Site icon InMarathi

राजेश खन्नांचा फाडला शर्ट, शरीरावर नखांचे व्रण आणि मदतीला धावून आले कमल हसन

rajesh khanna kamal hasan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘द स्टार ऑफ मेलिनियम’ अशी ओळख मिळवणारा भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला सुपरस्टार म्हणजेच राजेश खन्ना. राजेश खन्ना इतके घवघवीत यश, लोकप्रियता आणि झपाटलेला प्रेक्षक वर्ग आजवर कोणालाही लाभला नाही. लोक अक्षरशः त्यांच्या पायाखालची माती कपाळाला लावत असत. त्यांची कार लिपस्टिकच्या खुणांनी भरलेली असे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राजेश खन्नाचे आराधना, हाथी मेरे साथी, बावर्ची, सफर, खामोशी, दो रस्ते असे कित्येक चित्रपट सुपरहिट ठरले. आनंद आणि अमर प्रेम हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट.

 

 

असं म्हंटलं जातं, की राजेश खन्ना यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांचे अनेक रिमेक बनवले आहेत. त्यासाठी त्यांचे नेहमीच चेन्नईला जाणे येणे असे. त्यावेळी कमल हसन हे दक्षिण भारतीय चित्रपटात काम करत होते.

एक चांगला अभिनेता अशी त्यांची ओळख होती. त्यावेळी ते सुपरस्टार नव्हते. तेंव्हा राजेश खन्ना यांनी कमल हसन यांची मुंबईत उद्याचा दक्षिण भारतीय सुपरस्टार अशी ओळख करून दिली.

राजेश खन्ना यांचे रिमेक करण्यासाठी तसेच बिझनेस संदर्भात चेन्नईत सतत जाणे येणे असे. राजेश खन्ना यांना फारसे मित्र नव्हते, काही खास लोकांशी त्यांचे पटत असे, त्यांच्या मित्र परिवारात घेतले जाईल असे एक नाव म्हणजे दक्षिण भारताचं सुपरस्टार कमल हसन.

 

 

कमल हसन आणि राजेश खन्ना खूप छान मित्र होते,बराच वेळ ते एकमेकांसोबत घालवत असत, राजेश खन्ना त्यांच्या आयुष्या बद्दल आणि मिळवलेल्या यशा बद्दल कमल हसन यांच्याशी नेहमीच बोलत असत.

खरतर कमल हसन हे चेन्नई मध्ये राहत होते तर राजेश खन्ना मुंबईत. पण राजेश खन्ना यांचा आराधना चित्रपट इतका सुपरहिट ठरला की चेन्नईच्या लोकांना हिंदू येत नसूनही आराधना सिनेमाचे सर्व गाणे पाठ झाले होते.

इतके ते भारताबाहेरसुद्धा प्रसिद्ध झाले होते. तेव्हा त्यांची आणि कमल हसन यांच्याशी ओळख झाली, ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले, त्यामुळे साहजिकच जाणे येणे वाढले.

राजेश खन्ना आणि कमल हसन यांची मैत्री खूप घट्ट होती. सगळे लोक खन्ना साहेबांना काका म्हणत पण कमल हसन मात्र त्यांना बडे भैया किंवा मिस्टर खन्ना या नावाने हाक मारत असत.

 

 

त्यांच्या मैत्री बद्दल बोलताना कमल हसन म्हणतात मला आमची मैत्री गीता दत्त यांच्या या गण्यासारखी वाटते ज्याच्या लाईन्स अशा आहेत…”दील इस तरह मिले जिस तरह कभी जुदा ना थे!”

आम्ही दोघे एकमेकांना भेटता ना किती दिवसांनी भेटलो हे मध्ये येत नाही किंवा महत्वाचे ठरत नाही,आमचे भेटणे कधीच थांबू शकत नाही,जोवर आम्ही जिवंत आहोत तोवर आमची मैत्री राहील.

आज कमल हसन यांना ६२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे ८ सप्टेंबर २०१६ मध्ये द quint’s मधील कमल हसन आणि राजेश खन्ना यांच्या मैत्रीचा हा किस्सा त्यांच्या वाढदिवशी ७ नोव्हेंबरला पुन्हा प्रकाशित करण्यात आला आहे.

कमल हसन आणि राजेश खन्ना यांच्या मैत्रीचा एक गमतीदार किस्सा कमल हसन यांनी सांगितला आहे. राजेश खन्ना त्यावेळी चेन्नईत होते, तिथे कमल हसन आणि राजेश खन्ना चित्रपट पाहायला गेले होते, अमेरिकन इंग्रजी चित्रपट होता the swarm.

खरंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे राजेश खन्ना नेहमीच टाळत असत, पण बऱ्याच दिवसांनंतर थिएटर मध्ये बसून चित्रपट पाहायला मिळणार असल्याने ते चित्रपट पाहणार होते.

सिनेमा संपत आला होता आणि कमल हसन जाण्यासाठी घाई करत होते, पण राजेश खन्ना मात्र सिनेमा एन्जॉय करत होते, कमल हसन यांना भीती होती, की एकदा सिनेमा संपला आणि लाईट लागले तर सगळे लोक राजेश खन्ना यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी गर्दी करतील आणि त्यांना थांबवणे कठीण होईल पण राजेश खन्ना यांनी काहीच न ऐकता शेवटपर्यंत सिनेमा पहिला.

 

 

लाईट लागल्यानंतर जेव्हा राजेश खन्ना आणि कमल हसन जायला निघाले तेव्हा केवळ राजेश खन्ना यांना हात लावण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी झाली. इतकी की लोकांनी राजेश खन्ना यांचा शर्ट फाडला. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीरावर नखाचे व्रण दिसत होते, पण राजेश खन्ना मात्र न चिडता हे सगळं पाहून हसत होते.

त्यावेळी स्वतः कमल हसन यांनी ती गर्दी दूर करण्याचा प्रयत्न केला, लोकांना हाताने बाजूला केले आणि कसेबसे राजेश खन्ना यांना घेऊन तिथून निसटले, त्यावेळी कमल हसन राजेश खन्ना यांचे बॉडीगार्ड, अंगरक्षक बनले.

कमल हसन आणि राजेश खन्ना यांची मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. २९१२ मध्ये राजेश खन्ना आपल्या सर्वांना सोडून गेले. कमल हसन यांच्या मनात त्यांची मैत्री कायमच राहील.पण त्यावेळी कमल हसन यांनी राजेश खान्हा साठी जे काही केले त्यावरून कमल हसन यांना मैत्री या शब्दाची किती उत्तम समज होती,तसेच त्यांचे राजेश खन्ना वर किती प्रेम होते हे दिसून येते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version