आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे असं आपण नेहमीच म्हणतो. इथे रोज हजारो लोक यशस्वी होण्याचं स्वप्न आपल्यासोबत घेऊन येतात. काही लोक नोकरी करून आपलं करिअर घडवतात, तर काही लोक व्यवसाय करून आपली स्वप्नपूर्ती करतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
मेहनत करायची तयारी असेल तर, मुंबई कोणालाच नाराज करत नाही हे एक सत्य आहे. कर्नाटक मधून मुंबईत येऊन ‘शिव सागर रेस्टॉरंट’ ही हॉटेलचेन सुरू करणाऱ्या ‘नारायण पुजारी’ या व्यक्तीची माहिती वाचून हे पुन्हा एकदा सिद्ध होतं.
कोण आहेत नारायण पुजारी?
नारायण पुजारी यांचा जन्म १९६७ मध्ये कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यातील गुज्जडी या छोट्या गावात झाला. घरची परिस्थिती जेमतेम होती. वयाच्या १३व्या वर्षी नारायण पुजारी हे ‘काही तर चांगलं काम करायचं’ या हेतूने मुंबईत आले. दिवसा हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करायचे आणि रात्री शाळा अटेंड करायचे.
१९८० च्या दशकात मुंबई मध्ये खूप नवीन उद्योग आणि ऑफिसेस सुरू झाले होते. देशभरातून खूप तरुण मुलं मुंबईत कामासाठी रोज दाखल होत होते. मुंबई शहर हे कसं घड्याळाच्या सेकंद काट्यांवर चालतं हे आपण सगळे जाणतोच.
त्या काळी ‘फास्ट फूड’ जसे की, पाव भाजी, दोसा हे पदार्थ काम करणाऱ्या तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होत होते. नारायण पुजारी यांनी एक मार्केट रिसर्च केला आणि त्यांच्या लक्षात आलं, की आपण या फास्ट फूडचं हॉटेल सुरू केलं तर ते नक्की चालू शकतं.
१९९० मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी नारायण पुजारी यांनी मुंबईच्या चर्चगेट एरिया मध्ये ‘शिव सागर’ या नावाने एक हॉटेल सुरू केली. हे हॉटेल सुरू करण्यासाठी नारायण पुजारी यांना ४० लाखांची इन्व्हेस्टमेंट केली एका पार्टनरला सोबत घेऊन.
एका वर्षातच पार्टनरने काही कारणांमुळे काढता पाय घेतला आणि मग नारायण पुजारी हे ‘शिव सागर’ हॉटेल चेनचे मालक झाले. आज या चेन चा टर्नओवर हा ७५ करोड वर पोहोचला आहे आणि ३ शहरात मिळून १५ शाखा स्थापन झाल्या आहेत.
एका मुलाखतीत बोलताना नारायण पुजारी यांनी सांगितलं होतं, की “तो काळ वेगळा होता. तेव्हा आजच्या इतकी स्पर्धा नव्हती, पण ग्राहकांना आपल्यापर्यंत आणणं हे एक आव्हान होतं. आम्ही सतत नवीन प्रयोग करत राहिलो. जे पदार्थ बाकी कोणी ठेवत नाहीत ते आम्ही ठेवू लागलो. जसं की, डोसा आणि त्याचे विविध प्रकार आणि ‘इंडियन पिझ्झा’ जे की आमच्या ग्राहकांच्या पसंतीस पडले.”
—
- गुगलचे CEO, सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा…
- एमबीए करून तो बनला चहावाला – आणि पठ्ठ्या कमावतोय वर्षाला कोट्यावधी रुपये!
—
वेगळं काय केलं?
इतर उडपी हॉटेल हे संध्याकाळी ७ किंवा ८ वाजता बंद व्हायचे. त्याच वेळी ‘शिव सागर’ हे रात्री २ वाजेपर्यंत चालू असायचे. त्यांच्या या स्पेशलिटीमुळे फार कमी काळात ‘शिव सागर’ हे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झालं.
