Site icon InMarathi

“मी कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे!” शो रद्द केल्याने कॉमेडियन कुणाल कामराची आगपाखड!

kunal kamra featured 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मूनव्वर फारुकीने स्टँड-अप कॉमेडीमधून माघार घेतल्यानंतर सोशल मीडियावर एकच हलकल्लोळ माजला होता. त्याच्या आधीच्या वादग्रस्त स्टेटमेंटमुळे बेंगलोरमधले त्याचे सगळे शो कॅन्सल केले आणि त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याने ही गोष्ट शेयर करत हे क्षेत्र सोडत असल्याचं जाहीर केलं.

इंडस्ट्रीतल्या बऱ्याच लोकांनी त्याच्या बाजूने ट्विट करत एकंदरच आपल्या समाजाच्या मानसिकतेवर टीका केली, तर काहींनी फारुकीवर झालेली ही कारवाई कशी योग्य आहे हे स्पष्ट केलं.

यानंतर आता कुणाल कामरा या स्टँड अप कॉमेडीयनच्या बाबतीतसुद्धा असंच घडलं आहे, बेंगलोरमधले त्याचे शोजसुद्धा आता कॅन्सल करण्यात आले असून, त्यामागची दोन प्रमुख कारणं त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली आहेत.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कुणाल कामराचे शो आणि त्यातला त्याचा कंटेंट हा बराचसा राजकीय घडामोडींशी निगडीत असल्याने आणि एकंदरच त्यांच्या मोदी विरोधक विचारधारेमुळे त्याला टार्गेट केलं जातं असा बऱ्याच लोकांचा समज आहे.

मध्यंतरी विमानात एका मोठ्या पत्रकाराचा व्हिडिओ केल्यामुळेसुद्धा कुणाल चांगलाच चर्चेत आला होता, त्या व्हिडिओमध्ये तो समोरच्या पत्रकाराला प्रश्न विचारून उकसवायचे काम करत होता, यानंतर एयरलाईन्स कंपनीने कुणालच्या प्रवासावरसुद्धा बंदी आणली होती.

या आणि अशा बऱ्याच वादग्रस्त स्टेटमेंट आणि घटनांमुळे कुणाल कायमच चर्चेत असतो, त्याच्या युट्यूब चॅनलवर होणाऱ्या वेगवेगळ्या राजकारण्यांच्या मजेशीर मुलाखतींमधून तो राजकारणावर टिप्पणी करत असतो, पण त्याच्या स्टँडअप कॉमेडीमुळे तो सर्वात जास्त वादाच्या भोवऱ्यात अडकला आणि यामुळेच सध्या त्याचे शो कॅन्सल करण्यात आले आहेत.

“आयोजकांना धमक्या मिळाल्यामुळे मूनव्वर फारुकीची शो जसे कॅन्सल केले त्याचप्रकारे माझे शोसुद्धा आता रद्द करण्यात येत असून माझ्याकडे कोरोनाच्या एका व्हेरीयंट असल्यासारखं बघितलं जात आहे!” असं कुणालने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर करत खेद व्यक्त केला आहे.

 

या पोस्ट मध्ये कुणाल म्हणतो की “हे शो रद्द करण्याची २ प्रमुख कारणं आयोजकांनी दिली, त्यातलं एक कारण म्हणजे अधिक प्रेक्षकांची परवानगी न मिळणे आणि दुसरे कारण म्हणजे आयोजकांना मिळालेल्या धमक्या, जर त्या ठिकाणी माझा शो झाला तर आयोजकांचं तो वेन्यू कायमचा बंद करण्यात येईल!”

असं स्पष्टीकरण देत कुणालने सोशल मीडियावरून त्याची नाराजी व्यक्त केली आहे. याबरोबरच त्याने मूनव्वर फारुकीवर झालेल्या अन्यायाविषयी त्याने वाच्यता करून त्याला सपोर्ट दर्शवला आहे!

 

खरंतर सध्या या स्टँड-अप कॉमेडीयन्सच्या बाबतीत घडणाऱ्या या घटनांना राजकीय रंग दिला जातोय, पण वास्तव काहीसं वेगळं आहे. देशात कोणालाच या कलाकारांबद्दल आकस नाहीये, पण ते ज्या पद्धतीची भाषा वापरतात आणि ज्याप्रकारे एका समुदायाच्या श्रद्धास्थानांबद्दल भाष्य करतात त्यामुळेच ते अडचणीत सापडतात.

या कलाकारांचे कार्यक्रम रद्द होण्यामागे ते स्वतःच जवाबदार आहेत हे अगदी स्पष्ट आहे कारण जर जात धर्म बघून कलाकारांची मुस्कटदाबी होत असती तर झाकीर खानसारख्या कॉमेडीयनलासुद्धा त्याचा फटका बसला असता, हा विचार आपण करायलाच हवा.

कलाकारांची मुस्कटदाबी जशी चुकीची आहे तसंच देशातल्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावणंसुद्धा चुकीचं आहे, हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हाच हे सगळेप्रकार थांबतील. अभिव्यक्तिचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे पण त्याचा वापरसुद्धा योग्य मार्गानेच व्हायला हवा!

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version