन्यासाठीसुद्धा प्रकर्षाने आठवला जातो. १८ जून रोजी झालेल्या या सामन्यात कपिल देव यांनी १७५ रन्सची आपल्या करिअरची सर्वोत्तम खेळी करून या स्पर्धेत भारताचं आव्हान टिकवून ठेवलं होतं.
सुरुवातीच्या सत्रात गेलेल्या ४ विकेट्स नंतर कपिल देव यांनी केलेली ही खेळीचे कोणतेही प्रक्षेपण अस्तित्वात नाहीये हे मात्र क्रिकेट चाहत्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल.
बीबीसी या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी केलेल्या संपामुळे या सामन्यात स्टेडियमवर कोणताही पत्रकार हजर नव्हता. हजर होते ते फक्त प्रेक्षक, प्रशिक्षक आणि दोन्ही संघातील खेळाडू.
आजच्यासारखं मोबाईल मध्ये विडिओ शुटिंग करण्याची सोय सुद्धा त्यावेळी नव्हती, त्यामुळे या ऐतिहासिक सामन्याचे केवळ काही फोटो उपलब्ध आहेत.
मॅच कशी झाली होती?
भारताने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या या सामन्यात भारताची सुरुवात फारच खराब झाली होती. सुनील गावस्कर आणि के. श्रीकांत हे फलंदाज ओपनिंगला आले होते. दुसऱ्याच चेंडूवर सुनील गावस्कर हे पायचीत झाले होते. त्यानंतर आलेल्या दोन फलंदाजांनीसुद्धा लगेच तंबूचा रस्ता गाठला होता.
६ धावांवर ३ विकेट्स अशी बिकट अवस्थेत सापडलेल्या आपल्या संघाची काही क्षणातच १७ धवांवर ५ विकेट्स अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी भारताचे कर्णधार कपिल देव हे भारताची परिस्थिती सावरण्यासाठी मैदानावर आले होते.
पुढील ६० धावा रॉजर बिन्नी यांनी त्यांची साथ दिली होती. रॉजर बिन्नी आउट झाले तेव्हा स्कोअर ७७ धावांवर ६ विकेट्स असा होता. नुकतेच भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावरून पायउतार झालेले रवी शास्त्री हे त्यानंतर मैदानात आले. पण, त्यांनाही १ रन करून वापस पाठवण्यात झिम्बाब्वे संघाला यश आलं होतं.
९ व्या नंबर वर आलेल्या मदन लाल यांच्यासोबत कपिल देव यांनी ६२ धावांची भागीदारी केली आणि त्यांनी भारताला २६६ स्कोअर पर्यंत नेऊन ठेवलं.
–
- १९८३ वर्ल्डकप – फारुख इंजिनियरची “ती” भविष्यवाणी खरी ठरली!
- भारताचा कर्णधार कपिलदेव जेव्हा थेट ‘दुबईवाल्याला’ भिडला होता…!!
–
आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी १७५ धावा या एकट्या कपिल देव यांनी १३८ चेंडूमध्ये स्कोअर केल्या होत्या. या खेळीत कपिल देव यांनी १६ चौकार आणि ६ षटकार मारून ते स्वतः नाबाद राहिले होते.
२६६ धावांचा पाठलाग करतांना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली होती. पण, ४४ धावांवर त्यांची पहिली विकेट पडली आणि पूर्ण संघ हा २३५ धावांवर गारद झाला होता. मदन लाल यांनी सर्वाधिक ३ विकेट्स घेऊन गोलंदाजीत भारताकडून सर्वात चांगलं योगदान दिलं होतं.
भारताने हा सामना ३१ धावांनी जिंकून अंतिम सामन्याकडे एक पाऊल टाकलं होतं.
बीबीसीचे पत्रकर या सामन्याच्या दिवशी संपावर का होते?
सध्याच्या एसटीच्या संपाप्रमाणे बीबीसीचे पत्रकारसुद्धा त्यावेळी पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर गेले होते. झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्याच्या १ दिवस आधी वर्ल्डकपचं औचित्य साधून बीबीसीने हा संप पुकारला होता.
या सामन्यानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या. पण, जगभरातील समस्त भारतीयांना या सामन्याच्या केवळ ध्वनीमुद्रणावरच आपली क्रिकेटची भूक भागवावी लागली होती.
एक माहिती अशी पण उपलब्ध आहे की, बीबीसीच्या पत्रकारांनी त्या दिवशीच झालेल्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्याचं प्रक्षेपण मात्र केलं होतं. इतर २ सामने भारत विरुद्ध झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांचं शुटिंग करण्यास फक्त बीबीसीच्या पत्रकारांनी नकार दिला होता.
कपिल देव यांनी स्कोअर केलेला १७५ धावांचा विक्रम हा नंतर मोडला गेला. पण, या इनिंगची सर कोणत्याही खेळीला नव्हती हे स्वतः खेळाडूसुद्धा मान्य करतात.
कपिल देव यांनीच मागील दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम सामन्यात विवीयन रिचर्ड यांचा ऐतिहासिक झेल घेतला आणि लॉर्ड्सच्या मैदानावर ८३च्या विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं होतं. धन्य तो दिन, धन्य ते कपिल.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.