या ११ गाण्यांमधल्या या ओळी आपण सगळेच आजही हमखास चुकीच्या गुणगुणतो!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गाणी हा आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. दिवसभर आपण कुठलंही काम करत असलो तरी अनेकदा गाणी आपल्या डोक्यात वाजत असतात किंवा नकळत ती आपण गुणगुणत असतो. पण अशीही काही गाणी आहेत जी आपण वर्षानुवर्षे चुकीची गुणगुणत आलोय.
आपण गाणी गुणगुणताना मिळणाऱ्या आनंदावर त्याने काही फरक पडत नाही म्हणा! गाण्याचे नेमके शब्द काय आहेत हे कोण कशाला गुगलवर शोधायला जातंय!
त्यामुळे कुणीतरी आपण कुठला शब्द चुकीचा म्हणतोय हे लक्षात आणून देईस्तोवर आपण आपल्या चुकीचं गाणं म्हणण्यातच खुश असतो. कारण, मुळात आपण काहीतरी चुकीचं म्हणतोय हेच आपल्या गावी नसतं. आपल्यातले बरेच जण हमखास या चुका करतातच. पुढे लिहिलेल्या या गाण्यांमधले शब्द तुम्हीही चुकीचे गुणगुणता का?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
१. ‘बन्नो तेरा स्वेगर लागे सेक्सी’ –
‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ चित्रपटातलं हे आपल्या सगळ्यांच्या ओठांवर चित्रपट आल्यानंतर बरेच दिवस रेंगाळलेलं गाणं. पण हे गाणं आपण ‘बन्नो तेरा स्वेगर’ असं न म्हणता ‘बन्नो तेरा स्वेटर लागे सेक्सी’ असं चुकीचं गुणगुणतो.
२. ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी में’ –
हे गाणं आपण वर्षानुवर्षे हमखास चुकीचं म्हणत आलोय. ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए तो बात बन जाए’ असे या गाण्याचे मूळ शब्द आहेत. आपण म्हणताना मात्र ‘आप जैसा कोई मेरे जिंदगी मै आए तो ‘बाप’ बन जाए’ असे चुकीचे शब्द म्हणत आलोय.
३. ‘मार डाला’ –
‘देवदास’ चित्रपटातलं हिरवा ड्रेस घातलेल्या माधुरी दीक्षितचं हे शब्दश: एव्हरग्रीन गाणं. त्यातलं ‘ ख़ुशी ने हमारी हमें मार डाला’ हे शब्द आपण ‘ख़ुशी ने ‘हवा’ में हमे मार डाला’ असं चुकीचं म्हणत आलोय.
४. ‘ढां टे णाण’ –
‘कमीने’ चित्रपटामधलं हे अतिशय प्रसिद्ध गाणं. त्यातले ‘आजा आजा दिल निचोडे’ हे शब्द आपण नेहमी ‘आजा आजा ‘दिल्ली छोडे’ असे चुकीचे म्हणत आलोय.
–
- पडद्यावर अतिशय सुंदर दिसणारी ही सर्व गाणी एका वेगळ्याच तारेवरच्या कसरतीची उदाहरणं आहेत
- “पाव के नीचे जन्नत होगी”; द्वैअर्थी शब्दांमुळे वादग्रस्त झालेली बॉलिवूडची ६ गाणी
–
५. बंजर है सब बंजर है’ –
‘ साथिया’ चित्रपटातलं ‘बंजर है’ हे गाणं. या गाण्याचे मूळ शब्द ‘ बंजर है सब बंजर है, हम ढुंढने फिरदोस चले’ असे आहेत. आपण म्हणताना मात्र ‘बंजर है सब बंजर है हम ढुंढने फिर ‘दोस्त चले.’ असं चुकीचं म्हणतो.
६. ‘मै परेशान’ –
‘इशकजादे’ चित्रपटातलं हे अतिशय श्रवणीय गाणं. यातले ‘मै परेशान परेशान परेशान’ हे शब्द असे न म्हणता आपण ते ‘ मै परेश शाह परेश शहा परेश शाह’ असे चुकीचे म्हणत आलोय.
७. ‘नदीयो पार’ –
जान्हवी कपूरच्या अलीकडेच आलेल्या या गाण्याची चांगलीच हवा झाली होती. ‘रुही’ या चित्रपटातलं हे गाणं. या गाण्याच्या सुरवातीचं संगीत फार गुणगुणावंसं वाटतं पण नेमके शब्द काय आहेत ते कळत नाही. तरी आपण आपल्याच नादात ते आपल्याला हवं तसं गुणगुणतो. ‘ओ ना कर मान रुपैये वाला बर बर के ना रज्जे, बाई ना कर मान रुपैये वाला बर बर के ना रज्जे, ओ नदियों पार सजन दा ठाणा कीते कोल जरूरी जाना’ असे ते सुरवातीचे शब्द आहेत.
८. ‘तेरा होने लगा हूँ’ –
‘अजब प्रेम की गजब कहानी’ या रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या सुप्रसिद्ध चित्रपटातलं हे गाणं. याही गाण्याची तीच गत. ‘नदीयो पार’ च्या सुरुवातीचे शब्द जसे कळत नाहीत तसेच याही गाण्याचे सुरुवातीचे शब्द धड कळत नाहीत आणि आपण ते आपल्याला हवं तसं बरळतो.
‘शायनिंग इन द सेटिंग सन लाइक अ पर्ल अप ऑन दी ओशन कम अँड फील मी, ओ फील मी’ असे त्या गाण्याच्या सुरुवातीचे मूळ शब्द आहेत.
९. ‘जरा जरा बेहेकता है’ –
‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटातलं हे प्रसिद्ध गाणं. यातले ‘यूही बरस बरस काली घटा बरसे, हम यार भीग जाए इस चाहत की बारिश मै’ मधल्या ‘चाहत की बारिश मै’ च्या ऐवजी ‘चादर की बारिश मै’ असं हमखास चुकीचं म्हणतो.
१०. ‘दिल इबादत’ –
‘तुम मिले’ या चित्रपटामधलं हे गाणं. हे गाणं म्हणताना आपण हमखास ‘जिंदगी की ‘शाक’ से लू कुछ हसी पल मै चून’ असं न म्हणता ‘जिंदगी की ‘शौक’ से लू कुछ हसी पल मै चून’ असं म्हणत आलोय.
११. ‘अंग्रेजी बीट दे’ –
‘कॉकटेल’ चित्रपटातल्या प्रसिद्ध गाण्यांपैकी हे एक. त्यातले शब्द जरी ‘अंग्रेजी बीट दे’ असे जरी असले तरी ते तसे ऐकू न येता ‘अंग्रेजी वीड दे’ असे ऐकू येतात. आपल्यातले काहीजणही कदाचित ते तसे म्हणत असतील.
असे चुकीचे शब्द गुणगुणणं हा प्रकार याही पुढे निरनिराळ्या गाण्यांच्या बाबतीत घडतच राहणार आहे. त्यामुळे फार विचार न करता आपण आपल्या या लहानसहान चुकांचीही मजा घेऊ आणि गुणगुणत राहू.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–