जुलाब, डोकेदुखी असो वा निद्रानाश, हा घरगुती पदार्थ आहे जालीम औषध
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हल्लीचं आयुष्य इतकं धकाधकीचं आणि स्ट्रेसफुल झालं आहे, की काहीही केलं तरीही स्वतःसाठी वेळ मिळत नाही. पैसे तर आपण कमावतो, पण ते खर्च करण्यासाठी, त्यांचा उपभोग घेण्यासाठी अंगात पुरेशी एनर्जीच नसते.
वेळ कमी म्हणून बाहेरचं खाल्लं जातं, नको त्या वेळी खाल्लं जातं आणि त्यातून आजार बळावतात. डोकेदुखी, पित्त, निद्रानाश हे सगळे आजार सतवायला लागतात. काही काहींच्या तर पाचवीलाच हे आजार पूजलेत.
—
- प्रवासात उलटी-मळमळ होण्याची भीती वाटतीये? हे ९ उपाय देतील त्वरित आराम!
- अनेक विकारांवर गुणकारी अशा तुळशीच्या बियांचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
—
‘आजीबाईचा बटवा’ हा शब्द तुम्ही ऐकला असेल, तुमच्या घरातही तुमची आई- आजी तुम्हाला आजारांवर घरगुती औषधं सांगत असतील. आपल्याकडे ‘घरगुती औषधांची’ परंपरा आहे. काही कमी- जास्त झालं, तर आजी- आईकडे लगेचच उपाय तयार असतात. यांनी आरामदेखील मिळतो.
आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात, ज्यांचा उपयोग औषध म्हणून केला जाऊ शकतो. आपल्या रोजच्या आहारातही असे अनेक पदार्थ असतात, जे कळत- नकळत शरीराला औषधी मदत करत असतात. असाच एक पदार्थ म्हणजे ‘जायफळ’
बासुंदी, कॉफी अशा पदार्थांमध्ये तर हमखास जायफळाचा वापर असतो. जायफळाने त्या पदार्थाला एक वेगळी चव येते आणि वासही छान येतो, पण तुम्हाला माहितेय का? जायफळ हे एक उत्तम घरगुती औषध आहे. बघूया, जायफळाचे औषधी फायदे –
१. जुलाब थांबवण्यासाठी –
अतिसार, कॉलरा, जुलाब असे आजार झाले असतील, तर जायफळ हे अत्यंत उपयोगी औषध आहे. तापलेल्या तव्यावर जायफळ पूड भाजून घ्यावी आणि त्यात तितकाच गूळ घालून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या कराव्यात, जुलाब थांबेपर्यंत या गोळ्या तुम्ही घेऊ शकता.
लहान मुलांना जायफळ फार देऊ नये कारण ते मादक, झोप आणणारे आहे.
२. कफावर उपयोगी –
तोंडात कफ येत असेल, तर थोडे जायफळ द्यावे.
३. डोकेदुखीवर उपयोगी –
१ ग्रॅम जायफळ दुधात उगाळून त्यात वेलदोड्याची पूड घालून जाड लेप लावल्याने डोकेदुखी थांबते.
४. निद्रानाशावर उपयोगी –
झोप लागत नसेल, तर तुपात जायफळ उगाळून झोपण्याच्या वेळेस हळूहळू डोक्यास चोळावे, याने चांगली गाढ झोप लागते.
===
वरील माहिती ‘आयुर्वेद’ मासिकातील लेख आणि कै. वैद्यतीर्थ आप्पाशास्त्री साठे यांच्या पुस्तकातील माहितीच्या आधारे लिहिण्यात आली आहे, पण आपल्या तब्येतीनुसार, वैद्यांचा सल्ला घेऊनच या उपायांचा अवलंब करावा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.