आज सोशल मीडिया आणि स्वस्त इंटरनेट मुळे लोकांपर्यंत पोहोचणं हे अगदी सोपं झालं आहे. ९० च्या दशकात हे इतकं सोपं नव्हतं. तेव्हा लोक सिनेमा थिएटर मध्ये बघण्यासाठी कायम उत्सुक असत. लोकांची ही आवड नारायण पुजारी यांनी हेरली आणि त्यांनी दक्षिण मुंबईतील काही टॉकीज मध्ये जाहिराती द्यायला सुरुवात केली.
जवळपास १ लाख रुपयांचा बिजनेस नारायण पुजारी यांना या माध्यमातून मिळाला, ज्याला की ‘बार्टर’ म्हणजेच देवाणघेवाण पद्धत असं म्हणतात. जाहिरातीच्या किमती इतका हॉटेलच्या जेवणाचा पुरवठा तुम्ही थिएटरला सहा महिन्यात करायचा असा हा करार असतो.
नारायण पुजारी यांनी स्टील प्लेट्सचा वापर बंद केला आणि अमेरिकेहून काही Corelle प्रकारातील प्लेट्स मागवल्या आणि त्या काळात लोक त्या गोष्टीचं सुद्धा कौतुक करणारे होते.
दुसरी पिढी:
२०१७ मध्ये नारायण पुजारी यांची मुलगी निकिता पुजारी हिने बीटेकचं शिक्षण पूर्ण करून या बिजनेस मध्ये वडिलांची साथ द्यायला सुरुवात केली. तिच्या बिजनेस मध्ये येण्याने ‘शिव सागर’ च्या प्रगतीला एक दिशा मिळाली.
त्यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये फिश एन बैट या नावाचं एक सीफूड रेस्टॉरेंट सुरू केलं. त्यामध्ये अपेक्षित यश न मिळल्याने ते २०१८ मध्ये बंद करावं लागलं. तेव्हा नारायण पुजारी यांच्या लक्षात आलं, की,फक्त जेवणाची सोय असलेलं हॉटेल आणि जेवण-बार ची सोय असलेल्या हॉटेलपैकी लोक दुसऱ्या प्रकाराला जास्त पसंती देतात. त्यांनी याच फॉर्म्युलाला घेऊन ‘बटरफ्लाय हाय’ या नावाने नवीन हॉटेल्स सुरू केल्या. या प्रकाराला लोकांनी भरभरून दाद दिली.
निकिता पुजारी यांनी ‘द बिग स्मॉल कॅफे बार’ची सुरुवात केली. हॉटेलच्या या प्रकाराची सुरुवात त्यांनी पुणे, मँगलोर सारख्या शहरांच्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून केली आहे. या सोबतच ‘ऑर्डर बिग अँड पे स्मॉल ‘ ही एक संकल्पना सुरू केली. ‘कॉर्पोरेट लंच’ ला डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या या संकल्पनेला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत गेला.
आपल्या हॉटेलची प्रत्येक शाखा ही स्वच्छ असावी हा नारायण पुजारी यांचा आग्रह असतो. ते अचानक त्यांच्या कोणत्याही हॉटेलला भेट देतात आणि ते आधी टॉयलेट स्वच्छ आहे की नाही ते बघतात आणि मग किचन. कारण, कस्टमर हे तुम्हाला या छोट्या गोष्टींवरून जज करत असतात आणि रेटिंग देत असतात याची पूर्ण कल्पना नारायण पुजारी यांना आहे.
अन्न आणि स्वच्छतेचा दर्जा टिकवण्यासाठी नारायण पुजारी यांनी कॉर्पोरेट मध्ये काम केलेले ‘शेफ’ सुद्धा ठेवले आहेत. कोणतीही नवीन व्यक्ती ग्रुप मध्ये जॉईन झाल्यावर त्याला आधी प्रॉपर ट्रेनिंग देऊन मगच काम देण्यात येतं. अगदी खाजगी नोकरी सारखं.
नारायण पुजारी यांच्यामुळे आज १३०० लोकांना नोकरी मिळाली आहे याचं पुजारी कुटुंबाला खूप समाधान आहे. ‘अमिताभ बच्चन’ यांचे मोठे चाहते असलेले नारायण पुजारी हे आज आपली स्वप्नपूर्ती झाली असल्याचं आपल्या मुलाखतीतून अभिमानाने आणि कृतज्ञतेने नेहमीच सांगतात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.