Site icon InMarathi

‘मिस्टर इंडिया’साठी श्रीदेवीच्या आईने का मागितले होते दुप्पट मानधन?

shridevi and her mother inmarathi

 आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘प्रेम’ ही अशी गोष्ट आहे जी भल्याभल्यांचा मजनू करते. एकदा ही इश्काची इंगळी डसली की माणसाचा माणूस राहत नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तीच एक व्यक्ती डोळ्यांसमोर दिसत असते. त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष दर्शनाची एक छबी जी जादू करून जाते त्यापुढे त्या तासनतास केलेल्या स्वप्नरंजनाचं पारडं सर्र्कन खाली येतं.

कुठल्याही कॉलेजकुमारापासून ते थेट बॉलिवूडच्या मंडळींपर्यंत कुणीही याला अपवाद नाही.  बॉलिवूडची अशीच एक सौंदर्यवती अभिनेत्री श्रीदेवी. श्रीदेवीसाठी बोनी कपूर असाच वेडा झाला होता.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

श्रीदेवीने उत्तमोत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. इतकी की आवडीच्या अभिनेत्री म्हटल्या की माधुरी दीक्षित, श्रीदेवी ही नावं हमखास घेतलीच जायची. श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दाक्षिणात्य पडदा गाजवला होता.

१९७९ साली आलेल्या ‘सोलवा सावन’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रीदेवी जशी तिच्या कामासाठी कायम चर्चेत राहिली तशीच तिच्या अफेअर्ससाठीसुद्धा चर्चेत राहिली.

ती यशाचं शिखर गाठत असताना जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती सारख्या अभिनेत्यांबरोबर तिचं नाव जोडलं जायचं, पण अखेरीस श्रीदेवीने लग्न केलं ते बोनी कपूरबरोबर!

 

 

श्रीदेवीचा हा असा सिलसिला असला तरी बोनी कपूरची गत मात्र काहीशी वेगळी होती. श्रीदेवीला जेव्हा त्याने पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. १९७० साली आलेल्या श्रीदेवीच्या एका तमिळ चित्रपटात त्याने तिला पाहिले आणि तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला. त्याला तिला फार भेटावेसे वाटू लागले.

श्रीदेवीला भेटायला तो तिच्या घरीदेखील गेला होता पण त्यावेळी ती नेमकी सिंगापूरमध्ये शूटिंगसाठी गेलेली होती. खटटू होऊन तो मुंबईत परतला.
त्याने त्यांनतर तिचा १९७९ साली आलेला ‘सोलवा सावन’ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर मात्र काही केल्या त्याचे चित्त थाऱ्यावर राहिले नाही.

कुठल्याही परिस्थितीत त्याला तिला भेटायचे होते. तिला त्याच्या चित्रपटात घ्यायचे होते. एक दिवस बोनी कपूरने चेन्नईत ज्या ठिकाणी तिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते तिकडे तिला संपर्क केला. माझ्या चित्रपटात काम करशील का अशी त्याने तिला विचारणा केली.

श्रीदेवीचे व्यक्तिमत्त्व तसे बुजरे होते. त्यामुळे तिने आपल्याला आलेल्या या प्रस्तावावर केवळ मान हलवली आणि ”आईला भेटा. ती माझ्या सगळ्या फिल्मी असाइन्मेंट्स सांभाळते” असे त्याला सांगितले.

 

 

बोनी कपूरचा एकूण ‘पिछे पड गया’ अवतार बघून त्याच्या डोक्यावरून हे प्रेमाचं भूत उतरेल, त्याचा रस कमी होऊन तो आपल्या मुलीचा नाद सोडेल असं वाटून तिच्या आईने त्याच्याकडे मूळ रकमेच्या दुप्पटीने म्हणजे तब्बल १० लाख रुपयांची मागणी केली.

ज्या सिनेमाच्या बाबतीत ही सगळी बोलणी चालली होती तो होता तेव्हा गाजलेला १९८७ साली आलेला ‘मिस्टर इंडिया’ हा सिनेमा ज्यात श्रीदेवीबरोबर प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत अनिल कपूरने काम केले होते. ‘मिस्टर इंडिया’त काम करण्यापूर्वी तिने सदमा, हिम्मतवाला, इन्किलाब, तोहफा, नागीन, आखरी रास्ता, कर्मा या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची कमाल दाखवली होती.

श्रीदेवीच्या आईने जेव्हा बोनी कपूर कडे १० लाख रुपयांची मागणी केली तेव्हा बोनी कपूरने ११ लाख रुपये देईन असे सांगून तिला थक्क केले आणि तिचे मन जिंकले. त्याला कसंही करून श्रीदेवीचा सहवास हवा होता. श्रीदेवी त्यावेळची सगळ्यात जास्त मानधन मिळणारी अभिनेत्री होती.

 

 

श्रीदेवी जेव्हा शूटिंगसाठी यायची तेव्हा बोनी कपूर तिला अगदी एखाद्या राजकन्येला द्यावी तशी वागणूक द्यायचा. त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन हा प्रकार नव्हता तरी बोनी कपूरने खास श्रीदेवीसाठी म्हणून मेकप रूमची व्यवस्था केली होती.तिच्या छोट्यातल्या छोट्या गरजांकडे त्याने अगदी डोळ्यांत तेल घालून लक्ष पुरवले.

बोनी कपूर जरी तिला पाहताचक्षणी तिच्या प्रेमात पडला असला तरी श्रीदेवीचे तसे नव्हते. बोनी कपूरच्या बाबतीत निर्णय घेण्यासठी तिने तिला हवा तितका वेळ घेतला. आपल्या वागणुकीने आणि स्वभावाने बोनी कपूरने हळूहळू तिचे मन जिंकले.

श्रीदेवी म्हणते, “‘चांदनी’ चित्रपटाचे शूटिंग चालू असताना माझी आई वारली तेव्हा मी बोनी कपूरच्या खांद्यावर डोके ठेवून रडले होते. माझे वडील गेले तेव्हाही तो माझ्या सोबत होता. हळूहळू माझी गाठ याच्याशीच बांधली गेली आहे हे या सगळ्यामुळे माझ्या लक्षात आले.”

 

 

बरोबरीच्या पुरुष सहकाऱ्यांच्या तोडीस तोड फिल्म उचलून धरणारी श्रीदेवी ही दुर्मिळ अभिनेत्री होती. १९९६ साली लग्न झालेल्या श्रीदेवी आणि बोनी कपूरने एकमेकांच्या सहवासात समृद्ध सहजीवन अनुभवले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version